S M L

काळजी मतिमंद मुलांची

टॉक टाइमचा विषय होता काळजी मतिमंद मुलांची. याविषयावर बोलण्यासाठी आव्हान संस्थेच्या संचालिका वंदना कर्वे आल्या होत्या. अव्हान ही मतिमंदमुलांसाठी काम करणारी संस्था आहे. हल्ली मतिमंद मुलांची ओळख स्पेशल मुलं आहे. या स्पेशल मुलांची काळजी कशी घ्यायची या मुद्द्यावर वंदना कर्वे बोलल्या. स्पेशल मुलं लहान असतात तेव्हा पालकांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर,सवयींवर लक्ष ठेवावं. तसंच त्यांच्या शरीराच्या वाढीवर लक्ष ठेवायचं. डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तसंच त्याच्याबरोबर वावरताना सोपी भाषा वापरायची, जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. गाण्याच्या गोष्टींच्या कॅसेटस् ऐकवायच्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या भावना समजून घ्यायच्या. त्याच्या बरोबर चित्रं काढायची. चित्रांच्या भाषेतूनही स्पेशल मुलांशी बोलायचं. अशा मुलांशी कधीच हिडिस फीडस करून बोलायचं नाही. त्याची हिडिस फिडीस करणंही चांगलं नाही. त्यांच्याबरोबर वावरताना आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे, अशाप्रकारची महत्त्वाची माहिती वंदना कर्वे यांनी सांगितली. भारतात दोन कोटी मुलं मतिमंद आहेत. त्यामुळे स्वत:ला त्रास देण्यापेक्षा त्याच्या विकासाला मदत करा. अशा मुलांना त्यांच्या पालकांनी पॉझिटिव्ह जगणं पालकांनी मुलांना शिकवलं पाहिजे. आणि सोबत पालकांनी स्वत:चाही दृष्टिकोन पॉझिटीव्ह ठेवला पाहिजे. नॅशनल ट्रस्टची निरामय इन्शुरन्स ही स्पेशल मुलांसाठीची स्कीम आहे. ह्या स्कीममध्ये पालकांना स्वत:च्या स्पेशल मुलांसाठी दहा लाखापर्यंतची गुंतवणूक करता येते, अशीही महत्त्वाची माहिती वंदना कर्वे यांनी सांगितली. स्पेशल मुलांच्या भविष्यासाठी गुतवणुकीसाठी काही महत्त्वाचे नंबर्स -पुणे - 9520-24478153/9881155621.मुंबई - 9819964789.नागपुर - 0712-2225766/9373103254.स्पेशल मुलांसाठी संस्था - आव्हान पालक संघ, कोटवाडी , तळमजला, पद्माबाई ठक्कर रोड, शिवाजी पार्कदादर, मुंबई -28.प्रगती केंद्राचे मीरा विद्यालयतेलंग रोडमाटुंगा पूर्वसुलभा स्कूलटिळक नगर, सहकार टॉकीज

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2009 11:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2009 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close