S M L

काळजी प्रसूतीची (भाग : 2)

गरोदरपण म्हणजे आईचा दुसरा जन्म असतो. चांगली प्रसूती होण्यासाठी आईला दिवस राहिल्यापासूनच काळजी घ्यावी लागते. तर ' टॉक टाइम 'मध्ये प्रसूती नीट होण्यासाठी काय काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आलं. हे मार्गदर्शन करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अलका गोडबोले आल्या होत्या. कोणत्याही बाईची प्रसूती म्हणजे डिलिव्हरी चांगली होण्यासाठी गरोदर राहिल्याचं कळल्यापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्याविषयी डॉ. अलका गोडबोले सांगतात, " गरोदरपणात आईला फॉलिक ऍसिडची गरज असते. तेव्हा फॉलिक ऍसिड घ्यायला घेतलं पाहिजे. गरोदर आईनं पाणी भरपूर पाहिजे. बाहेरचं अजिबात खाऊ नये. पण आजच्या नोकरदार आईला बाहेरचं खाण्याशिवाय पर्यायच नसतो. जेव्हा बाहेरचं खाण्याशिवाय पर्यायच नसतो तेव्हा तेलकट तुपकट पदार्थ खाणं टाळावं. साऊथ इंडियन पदार्थांना खाण्यात प्राधान्य द्यायचं. कारण हे पदार्थ उकडलेले आणि उकळलेले असतात. गरदोर आईनं भरपूर पाणी प्यायलंच पाहिजे. " प्रसूतीच्या वेळी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नाव घालायचं. 10 मिनिटांवर असलेलं हॉस्पिटल केव्हाही चांगलं. पण प्रत्येक आईच्या बातीत तसं होत नाही. आईचं कोणत्या हॉस्पिटलमध्ये नाव घालावं हे त्या आईची आई किंवा सासू ठरवते. याविषयी डॉ. गोडबोले सांगतात, " साधारणपणे घरापासून अवघ्या 10 मिनिटांवर असणा-या हॉस्पिटलमध्ये होणा-या आईचं नाव घातलंच पाहिजे. पण तसं होत नाही. कारण यावर बहुतेकवेळा आईची आई किंवा आईची ठरवतात. त्याप्रमाणं केलं तर काही हरकत नाही. गरोदरपणात प्रसूतीच्या वेळी आईचे कष्ट वाचावे हाच त्यामागचा उद्देश आहे. " आईनं प्रवास करणं टाळलं पाहिजे. पपई, अननस, चिकन यांसारखे पदार्थ खाणं आईनं टाळलं पाहिजे. बाळाला ' अ ' जीवनसत्त्वाची गरज असते. ती कोणत्याही केशरी फळांतून मिळते. तेव्हा अशी फळं खाण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला. गरोदरपणात आईला ऍसिडिटी, बद्धकोष्ठताचा त्रास होतो. काही काही स्त्रियांना तर नवव्या महिन्यानंतरही कोरड्या उलट्यांचा त्रास होतो.अशावेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला, असं डॉक्टर गोडबोले म्हणाल्या. जर काही अनुवंशिक आजार असतील तर गरोदर राहिल्यावर कोणत्याही आईनं स्त्री रोगतज्ज्ञांना त्या सांगायच्या. गर्भावर चांगले संस्कार होण्यासाठी गर्भसंस्कारांच्या क्लासेसचाही पर्याय सुचवला. .डॉ. अलका गोडबोले यांनी केलेलं मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 12:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close