S M L

आठवणी महेंद्र कपूर यांच्या

9 जानेवारी हा प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने महेंद्र कपूर यांच्या आठवणी जागवण्यासाठी सलाम महाराष्ट्रमध्ये अरविंद मुखेडकर आणि चिंतामणी सोहनी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अरविंद मुखेडकर हे गायक म्हणून परिचित आहेत. विविध कार्यक्रमात त्यांचा गायक म्हणून सहभाग असतो. चिंतामणी सोहनी हे संगीतकार,संगीत संयोजक आणि सिंथेसायझर वादक आहेत.श्रीनिवास खळे,सुरेश वाडकर, अरूण दाते, कविता कृष्णमुर्ती , शंकर महादेवन, महेंद्र कपूर यांच्यासोबत काम केलंय.ते नोटेशन तज्ज्ञ आहेत. महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलताना अरविंद मुखेडकर म्हणाल "महेंद्र कपूर यांचा माझ्यावर शालेय जीवनापासून प्रभाव होता. पुढे मला त्यांना भेटण्याचा योग आला. तेव्हा मी सोफिया कॉलेजमध्ये शिकत होतो. योगायोगानं फेमस स्टुडिओमध्ये मला त्यांचं रेकॉर्डिंग ऐकण्याचा आला. तेव्हा महेंद्र कपूर यांनी मला ज्या पद्धतीनं रिसिव्ह केलं, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. गायक म्हणून ते महान होतेच, पण माणूस म्हणूनही त्यांचा मोठेपणा मला अनुभवायला मिळाली. श्वास न सोडता गाणं, हे महेंद्र कपूर यांचं वैशिष्ट्य. स्टेज परफार्मन्सला लोकांच्या टाळ्या संपायच्या, पण कपूर साहेबांचा श्वास नाही." महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलताना चिंतामणी सोहनी म्हणाले "त्यांनी फक्त हिंदीच नाही तर वेगवेगळ्या भाषांमधली गाणी गायली आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याची क्षमता होती. देशभक्तीपर गाणी ही पण महेंद्र कपूर यांची स्पेशलिटी होतीय आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने ती गायली आहेत की घराघरात ती पोहचली आहेत." महेंद्र कपूर यांच्या आठवणी आणि गाणी ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 03:21 PM IST

आठवणी महेंद्र कपूर यांच्या

9 जानेवारी

हा प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने महेंद्र कपूर यांच्या आठवणी जागवण्यासाठी सलाम महाराष्ट्रमध्ये अरविंद मुखेडकर आणि चिंतामणी सोहनी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अरविंद मुखेडकर हे गायक म्हणून परिचित आहेत. विविध कार्यक्रमात त्यांचा गायक म्हणून सहभाग असतो. चिंतामणी सोहनी हे संगीतकार,संगीत संयोजक आणि सिंथेसायझर वादक आहेत.श्रीनिवास खळे,सुरेश वाडकर, अरूण दाते, कविता कृष्णमुर्ती , शंकर महादेवन, महेंद्र कपूर यांच्यासोबत काम केलंय.ते नोटेशन तज्ज्ञ आहेत. महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलताना अरविंद मुखेडकर म्हणाल "महेंद्र कपूर यांचा माझ्यावर शालेय जीवनापासून प्रभाव होता. पुढे मला त्यांना भेटण्याचा योग आला. तेव्हा मी सोफिया कॉलेजमध्ये शिकत होतो. योगायोगानं फेमस स्टुडिओमध्ये मला त्यांचं रेकॉर्डिंग ऐकण्याचा आला. तेव्हा महेंद्र कपूर यांनी मला ज्या पद्धतीनं रिसिव्ह केलं, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. गायक म्हणून ते महान होतेच, पण माणूस म्हणूनही त्यांचा मोठेपणा मला अनुभवायला मिळाली. श्वास न सोडता गाणं, हे महेंद्र कपूर यांचं वैशिष्ट्य. स्टेज परफार्मन्सला लोकांच्या टाळ्या संपायच्या, पण कपूर साहेबांचा श्वास नाही." महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलताना चिंतामणी सोहनी म्हणाले "त्यांनी फक्त हिंदीच नाही तर वेगवेगळ्या भाषांमधली गाणी गायली आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याची क्षमता होती. देशभक्तीपर गाणी ही पण महेंद्र कपूर यांची स्पेशलिटी होतीय आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने ती गायली आहेत की घराघरात ती पोहचली आहेत." महेंद्र कपूर यांच्या आठवणी आणि गाणी ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close