S M L

निसर्गाच्या सान्निध्यात... (भाग : 1)

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये पक्षी निरीक्षक प्रशांत शिंदे आणि निसर्ग कवी प्रा. केशव देशमुख आले होते. दूरवर पसरलेलं माळरान... त्या माळारानात आलेली गवत फुलं... उंच - बुटकी अशी झाडं...वर निळं आकाश आकाशात उडणारे विविध पक्षी, वेगवेगळ्या आकारातले, प्रकारतले... निरनिराळ्या जातींचं... एकंदरीत पक्षी पहावं आणि कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं असंच ते दृश्य होतं. हे दृश्य ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये पहायला मिळालं. सकाळी सकाळीच एवढं सुंदर दृश्य पहायला मिळाल्याचं श्रेय जातं ते पक्षी निरीक्षक प्रशांत शिंदे यांना. सलाम महाराष्ट्र ' मध्ये पक्षी निरीक्षक प्रशांत शिंदे आले होते. रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ इ बर्ड ' ह्या इंग्लंडच्या पक्षांसाठी काम करणा-या संस्थेची बर्ड फिल्म पाहून त्यांनी रसिकांना जिंकलंच. पण त्या बरोबरीनं त्यांनी पक्षी निरीक्षणाचे निरनिराळे अनुभव सांगून ' सलाम महाराष्ट्र ' या कार्यक्रमाची रंगत वाढवली. सोबत सुप्रसिद्ध निसर्ग कवी ना. धो. माहानोर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल औरंगाबादचे प्राध्यापक केशव देशमुख यांनी महानोरांच्या कवितांचं रसग्रहण करून करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रशांत शिंदे निसर्गाकडे ओढले गेल्याची गोष्टच वेगळी आहे. प्रशांत शिंदे सांगतात, " माझं शिक्षण समाजशास्त्र या विषयातून झालेलं आहे. त्या विषयातून पदवी घेतल्यावर मी सोशलवर्क म्हणून काम करायला सुरुवात केली. असंच एकदा मेळघाट जंगलात समाज सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कुपोषित प्रदेश अशी मेळघाटच्या जंगलाची ओळख होती. तिथे जाऊन जेव्हा मी आदिवासींबरोबर काम करायला लागलो तेव्हा माझी जंगलाशी ओळख झाली. शहरात वाढलेला मला जंगल ही संकल्पनाच नवीन होती. मेळघाटातले वाघ आणि इतर प्राणी, पक्षी, वनस्पती त्यांचं जीवन पाहून मी इतका भारावून गेलो की, या सगळ्याची ओळख प्रत्येक मुंबईतल्या प्रत्येकालाच व्हायला हवी इच्छेपोटी मी स्वत:ला पक्षी निरीक्षणात वाहून घेतलं. "पक्ष्यांच्या वैविध्याविषयी प्रशांत शिंदे सांगतात, " प्रत्येक पक्षी हा वेगळा आहे. रुप, आकार, रंग, चोचींची वेगळेपणा, उडण्याच्या सवयी या सगळ्यातच आपल्याला वैविध्य जाणवतं. आपला भारत देश तर अशा निरनिराळ्या वैविध्यपूर्ण पक्षांसाठी प्रसिद्ध आहे. जवळ जवळ 1300 जातींचे पक्षी आपल्या भारतामध्ये आढळतात. यातले 300 पक्षी हे पाहुणे पक्षी आहेत. ते बाहेरून स्थलांतर करून भारत भेटीसाठी येतात. जसजसा आपण पक्षी पाहत जातो... तसतसं आपल्याला पक्ष्यांच्या या विविध भागांचं दर्शन होतं. उदाहरणच जर द्यायचं झालं तर मी फ्लेमिंगोचं देतो. दरवर्षी हिवाळ्यात फ्लेमिंगो हे पक्षी भारतात खासकरून मुंबई भेटीला येतात. ते जेव्हा भारतात येतात तेव्हा ते करड्या रंगाचे, ब्लॅक ऍण्ड व्हाइट, ग्रे रंगछटेचे असतात. पण ज्यावेळी ते परत आपल्या गावी जायला निघतात तेव्हा त्यांच्या पंखांवर गुलाबी रंगाची छटा येते. " मुंबईत फ्लेमिंगो व्यतिरिक्त इतरही पक्षी येतात. त्याविषयीही प्रशांत शिंदे यांनी सांगितलं. " मुंबईत चिखलाचा, खार फुटीचा, गाळाचा जो भाग आहे... त्या भागातही स्थलांतरित पक्ष्यांची जा-ये सुरू असते. शेकाट्या, फ्लोअर, स्टींट, वेगवेगळ्या प्रकारचे बगळे, रेड शँक , ग्रीन शँक, ब्लॅक टेल गॉडवील असे निरनिराळ्या जातींचे 130 पक्षी समुद्र किना-यावर येतात , " अशी माहिती प्रशांत शिंदे यांनी दिली. भरतात येणा-या निरनिराळ्या पक्ष्यांची संख्या वाढवायची असेल तर या पक्ष्यांच्या आदिवासांचं संरक्षण करायला हवं. त्यातूनच तुमच्या आमच्यातला परीनिरीक्षणाचा छंद वाढेल. " ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये चाललेला निसर्ग कवितांचा कार्यक्रम आणखी रंगाला तो प्रा. केशव देशमुख यांच्यामुळे. त्यांनी ना. धो. महानोरांच्या निरनिराळ्या कविता वाचून दाखवल्या. प्रा. केशव देशमुख सांगतात, " महानोरांच्या कवितांचा आमच्यावर संस्कार झालेला आहे. त्यांची कविता माणूस आणि निसर्ग यांचा संबंध दाखवणारी आहे. खानदेशात बहिणाबाईंनंतर ना.धो. महानोरांनाही अनन्या साधारण महत्त्व आहे. महानोरांचा शेती संबंधीचा जो प्रवास आहे तो अत्यंत प्रामाणिक, नितळ आणि संुदर आहे. या सगळ्या प्रवासाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या कवितांतून करून घेतला आहे. ना. धों.च्या आपण सगळ्या कवितांचा आपण विचार केला तर म्हणजे अगदी रानातल्या कवितांपासून ते पावसाळी कवितांपर्यंतचा तर ती निसर्गापासून ती माणसाकडे, माणसाच्या दु:खाकडे येऊन थांबली आहे. माणसाच्या दु:खाला हात घालणारी, दु:खाचा आवाज अतिशय इमानदारीनं व्यक्त करणारी त्यांनी कविता त्यांनी लिहिली आहे. पानझड, प्रार्थना, दयाघना, तिची कहाणी य पुस्तकांतून माणसाच्या अवतीभवती असणारं दु:ख त्यांनी मांडलं आहे. या दु:खाला व्यापक स्वरूप देणारी कविता त्यांनी लिहीली आहे. " ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये पक्षी निरीक्षक प्रशांत शिंदे आणि निसर्ग कवी प्रा. केशव देशमुख यांच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2009 04:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2009 04:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close