S M L

थायरॉईडवर उपचार - भाग 3

9 जानेवारीच्या टॉक टाईमचा विषय होता थायरॉईडवर उपचार. थायरॉईड म्हणजे काय, त्याच्यावर योग्य उपचार कोणते अशा विविध प्रश्नांची चर्चा टॉकटाईममध्ये झाली. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. अर्चना जुनेजा यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.थायरॉईडची माहिती देताना डॉ. जुनेजा म्हणाल्या "थायरॉईड म्हणजे गळ्यामधील ग्रंथी. त्यातून टी3 आणि टी4 हे हार्मोन्स उत्पादित होतात. शरीराची क्रिया सुरू ठेवण्यासाठी या हार्मोन्सची गरज असते. शरीरातील क्रियांचा वेग या हार्मोन्सवर अवलंबून असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर हार्मोन्स जास्त असतील, तर हृदयाचे ठोके वाढतात, कमी झाले तर गती कमी होणार. हा अनुवांशिक आधार आहे किंवा काही औषधांमुळे अथवा आयोडिनच्या कमतरतेमुळे हा आजार होऊ शकतो. या हार्मोन्सचं प्रमाण वाढलं तर शरीरात मेटापॉलिझीन वाढणार. म्हणजे हृदयाची धडधड वाढते, डोळे मोठे, हाताला घाम सुटतो होतात आणि त्याचे परिणाम हाडांवर किंवा हृदयावर होऊ शकतो. पण हार्मोन्सचं प्रमाण कमी झालं, तर उलटो परिणाम होतात. थायरॉईड्समुळे प्रेग्नन्सीमध्ये कॉम्पलिकेशन्स होऊ शकतात. आईला हा आजार असेल, आईने गरोदरपणात औषधं घ्यायला पाहिजेत. सहा महिन्यांपर्यंत मुलाची वाढ आईवर अवलंबून असते. त्यात हयगय झाली तर त्याचे परिणाम मुलावर होऊ शकतात. थायरॉईडमुळे वजन वाढलं असेल, तर गोळी तर सुरू करायलाच हवी, पण त्याचबरोबर काम करून, व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आजच्या काळात आयोडिनचं प्रमाण निदान शहरात तरी पुरेसं सापडतं. त्यामुळे फारशी पथ्य पाळण्याची गरज नाही, पण सगळं काही प्रमाणात खावं तसंच जेवढ्या लवकर थायरॉईडवर उपाय सुरू होतील, तेवढे ते चांगलं" अशी माहिती डॉ. अर्चना जुनेजा यांनी सांगितली.थायरॉईडवरील उपायांबद्दल हार्मोनतज्ज्ञ अर्चना जुनेजा यांनी दिलेले सल्ले ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2009 03:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close