S M L

माझा भारत देश ... (भाग - 2 )

भारताच्या प्रतिज्ञेतली दुसरी ओळ काय आहे तर... माझ्या देशावर माझं प्रेम आहे... डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग नि त्यांचा गडचिरोलीतला शोधग्राम प्रकल्प म्हणजे याच ओळीचं प्रतीक आहे. डॉ. अभय बंग सांगतात, " भारत हा माझा देश आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला नेहमी प्रश्न पडतो, की मी कुणाचा. आणि माझ्या आतून उत्तर येत की माझा. मग ही जमीन, हे गाव , हे पर्वत आणि तिथली लोकंही माझीच आहेत आणि या सगळ्यांसाठी काही तरी करावी ही माझी आंतरिक इच्छा होती. पण एक... की मी हे सगळं दुस-यांच्या आनंदासाठी केलं नाही तर मी ते माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी केलं. स्वत:च्या आनंदासाठी काहीतरी करावं या इर्ष्येनं अभय बंग आपल्या मायदेशी परतले आणि 23 त्यांनी वर्षांपूर्वी पत्नी डॉ. राणी बंग यांच्यासह शोधग्राम उभं केलं. तेव्हा बंग दाम्पत्यांसाठी करिअर नावाची गोष्ट दुय्यम होती. " आयुष्य कितीदा मिळालंय तर एकदा. या आयुष्यात पैसा किती आहे तर अनंत... त्यामुळे एकदाच मिळालेल्या आयुष्याला महत्त्व द्यायचं की आयुष्यातलं पासबुक मोठं करणा-या आकड्यांना महत्त्व द्यायचं. हा सारासार विचार करूनच मी मिळालेलं आयुष्य लोकांसाठी काहीतरी करण्याच्या कार्यात मी स्वत:ला वाहून घेतलं, " डॉ. अभय बंग सांगत होते. " सुरुवातीला जेव्हा मी आदिवासी पाड्यात काम करायला घेतलं तेव्हा ग्रामीण भागातलं काम कसं असतं याची काहीच कल्पना नव्हती. माझ्या आयुष्यात मी गरिबी कधीही पाहिलेली नव्हती. पण इकडे आल्यावर हळुहळु इथल्या वातावरणाशी मी जुळवून घेतलं. मग इथलीच झाले. मला काही विशिष्ट प्रकारचं काम करायचंय असं मी ठरवलं नव्हतं. पण अभयबरोबर काम करताना वाटलं की तेच काम माझं आहे, " डॉ. राणी बंग सांगत होत्या. " मी आणि राणी कॉलेजपासूनच एकत्र होतो. माझ्या आणि राणीच्या कल्पना सोबतच विकसित झाल्यायेत. राणी आणि मी एकच आहे, " असं डॉ. अभय बंगांचं म्हणणं आहे. आदिवासींसोबत बंग दाम्पत्यांनी केलेल्या कामाकडे आज एक मॉडेल म्हणून बघितलं जातंय. कुपोषण कमी करण्यासाठी आणि स्त्रियांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी इथे अनेक प्रयोग करण्यात आलेत आणि ते यशस्वीही झालेत. त्याविषयी डॉ. अभय बंग सांगतात, " लोकांच्या आरोग्याच्या समस्या कोणत्या आणि त्या सोडवण्यासाठी दिल्लीत बसून लोकांनी ठरवायचं हे चूक आहे. त्यामुळं आम्ही लोकांना विचारलं, लोकांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेतल्या आणि नंतर त्यावर वैज्ञानिक प्रयोग केलेत, " हे प्रयोग झाले सर्च आणि शोधग्राममध्ये झालेत. सर्चच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्य समस्यांचा शोध घेण्यात आला. त्याविषयी राणी बंग सांगतात, " सगळ्यात जास्त समस्या महिलांच्या होत्या. त्या सोडवण्यासाठी 50 गावांमधील 85 सुईनींना प्रशिक्षण दिलं. आरोग्याचा प्रश्न फक्त उपचाराने सुटणारा नव्हता म्हणूनच शोधग्राम लोकांच्या इतर प्रश्नांकडेही लक्ष देत होतं. " त्यातूनच दारुबंदी आंदोलनाचा जन्म झाला. दारुबंदी आंदोलनाविषयी डॉ. अभय बंग सांगतात, " ' गावातल्या बायका म्हणायच्या की तुम्ही औषधं देऊन आम्हाला बरं करतात. पण इथल्या दारूचं करायचं काय असा प्रश्न गावातल्या बायका करायच्या. मग मी त्या दृष्टीनं प्रयत्न करायला लागलो. जिल्ह्याचं बजेट काढलं. 14 कोटी जिल्ह्याचं बजेट होतं. तर 20 कोटी रुपये दारूचा खर्च होता. त्यामुळं गावात गरिबी का आहे, याचं उत्तर आपोआप मिळालं. त्यासाठी आम्ही दारुबंदी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात गडचिरोलीतल्या 600 गावांचा समावेश होता. नंतर नंतर हे आंदोलन लोकांनीचं पुढं नेलं. " शोधग्राममधल्या कामामुळे एकीकडे सरकारची धोरणं बदलत होती. तर दुसरीकडे आरोग्यनीतीही डॉ. बंग यांनी बदलायला भाग पाडली. हे सगळं त्यांनी केलं ते स्वत:च्या आनंदासाठी. त्याच ओढीने बंग इथे आले. त्यांनी इथे आनंदाचं एक ग्राम मोठं केलं. आता बंग दाम्पत्य युवकांच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवत आहेत. ते युवकांच्या अर्थपूर्ण जीवनाचा शोध आणि लोकांच्या समस्यांची सांगड घालून ' निर्माण ' च्या माध्यमातून करत आहेत. " आपल्या आवडीचं काम जर असेल तर जगामध्ये तुम्ही कुठेही राहू शकता. " असं डॉ. राणी बंग म्हणाल्या. पेशानं डॉक्टर असलेल्या या बंग दाम्पत्याचे क्रांतिकारी विचार आणि प्रयोग समोरच्याला थक्क करतात. माझ्या देशातल्या विविधतेने आणि समृद्धतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे... हेही भारताच्या प्रतिज्ञेतलं एक वाक्य आहे. आणि ते खरंही आहे. त्याविषयी शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर सांगतात, " गाण्यातली संगीतातली विविधता खूप मोठी आहे. भारतीय संगीताचे स्वर एका पिढीतून दुसर्‍या पिढीत, एका गळ्यातून दुसर्‍या गळ्यात प्रवास करत येतात. हे परंपरेने इथपर्यंतआले आहेत. " संगीतातली ही परंपरा आपल्या देशात खर्‍या अर्थानं भारतीय आहे. इथे हिंदू-मुस्लिम हा भेद नाही... भारतीय संगीताच्या परंपरेला स्वत:चा शोध घेणारं संगीत म्हटलं जातं ते उगाच नाही. लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत आवाका खूप मोठा आहे. पण त्यातली धून एकच आहे. यासगळ्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे सुरांचा. संगीताच्या परंपरा, घराणी ही जरी विविधतेनं नटलेली असली तरी त्यांतला राग हा एकच आहे. पण सादरीकरण वेगळं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2009 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close