S M L

सत्यम मोठ्ठम खोट्टम (भाग- 3)

सत्यम मोठ्ठम खोट्टम (भाग- 3)सत्यमच्या या सगळ्या फियास्कोमध्ये सगळ्यात मोठी शंका घेण्यात आली ती ऑडिटर्सच्या भूमिकेबद्दल. प्राईस वॉटरहाऊस कूपर्स या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फर्मच्या प्राईस वॉटर हाऊस या भारतीय कंपनीने सत्यमचं ऑडिट केलं. पण 7000 कोटींचा घोटाळा समोर आल्यावर प्राईस वॉटर हाऊसने नक्की काय पाहून हे ऑडिट केलं अशी शंका व्यक्त होत आहे. गुंतवणूक सल्लागार कंपनीचे रिझल्ट्स आणि आकडेवारी दाखवून सल्ला देतात त्यामुळे योग्य ऑडिट करणं ही ऑडिट कंपनीची जबाबदारी असल्याचे गणेश शानबाग यांचं मत आहे.कंपनीचा स्टॉक, इन्व्हेंटरी यांची खोटी आकडेवारी दाखवणं सोपं असतं. पण सत्यममध्ये सगळ्यात मोठा खोटा आकडा बँक बॅलन्सेसचा आहे. आता सत्यमच्या ऑडिटच काम प्राईस वॉटर हाऊसकडून काढून घेऊन ते केपीएमजी आणि डेलॉइटला देण्यात आलं आहे. तसंच सीए इन्स्टिट्यूटनेही प्राईस वॉटर हाऊसकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. या प्रकरणाची चौकशी करणा-या सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस म्हणजेच एसएफआयओमध्ये फॉरेन्सिक एक्स्पर्टसचा समावेश आहे.एन्रॉन आणि वर्ल्डकॉम घोटाळा प्रकरणांची चौकशीही फॉरेन्सिक पद्धतीने केल्यानंतरच अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.आणि यानंतर अमेरिकेने आपल्या जनरल अकाऊंटिंग ऍण्ड ऑडिट प्रॅक्टिसेसम्हणजेच गॅपमध्ये सुधारणा केल्या होत्या.अमेरिकेतल्या एन्रा़ॅनचा घोटाळा समोर आल्यानंतर कंपनीची ऑडिटर फर्म असणारी आर्थर ऍण्डरसन बंद पडली होती.आता सत्यमची धुरा सोपवण्यात आलीय तीन क्षेत्रांतल्या दिग्गजांवर दीपक पारेख, किरण कर्णिक आणि सी. अच्युतन. दीपक पारेख यांच्याकडे एचडीएफसीमुळे फायनान्स क्षेत्राचा अनुभव आहे. नॅस्कॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक आय.टी. क्षेत्रातले बारकावे जाणतात. तर सी. अच्युतन यांच्याकडे सेबीचा अनुभव आहे. तर सीआयआयचे तरूण दास, सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष टी. एन. मनोहरन आणि एलआयसीचे एस. बालकृष्णन यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.सरकारकडून मिळणा-या बेलआऊट पॅकेजला किरण कर्णिक यांनी नकार दिला आहे. सरकारपेक्षा एखाद्या बँकेकडून कर्ज मिळणं गरजेचं असल्याचं सरकारने म्हटलंय सत्यम चांगली कंपनी असल्याचं म्हणत आता स्टेट बँक ऑफ इंडियाही सत्यमला आर्थिक मदत करायला पुढे आली आहे.केपीएमजीच्या नव्या फॉरेन्सिक पद्धतीने सत्यमचं पुन्हा ऑडिटिंग व्हायला आणखी काही दिवस जाणार आहेत. सत्यमविषयीच्या शंका वाढतच असल्या तरी एक गोष्ट अजूनही शाबूत आहे. ती म्हणजे सत्यमच्या सामान्य कर्मचा-यांचं कौशल्य जे कदाचित कंपनीचे जुने क्लायंट्स टिकवून ठेवायला आणि सत्यमचं भविष्य ठरवायला मदत करेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2009 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close