S M L
  • सत्यम मोठ्ठम खोट्टम (भाग- 2)

    Published On: Jan 21, 2009 03:32 PM IST | Updated On: May 13, 2013 04:10 PM IST

    सत्यम मोठ्ठम खोट्टम (भाग- 2)कंपनी सुस्थितीत आहे. इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएससारख्या इतर आय.टी. कंपन्यांच्या तोडीस तोड आहे. हे दाखवण्यासाठी रामलिंग राजू यांनी बॅलन्सशीटमध्ये फेरफार करायला सुरुवात केली. त्यांनी राजीनाम्यात कबूल केल्यानुसार बॅलन्सशीटमध्ये दाखवलेल्या 5361 कोटींच्या कॅश आणि बँक बॅलन्सपैकी 5040 कोटी रुपयांचे बॅलन्सेस अस्तित्वात नाही. एकूण सगळा इंटरेस्ट म्हणजे ऍक्रूड इंटरेस्ट म्हणून दाखवण्यात आलेले 376 कोटीही प्रत्यक्षात नाहीत. राजूंनी घेतलेली 1230 कोटींची कर्ज बॅलन्सशीटमध्ये दाखवण्यातच आलेली नाहीत. सत्यमला त्यांनी केलेल्या कामासाठी 490 कोटी रुपये क्लायंट्सकडून येणे होते. पण बॅलन्सशीटमध्ये हा आकडा 2651 कोटी दाखवण्यात आला. जे पैसे कंपनीला कधीच मिळणार नव्हते. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीसाठी सत्यमच्या बॅलन्सशीटमध्ये रेव्हेन्यू दाखवण्यात आला 2700 कोटी आणि ऑपरेटिंग मार्जिन 649 कोटी.पण प्रत्यक्षात खरा रेव्हेन्यू आहे 2112 कोटी तर ऑपरेटिंग मार्जिन फक्त 61 कोटी रुपये.यामुळे दुस-या तिमाहीतच खोटा कॅश आणि बँक बॅलन्स 588 कोटी रुपयांनी वाढला.त्यातच सत्यममध्ये इनसाइडर ट्रेडिंग म्हणजेच आपल्याच कंपनीचे शेअर विकत घेणे असं झाल्याची माहिती पुढे येतेय.जून 2001 मध्ये राजूंकडे कंपनीचे 22.89 टक्के शेअर होते आणि डिसेंबर 2001मध्ये ते 22.40 टक्के झाले. हा आकडा सप्टंेबर 2006मध्ये 10.95 टक्क्यांवर आला. तर सप्टेंबर 2007 मध्ये त्यांच्याकडे 8.43 टक्के शेअर होते. सप्टेंबर 2008 पर्यंत राजूंच्या नावावर होते फक्त 8.27 टक्के शेअर. हे शेअरदेखील गहाण ठेऊन राजूंनी मार्केटमधून पैसे उचलले.गेल्या 22 क्वार्टर्समध्ये राजूंनी आपल्याकडचे शेअर्स विकल्याचं बीएसईकडून मिळालेल्या या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. 30 जून 2001 पासून 30 सप्टेंबर 2008 पर्यंत चार कोटी 30 लाख शेअर्स विकून राजूंनी सुमारे 1 हजार कोटी रुपये कमवले. चुकीची बॅलन्सशीट दाखवून राजूंनी मार्केटमध्ये शेअरची व्हॅल्यू वाढवली आणि स्वतःचे शेअर विकत राहिले. कंपनीची इतर सीनियर मॅनेजमेंटही या इनसायडर ट्रेडिंगमध्ये सामील होतील. कंपनीचे सीएफओ श्रीनिवास वड्लामणी आणि बोर्डचे अध्यक्ष राम मैनामपतींसोबत कंपनीच्या 20 अधिका-यांनी घोटाळा समोर येण्यापूर्वी आपले शेअर विकले.रामलिंग राजूंनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे सत्यमचे शेअरधारक हादरले. कंपनीचा शेअर एका दिवसात 80 टक्के कोसळला. ब्लू चिप कंपनी म्हणून इतकी वर्ष ठेवलेला स्टॉक मातीमोल झाला.आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारही अडचणीत आला.या घोटाळ्याला संपूर्णपणे आपणच जबाबदार असून कंपनीच्या संचालक मंडळापैकी कुणालाच याविषयी माहित नसल्याचं राजूंनी त्यांच्या पाच पानी राजीनाम्यात म्हटलंय. राम मैनामपतीसारख्या कंपनीच्या सीनियर मॅनेजमेंटलाही याचा पत्ता नव्हता असं राजूंचं म्हणणं आहे.इतका मोठा घोटाळा एकाच व्यक्तीने केल्याचं कठीण असल्याचं मत गुंतवणूक तज्ज्ञ गणेश शानबाग यांनी व्यक्त केलंय.आपण घरी जर काही पैशांची खरेदी केली तरी ते पैसे खर्च झाल्याचं सगळ्यांना कळतं असं असताना इतका मोठा घोटाळा कुणाच्याच लक्षात आला नसल्याचे कठीण असल्याचे ते म्हणाले. चार्टर्ड अकाउंटं प्रफुल्ल छाजेड यांनीही असंच मत व्यक्त केलं. राजू स्वतः कंपनीचे अकाऊंट्स लिहीत नव्हते त्यामुळे एन्ट्रीमध्ये झालेला फेरफार किमान काही व्यक्तींना माहित असायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं.गेल्या दोन वर्षात कंपनीच्या प्रमोटर्सनी त्यांचे शेअर गहाण ठेऊन तब्बल 1230 कोटी रुपये उभे केले. कंपनी सुरू ठेवण्यासाठी सत्यमच्या बॅलन्सशीटमध्ये ही एन्ट्री दाखवलेली नाही.कंपनीचे खरे निकाल आणि दाखवण्यात आलेले खोटे प्रॉफिट्स यांतली दरी वाढत होती. आपल्या वाट्याचे उरलेले शेअर विकणं राजूंना शक्य नव्हतं. कंपनीचा खराब परफॉर्मन्स दिसला असता तर इतर कंपन्यांकडून टेक ओव्हरची शक्यता. यामुळे मेटास डील हा, ही गॅप भरण्याचा राजूंचा शेवटचा प्रयत्न होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close