S M L

मायक्रोव्हेव रेसिपीज (भाग : 3)

' टॉक टाइम 'चा विषय होता मायेक्रोव्हेव रेसिपीज. या विषयावर बोलण्यासाठी पाककला तज्ज्ञ अंजली गुप्ते आल्या होत्या. ओव्हन ही काळाची गरज बनत चाललीये. नोकरदार स्त्रिया तसंच गृहीणींसाठी ओवन म्हणजे कमी श्रमात, नीटनेटकं आणि स्वच्छ जेवणं बनवण्याचं माध्यम बनत चाललंय. अंजली गुप्ते मायक्रोव्हेव मधल्या पदार्थांविषयी सांगता, " ओव्हनमध्ये योग्य पॉवर सेट केल्यास कोणताही पदार्थ करपत नाही. गॅसवर केले जाणारे कोणतेही पदार्थ ओव्हनमध्ये सहज करता येतात. मग ते केक, पिझ्झा असो वा अगदी उकडीचे मोदक, पातोळे सारखे पारंपारिक पदार्थही. ओव्हनमुळं वेळेची बचत होतेच. शिवाय पूर्वीसारखं स्त्रियांना सतत गॅससमोर उभं राहणं तो पदार्थ सारखा ढवळत रहाणं, करपत नाही हे पहाणं, खाली भांड्यांना लागत नाही हे पहाणं सारख्या कटकटीच्या कामांपासून सुटका होऊ शकते. "ओव्हन वापरण्याआधी प्री हिट करणं जरुरीचं असतं. यासाठी रिकामा ओवन ठेवू नये. त्यात एखादं भांडं पाणी ठेवावं.ओव्हनसाठी बाजारात खास भांडी असतात. तीच भांडी वापरावी म्हणजे पदार्थ नीट बनतात. काचेची भांडी यात प्रामुख्यानं असतात. केक करताना कधीही धातूच्या भांड्यात केला जावा. त्यामुळे केकवर ब्राऊनिंग म्हणजेच चॉकलेटी रंग येतो. काचेच्या भांड्यात करू नये. बिस्किटं, कुकीज बनवताना तापमान आणि मिनिटं काटेकोरपणे वापरली जावीत. बटाटे, टॉमेटो ओव्हनमध्ये उकडताना त्यावर आधी टुथपिकनं भोकं केली जावीत. आणि मगच ओव्हनमध्ये उकडवावीत.ओवन कधीही पाण्यानं धुऊ नयेत. तर तो कोरड्या फडक्यानं पुसून घ्यावा. आजच्या काळात कनव्हिक्शन ओव्हनचा जास्तीत जास्त वापर फायदेशीर ठरतो, अशी महत्त्वाची माहिती ' टॉक टाइम ' मध्ये मिळाली.' टॉक टाइम ' मध्ये पाककला तज्ज्ञ अंजली गुप्ते यांनी केलेलं मार्गर्शन पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2009 11:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close