S M L

तयारी परीक्षेची

टॉक टाइमचा विषय होता परीक्षेची तयारी. याविषयावर बोलण्यासाठी सायकोथेरपिस्ट संगीता राव - कामत आल्या होत्या. परीक्षेला काहीच दिवस शिल्लक राहिलेत. आता अभ्यास कशा प्रकारे करावा, आहार काय असावा या सगळ्या प्रश्नांवर सायकोथेरपीस्ट संगीता राव-कामत यांनी पालकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. परीक्षेला थोडे दिवसच असतांना टाईम मॅनेजमेंट करणं फार जरुरी आहे." एकदा प्रिलीम झाल्यावर मुलांना अंदाज येतो की आपण कोणत्या विषयात कमी आहोत. मग त्यानुसार आपल्या उरलेल्या दिवसांचं टाईम टेबल आखावं.गणितासारख्या विषयांना रोज सरावाची गरज असते. विषयांप्रमाणे दिवस वाटुन घ्या. एखादा विषय आपल्याला येत आहे म्हणून दुर्लक्ष करू नका, " असं अत्यंत मोलांचं मार्गदर्शन संगीता राव - कामत यांनी केलं. तोंडी परीक्षेची तयारी करताना न अडखळता बोलण्याची सवय करावी, आरशासमोर उभं राहुन आपले उच्चार तपासून पहावेत, असही त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या दिवसांत पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. मुलं जर स्वत:चा अभ्यास योग्य पध्दतीनं करत असतील तर त्यांच्या अभ्यासात दखल देऊ नये.मुलांचं टाईम टेबल तयार करताना मुलांचं मतही विचारात घ्यायचं. परीक्षेच्या दिवसांतला आहार हा प्रोटीन्सयुक्त आणि पचायला हलका असावा. पेपरला निघताना घरून नाश्ता करुनच निघावं असंही त्या म्हणाल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2009 02:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2009 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close