S M L

माझा भारत देश... (भाग - 1)

मानवाच्या 5000 वर्षांनंतरच्या वाटचालीत लोकशाहीचा शोध लागतो. डॉ. आंबेडकर नावाचा एक द्रष्टा लोकशाहीचं स्वप्न प्रत्यक्षात आणतो. हे स्वप्न असतं समतेचं, स्वातंत्र्याचं आणि बंधुत्वाचं... त्यासाठी लागतो मनामनात निर्धार... फक्त शाळेच्या पुस्तकातच नाही तर प्रत्येकाच्या मनामनात जागावी लागते प्रतिज्ञा... तुम्हाला भारत कसा वाटतो, तुम्हाला भारताबद्दल काय वाटतं, तुम्हाला भारत कसा दिसतो असे प्रश्न विचारताच प्रत्येक जण आपापल्या परीनं भारताचं वर्णन करेल... कुणी म्हणेल की माणसाचं शरीर म्हणजे भारत. या भारतात जम्मू-काश्मीर म्हणजे डोकं, महाराष्ट्र म्हणजे उजवा हात तर डावा हात म्हणजे पश्चिम बंगाल. कोणी हिरवळ म्हणजे भारत असं भारताचं वर्णन करेल तर कोणाला त्या प्रश्नांची उत्तरं देणंच कठीण जाईल... तर कोणी भारताचं वर्णन त्यांच्या जिल्ह्यांप्रमाणे करेल. एखादी चिमुरडी भारताचं वर्णन करताना तिच्या पुस्तकातली भारताची प्रतिज्ञा ती म्हणून दाखवेल... या सगळ्या भाऊगर्दीत स्मृतींची पानं पटापट मागे जातात आणि आठवतात त्या 92-93च्या हिंदू-मुस्लिमांच्या जातीय दंगली. बाबरी मशीद पाडली आणि हिंदू-मुसलमानांच्या दंगलींचं विध्वंसक रूप समोर आलं. ''लोकांनी मेहनतीनं आपली दुकानं थाटली होती, खूप वर्षांपासून एकमेकांशी गुण्यागोविंदानं नांदत होती... पण या दंगलीच्या ठिणगीनं ती एकी, त्या सलोख्याला, एकोप्याला मूठमाती दिली,'' वकार खान सांगत होते. ते धारावीतल्या मोहल्ला कमिटीचं काम पाहतात. वकारभाईंनी सांगितलेली ती एरव्ही सख्खे शेजारी असणार्‍या बांधवांची हकीकत होती. स्वातंत्र्यानंतर 46 वर्षांनंतर तसं घडलं होतं. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत दंगलीनं कित्येकांचं आयुष्य बरबाद केलं. इतक्या वर्षांत असं काय होतं की जे बदललं नव्हतं, असा प्रश्न पडतो. तेव्हा वकारभाई सांगतात, ''नॉनमुस्लीम जर मित्र असते तर बोलू शकलो असतो. त्यांच्याबरोबर मी जाऊन बोललो असतो. पण माझे नॉनमुस्लीम मित्र नव्हते.'' हीच कमी भरून काढण्यासाठी दंगलीनंतर ठिकठिकाणी मोहल्ला कमिटी सुरू झाल्या. धारावीत मोहल्ला कमिटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला तो भाऊ कोरडेंनी आणि त्यांच्या पुढाकाराला साथ मिळाली ती वकारभाईंची. धारावीच आपली कर्मभूमी मानणार्‍या वकारभाईंनी पोस्टर्स कल्पना पुढे आणली. धारावीतल्याच हिंदू, मुस्लीम, शीख आणि कॅथलिक धर्माच्या चार मुलांना एकत्र करून त्यांची पोस्टर्स तयार केली. त्यातून 'आपण सगळे एक आहोत' हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ती पोस्टर्स त्यांनी संपूर्ण धारावीभर लावली. त्याच पोस्टरमधल्या हिंदूच्या वेशातला मुलगा विकी खान 23 वर्षांचा झाला आहे. दंगलीच्या खाणाखुणा त्याच्या मनात पुसट झाल्या असतील. ''तो एक क्लिक दिल में हम सब एक है, लडाई फसाद बुरी चीज है, हेच शिकवून गेला," असं विकी म्हणतो. मोहल्ला कमिटीत आता पॉल, गिरीश, झुबेर आणि आयुब ही दुसरी पिढी काम करत आहे. जेव्हा हे चौघं एकत्र येतात तेव्हा परिसरातल्या लोकांना एकत्र धरून ठेवणार्‍या भन्नाट कल्पनांनी झपाटलेले असतात. फक्त झपाटलेले असत नाहीत तर ते झपाटलेपण प्रत्यक्षात आणतात. "आमच्या आतमध्ये आग आहे... पण ती दंगे घडवून येणार नाही यासाठी आहे. दोनचार तासांत परिस्थितीवर ताबा मिळवणारे आम्ही मानवी बॉम्ब आहोत आम्ही. लोकांना एकत्र मीटिंग घेऊन कळलेलं आहे की दंगली करण्यानं काही होणार नाही. काही भेटणार नाही. 92च्या दंगलीत लोकांनी जे भोगायचंय ते भोगलंय... आता असं काही झालं की लोक स्वत:हून पुढे येऊन सोडवून टाकतात," असं हे चौघे सांगतात. पॉल, आयुब, झुबेर आणि गिरीश यांची फिलॉसॉफी ही अशी सरळ, रोखठोक आणि स्वच्छ हेतू असलेली. पॉलच्याच भाषेत सांगायचं तर... इंटेन्शन देखो. यांच्यात कोणी लीडर नाही. त्याविषयी भाऊ कोरडे सांगतात, "मोहल्ला कमिटीचा कोणीएक नेता नव्हता. आपल्या परिसरात शांतता नांदावी यासाठी लोकांनी एकत्र येऊन काम केलं आहे. मोहल्ला कमिटीची बाजू म्हणजे लोक त्यात कोणत्याही एका राजकीय नेत्याचा सहभाग नव्हता. जेव्हा निरनिराळे एकत्र येतात त्यामुळे ते निर्णय घेतात. तो निर्णय हा कायमस्वरूपी असतो. तो निर्णय घेऊन लोक थांबले नाहीत तर त्यांच्या कामाची पद्धत, विचार आदान-प्रदान गेली दहा-बारा वर्षं सतत चालू आहे."तर अशी ही धारावी नावाच्या शांततेच्या, धार्मिक सलोख्याचं वातावरण असलेल्या मुंबईतल्या एका भागाची सफर. ती करताना थक्क व्हायला होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2009 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close