S M L

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 1)

टेक ऑफचा विषय होता फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर. सध्याच्या करिअरक्षेत्रातली फूड टेक्नॉलॉजी ही बूमिंग इंडस्ट्री आहे. पण फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला नीट माहिती नसतं. कधी कधी क्वालिटी कंट्रोल, न्युट्रीशन याबाबी फूड टेक्नॉलॉजीमध्ये येतात तेव्हा गोंधळायला होतं. पण प्रत्यक्षात फूड टेक्नॉलॉजी हे इंजिनिअरिंग सायन्स असून अन्नाचा आयुषात होणार उपयोग हे फूड टेक्नॉलॉजी सांगतं. या फूड टेक्नॉलॉजीबद्दल बोलण्यासाठी ' टेक ऑफ 'मध्ये इंजिनिअर प्रो.डॉ.स्मिता लेले आल्या होत्या. डॉ. स्मिता लेले ह्या यु.डी.सी.टी.त फूड इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विभागाच्या प्रमुख आहेत. त्या स्वत: बायो केमिकल इंजिनिअर आहेत.फूड टेक्नॉलॉजीत एखादा खाद्यपदार्थ किंवा वस्तू मोठ्याप्रमाणावर तयार केली जाते. त्यात प्रिझरवेटीव्हज् आलेत. त्यामुळे फूड टेक्नॉलजी हे शास्त्र थोडंसं प्रथम दर्शनी तरी केटरिंग ड्रिव्हन आहे, असंच वाटतं. पण फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय ?डॉ.स्मिता लेले - खूप जणांच्या मनात हाच प्रश्न असतो. कित्येकांना फूड टेक्नॉलॉजी म्हणजे स्वंयपाक करण्याचं शास्त्र, रेसिपी, केटरिंग, न्युट्रीशन व्यवसायाशी निगडीत असणारं शास्त्र असंच वाटतं. पण तसं नाहीये. तर केमिकल इंजिनिअरिंगची फूड टेक्नॉलजी ही सुपर स्पेशल ब्रॅन्च आहे. समजा एकाला दोन हजार पोळ्या हव्या आहेत. त्यासाठी 100 बायकांना पोळपाट लाटणं घेऊन कामाला लावलं आणि दोन हजार पोळ्या तयार करणं याला फूड टेक्नॉलॉजी म्हणत नाहीत. पण जेव्हा एखादी ब्रॅन्डेड खाद्यपदार्थ कारखान्यात तयार केला जातो तेव्हा इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट आणि केमिकल इंजिनिअरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते खाद्यपदार्थ तयार केले जातात. ते खाद्यपदार्थ एकसारखेच असावे लागतात. म्हणजे फूड टेक्नॉलॉजीमध्ये कन्सिस्टंट क्वालिटीला फार महत्त्व असतं. तयार खाद्यपदार्थांतलं एकसारखेपण असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे तर. हा एकसारखेपणा तुम्ही कसा काय साधतात ? डॉ.स्मिता लेले - तयार पदार्थांमध्ये एकसारखेपणा येण्यासाठी सर्वात आधी तंत्रज्ञानाची माहिती असणं गरजेचं आहे. पदार्थाचं टेक्श्चर कायम राहिलं पाहिजे. तयार पदार्थ चांगला टिकण्यासाठी पॅकेजिंग काय करायचं याचाही विचार केला जातो. हा पदार्थ कोणत्या पद्धतीनं खायला देणार आहात म्हणजे रेडी टू इट पद्धतीनं देणार आहात की अर्धा कच्चा देणार आहात, तो कोणाला खायला देणार आहात म्हणजे फ्रोजन आहे की परदेशी पाठवणार आहात. आणि शेवटी जो खातो त्या खाणा-याला त्या पदार्थाची चव, आनंद आणि त्या पदार्थातली पोषणमूल्य मिळाली पाहिजेत. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजीत पदार्थावर संस्कार करताना मायक्रो बायोलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, बायो केमिस्ट्री आणि बरंच काही पाहायला लागतं. विद्यार्थ्यांना फूड टेक्नॉलॉजी हा विषय 12वीत असतानाच माहीत असणं आवश्यक आहे का ? कारण फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स हा 12वी नंतरच सुरू होतो... डॉ.स्मिता लेले - हो. भारतात एल्.आय.टी नागपूरमध्ये, कानपूरला किंवा युडीसीटी मुंबईमध्ये फूड टेक्नॉलॉजीचे निरनिराळे कोर्सेस आहेत. ते इतर इतर बीटेक्स अभ्यासक्रमांसारखेच आहेत. त्या अभ्यासक्रमांचा 12 + 4 हा पॅटर्न आहे. आणि आपली जी स्टॅण्डर्ड इंजिनिअरिंगच्या प्रवेशांच्या ऍडमिशन्सची निवड प्रक्रिया आहे. तशीच प्रक्रिया फूड टेक्नॉलजीच्या अभ्यासक्रमांची आहे. विद्यार्थ्यांना जर फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांनी 10 वीपासून त्या विषयाची माहिती गोळा करायला लागलं पाहिजे. आजकाल विद्यार्थ्यांना ते सहजच शक्य आहे. कारण इंटरनेट. विद्यार्थ्यांनी तो पर्याय आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पहिजे. डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशनची वेबसाइट प्रत्येक वेळी पाहिली पाहिजे. 10 वीपासूनच जर एखाद्या क्षेत्रातल्या करिअरचं प्लॅनिंग करायचं झालं तर आधी स्कोपचा विचार केला जातो. फूड टेक्नॉलॉजीतल्या स्कोपविषयी सांगा ? डॉ.स्मिता लेले - जेव्हा आपली लोकसंख्या वाढते तेव्हा सर्व्हिस इंडस्ट्री आणि खाणंपिणं लागतं. जरी छान आरोग्यदायी आयुष्य जगायचं झालं औषधं लागणार नाहीत. पण खाणंपिणं मात्र नक्की लागलेच ना. शेतात पिकणारी वस्तू जर सगळ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आपल्या देशात 40 ते 50 टक्के अन्न फुकट जातं. त्यामुळे अन्न फुकट जाऊ नये याकरता त्यावर प्रक्रिया होणं गरजेचं आहे. कित्येकदा अन्नावर प्रक्रिया केल्यानं त्याचा दर्जाही सुधारतो. भारतासारख्या वाढत्या लोकसंख्येच्या देशाला अन्नाचा पुरवठा करायचा असेल तर तो तंत्रज्ञानाचा वापर करूनच करायला हवा. आपल्याकडे प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थाविषयी फारशी जागृती नाहीये. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांविषयीचा लोकांचा दृष्टिकोन अजूनच बायस आहे. फूड टेक्नॉलॉजी हे बूम करिअर आहे हे पाहता लोकांची मतं बदलायला काय केलं पाहिजे ?डॉ.स्मिता लेले - सर्वात पहिलं म्हणजे लोकांची मतं बदलायला पाहिजेत. चालतं बोलतं उदाहरण द्यायचं झालं तर डब्यातल्या अन्नाचं घेऊ. पूर्वी डब्यातलं अन्न हे चांगलं नसतं. असं समजलं जायचं. आता रिटॉर्ट ही पद्धती आली आहे. त्या पद्धतीत डब्यांची जागा ही पाऊचनं घेतली आहे. भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेनं त्यांनी पाऊचेच स्वीकारली आहेत. खरं तर टेक्निकली पाऊचेच आणि डबे हे सारखेच आहेत. पण डब्यातलं अन्न वाईट ही आपण 20 व्या शतकातली कल्पना कालबाह्य होत आहे. ज्यांना भारतीय पदार्थ खावेसे वाटतात, ते परदेशी भारतीय आता पाऊच बंद खाद्यपदार्थांना जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत. एकंदरीतच फूड इंडस्ट्री ही वाढणारी इंडस्ट्री आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर पुढे जाऊन जर फूड टेक्नॉलॉजीत करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांचा काय प्रकारचा माइंडसेट असला पाहिजे ? कोणती मुलं या फिल्डमध्ये जास्त यशस्वी होतात ? डॉ.स्मिता लेले - कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी त्या क्षेत्राची आवड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं कठोर मेहनतीची तयारी असणं गरजेचं आहे. पण फूड टेक्नॉलॉजीचं मात्र थोडंसं वेगळं आहे. सुरुवातीला सांगितलेल्या दोन गुणांची फूड टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करताना गरज आहेच. पण त्याचबरोबरीनं विद्यार्थ्यांनी अधिक जबाबदार असलं पाहिजे. फूड आणि औषधं या दोन गोष्टी दुस-यांच्या पोटात जात असल्यानं जबाबदारीवची जाणीव ही असायलाच पाहिजे. अनावधानानं एखाद्यावेळेस जर प्रमाण चुकलं तर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त जागृक असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीची कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट मुंबईत, महाराष्ट्रात कुठे आहेत ? त्या कॉलेजेसचा एलिजिबिलिटी क्रायटेरिआ काय आहे ? फूड टेक्नॉलॉजीस्टच्या कोर्सेसचा ड्युरेशन काय आहे ? कोर्सेसची फी काय आहे ? डॉ.स्मिता लेले - फूड टेक्नॉलजीचा 12वी नंतरचा कोर्स आहे त्याच्या ऍडमिशनची प्रोसही सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजसारखीच आहे. पीसीएमच्या बेससवर आणि सीईटी परीक्षेप्रमाणं ऍडमिशन होतं. युडीसीमध्ये फूड टेक्नॉलॉजीचा एम.टेक अभ्यासक्रम येत्या जून महिन्यापासून सुरू होत आहे. देशातला हा पहिलाच अभ्यासक्रम आहे जो बायोटेक्नॉलॉजी विभागानं स्पॉन्सर केलेला आहे. केमिकल इंजिनिअरिंग केलेल्यांना या कोर्ससाठी ऍडमिशन घेता येईल. पण त्याआधी गेट परीक्षा देणं गरजेचं आहे. फूड टेक्नॉलॉजीमधल्या रिसर्चचे एरियाज कोणते आहेत ?डॉ.स्मिता लेले - फूड टेक्नॉलॉजी हा इंटर डिसिप्लिनरी विषय आहे. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीशी निगडीत वेगवगळे विषय येतात. अन्नाची नासाडी होऊ नये याकरता ते चांगलं कसं टिकवता येईल या मायक्रोबायोलॉजीतल्या विषयाचाही यात अभ्यास केला जातो. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजीत मायक्रोबायॉलॉजीतल्या याही विषयावर संशोधन करता येईल. बायो केमिस्ट्री, बायो टेक्नॉलॉजीचे जे विषय आहेत ते पोषणमूल्यांच्या दृष्टीनं फूड टेक्नॉलॉजीत अभ्यासले जातात. त्यावरही संशोधन करता येईल. किंवा आता बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या दृष्टीनं म्हणजे शेतीच्या जे नंतर होतं ते पोस्ट हारवेस्टिंग, पेस्ट रेझिस्टंट, अधिक अन्नाची निर्मिती करणं म्हणजे या प्रकारच्या शेतकीय बयोटेक्नॉलॉजीचाही उपयोग फूड टेक्नॉलॉजीत होतो. नंतर या शेतीच्या उत्पादनांवर कशी प्रक्रिया केली जाईल यावरही फूड टेक्नॉलॉजीत वापर करता येतो. उदाहरणार्थ बोलायचं झालं तर टोमॅटोचं घेऊया. टोमॅटोतून लायकोबीन नावाचा घटक मिळतो. कोणत्या प्रकारच्या टोमॅटोचं उत्पादन केलं तर त्यातून सर्वात जास्त प्रमाणात लायकोबीन नावाचा घटक मिळणार, तर तो टोमॅटो बनवण्यासाठी काय करायला पाहिजे... अशाप्रकारचं संशोधन करायला पाहिजे. सीताफळ आवडणा-यांना बीनबियांचं सीताफळ खायला मिळालं तर...अशाप्रकारचं संशोधन करता येईल. या फूड टेक्नॉलॉजीमध्ये फूड केमिस्ट्रीवरही संशोधन करता येतं. फंडामेंटल लेव्हलला वेगवेगळे मॉलिक्युल एकमेकांशी कसे वागतात यावरही संशोधन करता येतं. केमिकल इंजिनिअरिंगची फूड टेक्नॉलॉजी ही स्पेशलाईज्ड शाखा असली तरी फूडचे मॉलिक्युल हे सेन्सिटीव्ह असतात. अन्नावर प्रक्रिया करताना त्या मॉलिक्युलशी फार प्रेमानं हाताळावे लागतात. तेव्हा हाही फूड टेक्नॉलजीतल्या स्पेशलायझेशनचा विषय असू शकतो. हल्ली फूड टेक्नॉलॉजीची एक नवीन शाखा उदयास आली आहे. तिचं नाव आहे न्युट्रोजिनॉमिक्स. तर त्यातही स्पेशलायझेशन करता येईल.न्युट्रोजिनॉमिक्स या नवीन शाखेविषयी सांगा ?डॉ.स्मिता लेले - काही मुलांमध्ये जन्मापासूनच काही डिफेक्टस् असतात. तर अशा मुलांना जन्मापासूनच अशाप्रकारचं खाणं द्यायचं ज्यानं ते डिफेक्टस् कमी होतील. किंवा असं खाणं आईला द्यायचं... त्यामुळे असं डिफेक्टीव्ह मूल जन्माला येणार नाही. युडीसीत डॉ. मंजिरी मुखर्जी या त्याच्यावर संशोधन करत आहेत.ऑरगॉनिक केमिस्ट्रीतून एमएससी झाल्यावर फूड टेक्नॉलजीत जाता येतं का ? रिसर्चमध्ये काही करता येतं का ?डॉ.स्मिता लेले - ऑरगॅनिक केमिस्ट्रीतून शिक्षण झाल्यावर फूड टेक्नॉलॉजीत जाता येत नाही. पण त्याक्षेत्राशी निगडीत रिसर्चमध्ये काम करू शकता. म्हणजे तर तुम्ही एमएसीबाय रिसर्च घेतलं तर तुमचा जो गाईड असेल तो फूड टेक्नॉलॉजीशी संबंधित असायला हवा. किंवा अन्नपदार्थांच्या मोठ्या कंपनीत फूडशी रिलेटेड काही रिसर्च केले की जाता येईल. पण शैक्षणिदृष्ट्या जाता येणार नाही.फिजिक्समधून फूड टेक्नॉलजीत जाता येईल का ?डॉ.स्मिता लेले - फिजिक्समधून बायोटेक्नॉलॉजी नाही पण बायो फिजिक्समध्ये मात्र नक्की जाता येईल. पीएचडी करताना बायोटेक्नॉलॉजी आणि बायोफिजिक्समध्ये जाता येईल. हे इन्डायरेक्ट जम्पिंग करावं लागेल.फूड टेक्नॉलॉजी या विषयातलंपरदेशी शिक्षण आणि तिथल्या संधीविषयी काय सांगाल ?डॉ.स्मिता लेले - परदेशात विशेषत: अमेरिकेत ओपन शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तसंच फूड टेक्नॉलॉजीतल्या वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तिथे शिक्षणासाठी सहज जाता येईल. अमेरिकेत जाऊन मेकअप कोर्सेस करता येतील. मेकअप कोर्सेस म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिट दुस-याविषयाचं घेऊन स्वत:ला त्या पातळीपर्यंत आणू शकणं. युडीसीटीमध्ये इंटर चेंजेबल कोर्स सुरू करण्याचं आमचं स्वप्नं आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स करून थेट फूड टेक्नॉलजी आला , असं होणार नाहीये. तर फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलॉजी हे फूड टेक्नॉलॉजीशी संलग्न विषय आहेत. तर अशा विषयांना सलग्न करून फूड टेक्नॉलजीत येता येईल किमान इतकं तरी आम्ही करणार आहोत. आता भारतात तशी व्यवस्था नाहीये. पण परदेशात मेकअप कोर्सची व्यवस्था आहे.आहारांचा संदर्भ हा औषधांशीही जोडला जातो. न्युट्रॉस्युटीकल विषयी सांगा ?डॉ.स्मिता लेले - पूर्वी ऍन्टीबायॉटीकचं पर्व होतं. म्हणजे जंतूंना मारण्याचं पर्व होतं. आता प्रो बायॉटीक म्हणजे चांगल्या जंतूंचं संरक्षण आणि संवर्धन करा. न्युट्रॉस्युटिकल म्हणजे औषधांचा वापर टाळा आणि असा औषधयुक्त आहार घ्या. फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगळ्याप्रकारच्या करिअरसाठी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी काय स्कोप आहे ?डॉ.स्मिता लेले - स्मॉलस्केल इंडस्ट्रीसाठी फूड टेक्नॉलॉजीतला फळ आणि भाज्यांवर प्रक्रिया करणारा व्यवसाय खूप चांगला आहे. कारण भारतात फळ आणि भाज्यांच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. पण प्रक्रियेअभावी त्यांची नासाडी भरपूर होते. त्यामुळे जर या फळ आणि भाज्यांवर प्रक्रिया झाली तर त्यांची नासाडी थांबेल.बीएससी बायो टेक्नॉलॉजीनंतर फूड टेक्नॉलॉजीत करिअर करता येईल का ?डॉ.स्मिता लेले - नाही. त्याच्याऐवजी बायो टेक्नॉलॉजीतून एमटेक करावं.फूड टेक्नॉलजीचा कार्यक्रम जसा युडीसीआय शिवाय होऊ शकत नाही तसा सीएफटीआरआय शिवायही होऊ शकणार नाही. सीएफटीआरआय म्हणजे काय ?डॉ.स्मिता लेले - सीएसआरआयच्या प्रयोगशाळा असतात , एनसीएल ही केमिकलची अख्ख्या देशातली प्रयोगशाळा पुण्याला आहे. तशी फूडची संपूर्ण देशातली प्रयोगशाळा म्हैसूरला आहे. ती सीएफटीआरआय या नावानं ओळखली जाते. सीएफटीआरआय म्हणजे सेंट्रल फूड इन्व्हेस्टिगेशन रिसर्च.त्यामुळे म्हैसूरमध्ये फूड प्रोसेसिंगचे छोटे छोटे उद्योग उदयास आले आहेत. हे कारखाने सीएफटीआरआयच्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन बाजारात आणतात. आहेत.पदार्थ विकणेबल बनवणं वेगळं असतं. पण तो लोकांपर्यंत कसा न्यायचा ? फूड प्रोसेसिंगचे व्यवसाय करताना त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे ?डॉ.स्मिता लेले - महाराष्ट्र सरकारानं राजीव गांधी सायन्स ऍन्ड फूड टेक्नॉलजीचे काही बाय इन्व्हिटेशन प्रयोग दिले आहेत. माझ्याकडे डीहायड्रेशन ऑफ फ्रुटस् ऍण्ड व्हेजिटेबलचा एक प्रकल्प आहे. ज्याचं लवकरच बारामतीत उद्घाटन होईल. इन्स्टिट्यूट ऑफ रुरल पेडियाट्रीक ही मूकबधिरांची संस्था चालवणारे डॉ. मोकाशी आहेत. त्यांच्याकडे आम्ही हा प्रकल्प करत आहोत. त्यामाध्यामातून फ्रूट व्हेजिटेबल्सची एक छोटीशी चेन आम्ही तयार करत आहोत. छोट्या उद्योजकांना युडीसीटीच्या तंत्रज्ञानाची माहिती कळेल. आम्ही त्यांना क्वालिटी कंट्रोलसाठीही मार्गदर्शन द्यायला तयार आहोत. याची माहिती www.rgcuict.com या वेबसाइटवर मिळेल. यावर माझ्या प्रॉजेक्टची माहिती मिळेल. मलाही जर कोणी लिहिलं तर मी माहिती सांगणार.शेतकी विषयातून इंजिनिअरिंग केल्यावर फूड टेक्नॉलॉजीत एम्. टेक करता येईल का ?डॉ.स्मिता लेले - नाही. त्याऐवजी शेतकी विषयातून एम्. टेक करावं. फूड टेक्नॉलॉजी या विषयात स्वतंत्रपणे काम करता येईल. म्हणजे संशोधन करता येईल.फूड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस1. सीएफटीआरआय, म्हैसूर - 570 020फोन : 821-2514310/2514760www.cftri.com2. यूडीसीटी, मुंबईफोन : 022-4145616www.uict.org3. एसएनडीटी कॉलेजमुंबईफोन : 022-220318794. इंडियन ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटनवी दिल्लीफोन : 011-2584 64341/25846082www. iari.res.in5. स्कूल ऑफ हेल्थ सायन्सकालिकत युनिव्हर्सिटी, केरळफोन : 493-2400288/280 1140www.unical.ac.in6. सरदार पटेल युनिव्हर्सिटी, गुजरातफोन : 02692 30009,02692 2268007. जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी,हैदराबाद - 000 072फोन : 040-23158661/231586648. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली110007फोन : 011-276678349.एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, पुणेफोन : 20-2691 2907www.mitcft.net फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 2) फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 3)

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 03:21 PM IST

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 1)

टेक ऑफचा विषय होता फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर. सध्याच्या करिअरक्षेत्रातली फूड टेक्नॉलॉजी ही बूमिंग इंडस्ट्री आहे. पण फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला नीट माहिती नसतं. कधी कधी क्वालिटी कंट्रोल, न्युट्रीशन याबाबी फूड टेक्नॉलॉजीमध्ये येतात तेव्हा गोंधळायला होतं. पण प्रत्यक्षात फूड टेक्नॉलॉजी हे इंजिनिअरिंग सायन्स असून अन्नाचा आयुषात होणार उपयोग हे फूड टेक्नॉलॉजी सांगतं. या फूड टेक्नॉलॉजीबद्दल बोलण्यासाठी ' टेक ऑफ 'मध्ये इंजिनिअर प्रो.डॉ.स्मिता लेले आल्या होत्या. डॉ. स्मिता लेले ह्या यु.डी.सी.टी.त फूड इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विभागाच्या प्रमुख आहेत. त्या स्वत: बायो केमिकल इंजिनिअर आहेत.फूड टेक्नॉलॉजीत एखादा खाद्यपदार्थ किंवा वस्तू मोठ्याप्रमाणावर तयार केली जाते. त्यात प्रिझरवेटीव्हज् आलेत. त्यामुळे फूड टेक्नॉलजी हे शास्त्र थोडंसं प्रथम दर्शनी तरी केटरिंग ड्रिव्हन आहे, असंच वाटतं. पण फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय ?डॉ.स्मिता लेले - खूप जणांच्या मनात हाच प्रश्न असतो. कित्येकांना फूड टेक्नॉलॉजी म्हणजे स्वंयपाक करण्याचं शास्त्र, रेसिपी, केटरिंग, न्युट्रीशन व्यवसायाशी निगडीत असणारं शास्त्र असंच वाटतं. पण तसं नाहीये. तर केमिकल इंजिनिअरिंगची फूड टेक्नॉलजी ही सुपर स्पेशल ब्रॅन्च आहे. समजा एकाला दोन हजार पोळ्या हव्या आहेत. त्यासाठी 100 बायकांना पोळपाट लाटणं घेऊन कामाला लावलं आणि दोन हजार पोळ्या तयार करणं याला फूड टेक्नॉलॉजी म्हणत नाहीत. पण जेव्हा एखादी ब्रॅन्डेड खाद्यपदार्थ कारखान्यात तयार केला जातो तेव्हा इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट आणि केमिकल इंजिनिअरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते खाद्यपदार्थ तयार केले जातात. ते खाद्यपदार्थ एकसारखेच असावे लागतात. म्हणजे फूड टेक्नॉलॉजीमध्ये कन्सिस्टंट क्वालिटीला फार महत्त्व असतं. तयार खाद्यपदार्थांतलं एकसारखेपण असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे तर. हा एकसारखेपणा तुम्ही कसा काय साधतात ? डॉ.स्मिता लेले - तयार पदार्थांमध्ये एकसारखेपणा येण्यासाठी सर्वात आधी तंत्रज्ञानाची माहिती असणं गरजेचं आहे. पदार्थाचं टेक्श्चर कायम राहिलं पाहिजे. तयार पदार्थ चांगला टिकण्यासाठी पॅकेजिंग काय करायचं याचाही विचार केला जातो. हा पदार्थ कोणत्या पद्धतीनं खायला देणार आहात म्हणजे रेडी टू इट पद्धतीनं देणार आहात की अर्धा कच्चा देणार आहात, तो कोणाला खायला देणार आहात म्हणजे फ्रोजन आहे की परदेशी पाठवणार आहात. आणि शेवटी जो खातो त्या खाणा-याला त्या पदार्थाची चव, आनंद आणि त्या पदार्थातली पोषणमूल्य मिळाली पाहिजेत. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजीत पदार्थावर संस्कार करताना मायक्रो बायोलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, बायो केमिस्ट्री आणि बरंच काही पाहायला लागतं. विद्यार्थ्यांना फूड टेक्नॉलॉजी हा विषय 12वीत असतानाच माहीत असणं आवश्यक आहे का ? कारण फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स हा 12वी नंतरच सुरू होतो... डॉ.स्मिता लेले - हो. भारतात एल्.आय.टी नागपूरमध्ये, कानपूरला किंवा युडीसीटी मुंबईमध्ये फूड टेक्नॉलॉजीचे निरनिराळे कोर्सेस आहेत. ते इतर इतर बीटेक्स अभ्यासक्रमांसारखेच आहेत. त्या अभ्यासक्रमांचा 12 4 हा पॅटर्न आहे. आणि आपली जी स्टॅण्डर्ड इंजिनिअरिंगच्या प्रवेशांच्या ऍडमिशन्सची निवड प्रक्रिया आहे. तशीच प्रक्रिया फूड टेक्नॉलजीच्या अभ्यासक्रमांची आहे. विद्यार्थ्यांना जर फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांनी 10 वीपासून त्या विषयाची माहिती गोळा करायला लागलं पाहिजे. आजकाल विद्यार्थ्यांना ते सहजच शक्य आहे. कारण इंटरनेट. विद्यार्थ्यांनी तो पर्याय आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पहिजे. डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशनची वेबसाइट प्रत्येक वेळी पाहिली पाहिजे. 10 वीपासूनच जर एखाद्या क्षेत्रातल्या करिअरचं प्लॅनिंग करायचं झालं तर आधी स्कोपचा विचार केला जातो. फूड टेक्नॉलॉजीतल्या स्कोपविषयी सांगा ?

डॉ.स्मिता लेले - जेव्हा आपली लोकसंख्या वाढते तेव्हा सर्व्हिस इंडस्ट्री आणि खाणंपिणं लागतं. जरी छान आरोग्यदायी आयुष्य जगायचं झालं औषधं लागणार नाहीत. पण खाणंपिणं मात्र नक्की लागलेच ना. शेतात पिकणारी वस्तू जर सगळ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आपल्या देशात 40 ते 50 टक्के अन्न फुकट जातं. त्यामुळे अन्न फुकट जाऊ नये याकरता त्यावर प्रक्रिया होणं गरजेचं आहे. कित्येकदा अन्नावर प्रक्रिया केल्यानं त्याचा दर्जाही सुधारतो. भारतासारख्या वाढत्या लोकसंख्येच्या देशाला अन्नाचा पुरवठा करायचा असेल तर तो तंत्रज्ञानाचा वापर करूनच करायला हवा. आपल्याकडे प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थाविषयी फारशी जागृती नाहीये. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांविषयीचा लोकांचा दृष्टिकोन अजूनच बायस आहे. फूड टेक्नॉलॉजी हे बूम करिअर आहे हे पाहता लोकांची मतं बदलायला काय केलं पाहिजे ?डॉ.स्मिता लेले - सर्वात पहिलं म्हणजे लोकांची मतं बदलायला पाहिजेत. चालतं बोलतं उदाहरण द्यायचं झालं तर डब्यातल्या अन्नाचं घेऊ. पूर्वी डब्यातलं अन्न हे चांगलं नसतं. असं समजलं जायचं. आता रिटॉर्ट ही पद्धती आली आहे. त्या पद्धतीत डब्यांची जागा ही पाऊचनं घेतली आहे. भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेनं त्यांनी पाऊचेच स्वीकारली आहेत. खरं तर टेक्निकली पाऊचेच आणि डबे हे सारखेच आहेत. पण डब्यातलं अन्न वाईट ही आपण 20 व्या शतकातली कल्पना कालबाह्य होत आहे. ज्यांना भारतीय पदार्थ खावेसे वाटतात, ते परदेशी भारतीय आता पाऊच बंद खाद्यपदार्थांना जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत. एकंदरीतच फूड इंडस्ट्री ही वाढणारी इंडस्ट्री आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर पुढे जाऊन जर फूड टेक्नॉलॉजीत करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांचा काय प्रकारचा माइंडसेट असला पाहिजे ? कोणती मुलं या फिल्डमध्ये जास्त यशस्वी होतात ? डॉ.स्मिता लेले - कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी त्या क्षेत्राची आवड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं कठोर मेहनतीची तयारी असणं गरजेचं आहे. पण फूड टेक्नॉलॉजीचं मात्र थोडंसं वेगळं आहे. सुरुवातीला सांगितलेल्या दोन गुणांची फूड टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करताना गरज आहेच. पण त्याचबरोबरीनं विद्यार्थ्यांनी अधिक जबाबदार असलं पाहिजे. फूड आणि औषधं या दोन गोष्टी दुस-यांच्या पोटात जात असल्यानं जबाबदारीवची जाणीव ही असायलाच पाहिजे. अनावधानानं एखाद्यावेळेस जर प्रमाण चुकलं तर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त जागृक असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीची कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट मुंबईत, महाराष्ट्रात कुठे आहेत ? त्या कॉलेजेसचा एलिजिबिलिटी क्रायटेरिआ काय आहे ? फूड टेक्नॉलॉजीस्टच्या कोर्सेसचा ड्युरेशन काय आहे ? कोर्सेसची फी काय आहे ? डॉ.स्मिता लेले - फूड टेक्नॉलजीचा 12वी नंतरचा कोर्स आहे त्याच्या ऍडमिशनची प्रोसही सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजसारखीच आहे. पीसीएमच्या बेससवर आणि सीईटी परीक्षेप्रमाणं ऍडमिशन होतं. युडीसीमध्ये फूड टेक्नॉलॉजीचा एम.टेक अभ्यासक्रम येत्या जून महिन्यापासून सुरू होत आहे. देशातला हा पहिलाच अभ्यासक्रम आहे जो बायोटेक्नॉलॉजी विभागानं स्पॉन्सर केलेला आहे. केमिकल इंजिनिअरिंग केलेल्यांना या कोर्ससाठी ऍडमिशन घेता येईल. पण त्याआधी गेट परीक्षा देणं गरजेचं आहे.

फूड टेक्नॉलॉजीमधल्या रिसर्चचे एरियाज कोणते आहेत ?डॉ.स्मिता लेले - फूड टेक्नॉलॉजी हा इंटर डिसिप्लिनरी विषय आहे. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीशी निगडीत वेगवगळे विषय येतात. अन्नाची नासाडी होऊ नये याकरता ते चांगलं कसं टिकवता येईल या मायक्रोबायोलॉजीतल्या विषयाचाही यात अभ्यास केला जातो. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजीत मायक्रोबायॉलॉजीतल्या याही विषयावर संशोधन करता येईल. बायो केमिस्ट्री, बायो टेक्नॉलॉजीचे जे विषय आहेत ते पोषणमूल्यांच्या दृष्टीनं फूड टेक्नॉलॉजीत अभ्यासले जातात. त्यावरही संशोधन करता येईल. किंवा आता बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या दृष्टीनं म्हणजे शेतीच्या जे नंतर होतं ते पोस्ट हारवेस्टिंग, पेस्ट रेझिस्टंट, अधिक अन्नाची निर्मिती करणं म्हणजे या प्रकारच्या शेतकीय बयोटेक्नॉलॉजीचाही उपयोग फूड टेक्नॉलॉजीत होतो. नंतर या शेतीच्या उत्पादनांवर कशी प्रक्रिया केली जाईल यावरही फूड टेक्नॉलॉजीत वापर करता येतो. उदाहरणार्थ बोलायचं झालं तर टोमॅटोचं घेऊया. टोमॅटोतून लायकोबीन नावाचा घटक मिळतो. कोणत्या प्रकारच्या टोमॅटोचं उत्पादन केलं तर त्यातून सर्वात जास्त प्रमाणात लायकोबीन नावाचा घटक मिळणार, तर तो टोमॅटो बनवण्यासाठी काय करायला पाहिजे... अशाप्रकारचं संशोधन करायला पाहिजे. सीताफळ आवडणा-यांना बीनबियांचं सीताफळ खायला मिळालं तर...अशाप्रकारचं संशोधन करता येईल. या फूड टेक्नॉलॉजीमध्ये फूड केमिस्ट्रीवरही संशोधन करता येतं. फंडामेंटल लेव्हलला वेगवेगळे मॉलिक्युल एकमेकांशी कसे वागतात यावरही संशोधन करता येतं. केमिकल इंजिनिअरिंगची फूड टेक्नॉलॉजी ही स्पेशलाईज्ड शाखा असली तरी फूडचे मॉलिक्युल हे सेन्सिटीव्ह असतात. अन्नावर प्रक्रिया करताना त्या मॉलिक्युलशी फार प्रेमानं हाताळावे लागतात. तेव्हा हाही फूड टेक्नॉलजीतल्या स्पेशलायझेशनचा विषय असू शकतो. हल्ली फूड टेक्नॉलॉजीची एक नवीन शाखा उदयास आली आहे. तिचं नाव आहे न्युट्रोजिनॉमिक्स. तर त्यातही स्पेशलायझेशन करता येईल.न्युट्रोजिनॉमिक्स या नवीन शाखेविषयी सांगा ?डॉ.स्मिता लेले - काही मुलांमध्ये जन्मापासूनच काही डिफेक्टस् असतात. तर अशा मुलांना जन्मापासूनच अशाप्रकारचं खाणं द्यायचं ज्यानं ते डिफेक्टस् कमी होतील. किंवा असं खाणं आईला द्यायचं... त्यामुळे असं डिफेक्टीव्ह मूल जन्माला येणार नाही. युडीसीत डॉ. मंजिरी मुखर्जी या त्याच्यावर संशोधन करत आहेत.ऑरगॉनिक केमिस्ट्रीतून एमएससी झाल्यावर फूड टेक्नॉलजीत जाता येतं का ? रिसर्चमध्ये काही करता येतं का ?डॉ.स्मिता लेले - ऑरगॅनिक केमिस्ट्रीतून शिक्षण झाल्यावर फूड टेक्नॉलॉजीत जाता येत नाही. पण त्याक्षेत्राशी निगडीत रिसर्चमध्ये काम करू शकता. म्हणजे तर तुम्ही एमएसीबाय रिसर्च घेतलं तर तुमचा जो गाईड असेल तो फूड टेक्नॉलॉजीशी संबंधित असायला हवा. किंवा अन्नपदार्थांच्या मोठ्या कंपनीत फूडशी रिलेटेड काही रिसर्च केले की जाता येईल. पण शैक्षणिदृष्ट्या जाता येणार नाही.फिजिक्समधून फूड टेक्नॉलजीत जाता येईल का ?डॉ.स्मिता लेले - फिजिक्समधून बायोटेक्नॉलॉजी नाही पण बायो फिजिक्समध्ये मात्र नक्की जाता येईल. पीएचडी करताना बायोटेक्नॉलॉजी आणि बायोफिजिक्समध्ये जाता येईल. हे इन्डायरेक्ट जम्पिंग करावं लागेल.फूड टेक्नॉलॉजी या विषयातलंपरदेशी शिक्षण आणि तिथल्या संधीविषयी काय सांगाल ?डॉ.स्मिता लेले - परदेशात विशेषत: अमेरिकेत ओपन शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तसंच फूड टेक्नॉलॉजीतल्या वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या संधी असल्यामुळे तिथे शिक्षणासाठी सहज जाता येईल. अमेरिकेत जाऊन मेकअप कोर्सेस करता येतील. मेकअप कोर्सेस म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिट दुस-याविषयाचं घेऊन स्वत:ला त्या पातळीपर्यंत आणू शकणं. युडीसीटीमध्ये इंटर चेंजेबल कोर्स सुरू करण्याचं आमचं स्वप्नं आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स करून थेट फूड टेक्नॉलजी आला , असं होणार नाहीये. तर फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलॉजी हे फूड टेक्नॉलॉजीशी संलग्न विषय आहेत. तर अशा विषयांना सलग्न करून फूड टेक्नॉलजीत येता येईल किमान इतकं तरी आम्ही करणार आहोत. आता भारतात तशी व्यवस्था नाहीये. पण परदेशात मेकअप कोर्सची व्यवस्था आहे.आहारांचा संदर्भ हा औषधांशीही जोडला जातो. न्युट्रॉस्युटीकल विषयी सांगा ?डॉ.स्मिता लेले - पूर्वी ऍन्टीबायॉटीकचं पर्व होतं. म्हणजे जंतूंना मारण्याचं पर्व होतं. आता प्रो बायॉटीक म्हणजे चांगल्या जंतूंचं संरक्षण आणि संवर्धन करा. न्युट्रॉस्युटिकल म्हणजे औषधांचा वापर टाळा आणि असा औषधयुक्त आहार घ्या. फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगळ्याप्रकारच्या करिअरसाठी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी काय स्कोप आहे ?डॉ.स्मिता लेले - स्मॉलस्केल इंडस्ट्रीसाठी फूड टेक्नॉलॉजीतला फळ आणि भाज्यांवर प्रक्रिया करणारा व्यवसाय खूप चांगला आहे. कारण भारतात फळ आणि भाज्यांच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. पण प्रक्रियेअभावी त्यांची नासाडी भरपूर होते. त्यामुळे जर या फळ आणि भाज्यांवर प्रक्रिया झाली तर त्यांची नासाडी थांबेल.बीएससी बायो टेक्नॉलॉजीनंतर फूड टेक्नॉलॉजीत करिअर करता येईल का ?डॉ.स्मिता लेले - नाही. त्याच्याऐवजी बायो टेक्नॉलॉजीतून एमटेक करावं.फूड टेक्नॉलजीचा कार्यक्रम जसा युडीसीआय शिवाय होऊ शकत नाही तसा सीएफटीआरआय शिवायही होऊ शकणार नाही. सीएफटीआरआय म्हणजे काय ?डॉ.स्मिता लेले - सीएसआरआयच्या प्रयोगशाळा असतात , एनसीएल ही केमिकलची अख्ख्या देशातली प्रयोगशाळा पुण्याला आहे. तशी फूडची संपूर्ण देशातली प्रयोगशाळा म्हैसूरला आहे. ती सीएफटीआरआय या नावानं ओळखली जाते. सीएफटीआरआय म्हणजे सेंट्रल फूड इन्व्हेस्टिगेशन रिसर्च.त्यामुळे म्हैसूरमध्ये फूड प्रोसेसिंगचे छोटे छोटे उद्योग उदयास आले आहेत. हे कारखाने सीएफटीआरआयच्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन बाजारात आणतात. आहेत.पदार्थ विकणेबल बनवणं वेगळं असतं. पण तो लोकांपर्यंत कसा न्यायचा ? फूड प्रोसेसिंगचे व्यवसाय करताना त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे ?डॉ.स्मिता लेले - महाराष्ट्र सरकारानं राजीव गांधी सायन्स ऍन्ड फूड टेक्नॉलजीचे काही बाय इन्व्हिटेशन प्रयोग दिले आहेत. माझ्याकडे डीहायड्रेशन ऑफ फ्रुटस् ऍण्ड व्हेजिटेबलचा एक प्रकल्प आहे. ज्याचं लवकरच बारामतीत उद्घाटन होईल. इन्स्टिट्यूट ऑफ रुरल पेडियाट्रीक ही मूकबधिरांची संस्था चालवणारे डॉ. मोकाशी आहेत. त्यांच्याकडे आम्ही हा प्रकल्प करत आहोत. त्यामाध्यामातून फ्रूट व्हेजिटेबल्सची एक छोटीशी चेन आम्ही तयार करत आहोत. छोट्या उद्योजकांना युडीसीटीच्या तंत्रज्ञानाची माहिती कळेल. आम्ही त्यांना क्वालिटी कंट्रोलसाठीही मार्गदर्शन द्यायला तयार आहोत. याची माहिती www.rgcuict.com या वेबसाइटवर मिळेल. यावर माझ्या प्रॉजेक्टची माहिती मिळेल. मलाही जर कोणी लिहिलं तर मी माहिती सांगणार.शेतकी विषयातून इंजिनिअरिंग केल्यावर फूड टेक्नॉलॉजीत एम्. टेक करता येईल का ?डॉ.स्मिता लेले - नाही. त्याऐवजी शेतकी विषयातून एम्. टेक करावं. फूड टेक्नॉलॉजी या विषयात स्वतंत्रपणे काम करता येईल. म्हणजे संशोधन करता येईल.फूड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस1. सीएफटीआरआय, म्हैसूर - 570 020फोन : 821-2514310/2514760www.cftri.com2. यूडीसीटी, मुंबईफोन : 022-4145616www.uict.org3. एसएनडीटी कॉलेजमुंबईफोन : 022-220318794. इंडियन ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटनवी दिल्लीफोन : 011-2584 64341/25846082www. iari.res.in5. स्कूल ऑफ हेल्थ सायन्सकालिकत युनिव्हर्सिटी, केरळफोन : 493-2400288/280 1140www.unical.ac.in6. सरदार पटेल युनिव्हर्सिटी, गुजरातफोन : 02692 30009,02692 2268007. जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी,हैदराबाद - 000 072फोन : 040-23158661/231586648. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली110007फोन : 011-276678349.एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, पुणेफोन : 20-2691 2907www.mitcft.net

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 2)

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 3)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close