S M L

नाटक करताना दडपण येणार - सत्यदेव दुबे

10 डिसेंबर, पुणे प्राची कुलकर्णी " मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झालाये, त्यानं मनात भीती वाटायला लागली आहे. तरुण तरुण मुलांचा संबंध दहशतवादाशी आहे, हे ऐकल्यावर काळजात धस्सं व्हायला होतंय. नाटक करण्याचीच भीती वाटू लागली आहे, " ही भीतीची भावना ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे यांनी पुण्यात केली आहे. रूपवेध प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा तन्वीर सन्मान पुण्यात गो.पु.देशपांडेंच्या हस्ते सत्यदेव दुबेंना प्रदान करण्यात आला. अनेक गोष्टींचा दबाव येत असल्यानं मला नाटक करायचीच भीती वाटायला लागली आहे असं मत ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे यांनी व्यक्त केलं आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रंगभूमीवर अखिल भारतीय स्तरावर मोठं काम करणार्‍या रंगकर्मीला तन्वीर सन्मान देण्यात येतो. एक लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तन्वीर हा दीपा आणि श्रीराम लागु यांचा मुलगा, ज्याचं अपघातात निधन झालं.यंदाचा तन्वीर सन्मान पंडित सत्यदेव दुबेंना देण्यात आला. यावेळी बोलताना मुंबईवरच्या दहशतवादाची छाया दुबेजींवर जाणवत होती. दुबेंनी अनेक कलाकारांना घडवलं. कार्यक्रमाला आवर्जून आलेल्या नीना कुलकर्णींकडून दुबेंविषयीचे अनुभव ऐकायला मिळाले. " दुबेंच्या थिएटरमध्ये एक प्रकारची मोकळीक असते. प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य असतं," असं अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या. ज्येष्ठ नाटककार गजानन परांजपेंना यावेळी तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारानं गौरवण्यात आलं .यावेळी मकरंद साठे, श्रीकांत कानीटकर या मान्यवरांसह अनेक नाट्यरसिक पुणेकर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2008 12:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2008 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close