S M L

ओबामांचा शपथविधी... भारतीय नजरेतून

- ओजस वैद्य बराक ओबामा यांच्या शपथविधी समारंभादरम्यान अमेरिकेच्या राजधानीत - वॉशिंग्टन डी. सी. मध्ये बदलाचे उत्साही वारे वहात होते. या पहिल्या अफ्रिकन-अमेरिकन अध्यक्षाच्या सन्मानार्थ अमेरिकेत रहाणार्‍या सर्वच संस्कृतीच्या लोकांनी वेगवेगळ्या पार्टीजचं आयोजन केलं होतं. अमेरिकेतल्या भारतीय डेमोक्रॅट्ससाठी ही वेळ होती आपले सर्वोत्तम कपडे परिधान करण्याची तसंच स्त्रियांनी आपल्या खास साड्या किंवा इव्हनिंग गाऊन्स घालून खास अमेरिकन स्टाईलनं सेलिब्रेट करण्याची. ओबामांच्या निवडीनं दाखवून दिलंय की जोपर्यंत एक अमेरिकन नागरिक म्हणून अमेरिकेशी तुम्ही जोडला गेला असाल, तर या देशाची तुम्हाला, सांस्कृतिक विवधतेला स्वीकारण्याची आणि विकासात विविध संस्कृतींच्या प्रतिनिधींना वाटा द्यायची तयारी आहे. अमेरिकेतले बहुतेक भारतीय सुदैवी आहेत कारण अमेरिकेन राजकारणात भक्कम पाय रोवून उभे असलेल्या अनेक उच्चशिक्षित भारतीयांनी त्यांच्यासाठी यशाचा मार्ग आखून ठेवला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीनं हे ओळखलंय की अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत भारतीयांचं प्रमाण फक्त दोन टक्के असलं, तरी अमेरिकेची स्त्री पुरुष समानतेसारखी मूलभूत तत्त्व भारतीय समाजानं स्वीकारली आहेत. कदाचित म्हणूनच अमेरिकन भारतीयांचं सांस्कृतिक वेगळेपण आणि धर्म तसंच विज्ञानाकडे बघण्याचा लिबरल दृष्टीकोन स्वाकारायला अमेरिकेनं कधीचनकार दिला नाही.सुदैवानं ओबामांच्या शपथविधी समारंभाच्या निमित्ताने तीन भारतीय समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. या समारंभातला अनोखा 'देसी अनुभव' (देसी तडका) त्यानिमित्तानं मला अनुभवता आला. आयएएलआय कॉकटेल रिसेप्शन : ही पार्टी आयएएलआय म्हणजेच इंडियन अमेरिकन लीडरशीप इनिशिएटीव या संघटनेनं आयोजित केली होती. याच संघटनेतर्फे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राजकारणात स्थिरावण्यासाठी मदत केली जाते. मेरिलँडमधील संसदेत सत्ताधारी पक्षाचे नेते असलेले कुमार बर्वे आणि स्वाती दांडेकरांसारख्या नेत्यांना यश मिळवून देऊन त्यांनी बर्‍यापैकी प्रगती केली आहे.बराक ओबामांच्या शपथविधी समारंभाचं यश साजर करणारी ही पार्टी आयबार नावाच्या हाय प्रोफाईल क्लबमध्ये होती. सर्जन जनरल पदासाठी निवड झालेल्या संजय गुप्ता आणि नील खट्याल या बुश यांच्या वकील म्हणून काम केलेल्या आयबार म्हणजे एकमेकांवर बांधलेल्या दोन रूम्स आहेत. मंद लाईटमध्ये ही पार्टी चालू होती. कधीकधी तर रूममध्ये प्रचंड गर्दी व्हायची. त्यावेळी मला असं वाटलं की जणू मी गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबईतल्या एखाद्या रेल्वे स्टेशनवर उभा आहे आणि कोणीतरी दिवे बंद केले आहेत. पार्टीचा मूड इन्फॉर्मल होता. बर्‍याच जणांसाठी तर भारतीय वंशाच्या एलिट अमेरिकन राजकीय नेत्यांचे हे संमेलन होते.पर्ल इनॉग्रल गाला : ही पार्टी 19 जानेवारीला झाली. मॅन्डेरियन ओरिएन्टल या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही पार्टी झाली. एशियन अमेरिकन्स फॉर ओबामा या संघटनेसह विविध एशियन अमेरिकन लीडरशिप ग्रुप्सनी ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी ड्रेस कोडही होता. काळा टाय किंवा पारंपरिक ड्रेस! अर्थातच टे्रडिशनल भारतीय साडीपासून फिलिपिनी बॅराँग्जपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पेहराव आणि त्यांच्याबरोबर स्टायलिश टक्सिडो घातलेल्या पुरुषांना पहाणे, हा एक छान अनुभव होता. मॅन्डेरिन ओरिएन्टलची बॉल रूम अतिशय कलात्मक पद्धतीने सोन्याची पानं आणि मंद प्रकाशात झगमगणार्‍या काचेच्या नाजूक झुंबरांनी सजली होती. या समारंभाला बर्‍याच प्रतिथयश राजकारण्यांनी हजेरी लावली होती. यात हवाईच्या सिनेटर इनुई, ओबामांनी सेक्रेटरी ऑफ व्हेटर्न अफेअर्स या पदासाठी निवड केलेले जनरल जनरल शिनसेकी आदी मान्यवरांचा समावेश होता. जसजशी पार्टी रंगत गेली, तसतशी सेलेब्रेटीजचा भाषणं सुरू झाली. त्यात काल पेन यांचाही समावेश होता. या समारंभाला ओबामांची बहीण माया सोटेरो यांनीही भेट दिली. त्यांनीच ओबामा ही पार्टी अटेन्ड करू शकत नसल्याची बातमी सांगितली. या बातमीने बर्‍याच लोकांचा हिरमोड झाला. पण तरीही अशा श्रीमंती वातावरणात पार्टीची मजा घेणं हा एक चांगला अनुभव होता. विशेषत: हे लक्षात घेतलं की इथे उपस्थित बहुतेक लोकांची नाळ अशा राष्ट्रांशी जोडली गेली आहेत ज्यांना गरिबीच्या प्रश्नानं भेडसावलं आहे. पण तरीही देशभक्तीसाठी पैसे मोजायला इथल्या लोकांनी अजिबात हात आखडता घेतला नाही. तिथे रत्नखचित ओबामा कफलिंक्स आणि टाय पिन्स घेण्यास लोकांनी अजिबात हात आखडता घेतला नाही. यातून जमा होणारा निधी स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट एशियन पॅसिफिक अमेकिन प्रोग्रॅमला देण्यात येणार होता. जेणेकरून स्मिथसोनियन म्युझियमला भेट देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाचा प्रसार करण्यास वापरला जाणार आहे. अर्थात कठीण परिस्थितीशी सामन करत मिळवलेल्या या लोकशाहीच्या मार्गाने मिळवलेल्या विजयाला ही रॉयल ट्रीटमेन्ट साजेशी होतीच. त्यातल्या त्यात खटकणारी गोष्ट एवढीच होती की या पार्टीत 1950 च्या सुमारासची रॉक अँड रोल गाणी वाजवली गेली. त्याऐवजी जर पंजाबी भांगडा सादर झाला असता, तर पार्टीची लज्जत काही औरच असती!शीख इनॉगरल बॉल : या पार्टीची 'पहिली इंडो-अमेरिकन बॉल' म्हणून जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे या पार्टीविषयी मला बरीच उत्सुकता होती. ही पार्टी मंगळवारी संध्याकाळी म्हणजेच शपथविधीच्या संध्याकाळी ठेवण्यात आली होती, जेव्हा अध्यक्ष बराक ओबामा शहरातून दहाव्या अधिकृत इनॉगरल बॉलसाठी रवाना होत असतील. मी जेव्हा टॅक्सीतून उतरलो तेव्हा घाईघाईत माझ्या टॅक्सीत शिरण्याचा प्रयत्न करणार्‍या एका कुरळ्या केसाच्या सद्गृहस्थांना मी पाहिलं. मी त्यांना तत्काळ ओळखलं. ते ओहायोचे सिनेटर शेरॉड ब्राऊन होते. माझ्या मनात सहज विचार आला की जर मी ओहायोच्या सिनेटरना इथे पाहू शकतो तर कदाचित मला ओबामाही इथे दिसतील. आणि का नाही ? तेही म्हटलेच होते की मी पण एका अर्थानं 'देसी' आहे आणि उत्तम दाल-तडका बनवू शकतो. पण रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश करताच हे काही तरी फार भव्य असल्याची कल्पना लगेच पुसली गेली. या कार्यक्रमासाठी 150 डॉलर्सचं तिकीट म्हणजे जरा जास्तच महाग होतं. पाहुण्यांसाठी खास भारतीय भोजनाचा बुफे होता आणि एका ड्रिंकसाठी एक तिकीट वापरावं लागत होतं. या पार्टीला साधारण 50 कपल्स उपस्थित होती. लाल-पांढर्‍या रंगसंगतीत हॉल सजला होता आणि ओबामांच्या प्रतिमा सर्वत्र दिसत होत्या. मी तिथे परफॉर्म करणार्‍या एका बॅगपायपरशी बोललो. तिच्या मते ओबामांच्या विजयाचं भारतीय नागरिकांकडून केलं जाणारं सेलिब्रेशन यापेक्षा 'शीख बॉल' म्हणून या कार्यक्रमाची जाहिरात केली असती, तर हा कार्यक्रम जास्त यशस्वी होऊ शकला असता. अशीच काहीशी भावना एका Caucasian couple नी माझ्याजवळ व्यक्त केली. भारतीय संस्कृतीवर प्रचंड प्रेम करणारं हे कपल 1960 मध्येच वावरत होतं आणि सध्याच्या पंजाबी कल्चरबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होतं. या इव्हेंटची पब्लिसिटी आणि वेबसाईट इतकी विस्कळीत होती की संयोजकांना नक्की कोणत्या प्रकारचे पाहुणे अपेक्षित आहेत, हेच कळत नव्हतं. इथे पंजाबी डीजे आणि ढोलकी होती, दोन R&B गायक होते आणि कार्यक्रमाचं आकर्षण होतं 'पश्चिमेचा किशोर कुमार' म्हणून जाहीर केलेला एक गायक. पण या पार्टीतल्या त्रुटींबद्दल कितीही लिहिलं तरी तरी ही पार्टी अटेन्ड केलेल्यांना नक्कीच मजा आली असणार. एरवी डान्स फ्लोअरवर इतकी गर्दी असते की नाचायलाच जागा नसते. तुलनेने कमी गर्दी असलेल्या या डान्स फ्लोअरवर भांगड्याच्या तालावर ही अनेक उत्साही पावलं जोशात थिरकत होती.मी या इव्हेन्टच्या मध्यमवयीन संयोजकांशी बोललो. या कमी प्रतिसादाबद्दल तो काहीसा खंतावला होता पण ओबामांचा विषय काढताच तो उत्साहात बोलू लागला. त्याच्या मते ओबामांचा विजयाने इथल्या भिन्न संस्कृतीतून आलेल्या असंख्य नागरिकांना नवी आशा दिलीय की अमेरिकेतल्या विविध संस्कृतींच्या संगमाचं महत्त्व अमेरिकेला क ळेल. त्याला आशा आहे की शीख आणि इस्लाम या दोन धर्मातील फरक ओबामा ठळकपणे मांडतील आणि यापुढे शीख धर्मीयांचा दहशतवादाशी संबंध जोडला जाणार नाही. त्यानं हे ही आश्वासन दिलं की 2012 मधला बॉल हा जास्त ऑर्गनाईझ असेल आणि तिकिटांची किंमतही कमी असेल. पण 2012 मध्ये तो कोणाला सपोर्ट करणार, या विषयी तो जरा साशंक होता. याचं कारण म्हणजे 2012 मध्ये पंजाबी मुळ असलेले लुईझानाचे सिनेटर हेच ओबामांचे मुख्य प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे. एक मात्र नक्की की ओबामांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या या सुरुवातीच्या दिवसात तरी भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.जरी आम्ही भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक ओबामांचा विजया साजरा करत असलो तरी आम्ही आमची सांस्कृतिक ओळख अजिबातच विसरलेलो नाही. आणि आम्हालाही या देशातल्या नागरिकांबरोबर एकत्र काम करायची इच्छा आहे, ज्याला आमची बच्चे कंपनी घर म्हणते. आम्ही जरी पहिल्यांदा अमेरिकन असलो मला कोणतीही शंका नाही की भारतीय आणि अमेरिकन भारतीय दोघेही अशा जगाची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत ज्याची सांस्कृतिक विविधता स्वीकारायची तयारी असेल, ज्याची स्पर्धात्मक मूल्य स्वीकारण्याची तयारी असेल आणि जिथल्या लोकांना नक्कीच माहीत असेल की चांगली पार्टी कशा करावी!

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2009 01:53 PM IST

ओबामांचा शपथविधी... भारतीय नजरेतून

- ओजस वैद्य

बराक ओबामा यांच्या शपथविधी समारंभादरम्यान अमेरिकेच्या राजधानीत - वॉशिंग्टन डी. सी. मध्ये बदलाचे उत्साही वारे वहात होते. या पहिल्या अफ्रिकन-अमेरिकन अध्यक्षाच्या सन्मानार्थ अमेरिकेत रहाणार्‍या सर्वच संस्कृतीच्या लोकांनी वेगवेगळ्या पार्टीजचं आयोजन केलं होतं. अमेरिकेतल्या भारतीय डेमोक्रॅट्ससाठी ही वेळ होती आपले सर्वोत्तम कपडे परिधान करण्याची तसंच स्त्रियांनी आपल्या खास साड्या किंवा इव्हनिंग गाऊन्स घालून खास अमेरिकन स्टाईलनं सेलिब्रेट करण्याची. ओबामांच्या निवडीनं दाखवून दिलंय की जोपर्यंत एक अमेरिकन नागरिक म्हणून अमेरिकेशी तुम्ही जोडला गेला असाल, तर या देशाची तुम्हाला, सांस्कृतिक विवधतेला स्वीकारण्याची आणि विकासात विविध संस्कृतींच्या प्रतिनिधींना वाटा द्यायची तयारी आहे. अमेरिकेतले बहुतेक भारतीय सुदैवी आहेत कारण अमेरिकेन राजकारणात भक्कम पाय रोवून उभे असलेल्या अनेक उच्चशिक्षित भारतीयांनी त्यांच्यासाठी यशाचा मार्ग आखून ठेवला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीनं हे ओळखलंय की अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत भारतीयांचं प्रमाण फक्त दोन टक्के असलं, तरी अमेरिकेची स्त्री पुरुष समानतेसारखी मूलभूत तत्त्व भारतीय समाजानं स्वीकारली आहेत. कदाचित म्हणूनच अमेरिकन भारतीयांचं सांस्कृतिक वेगळेपण आणि धर्म तसंच विज्ञानाकडे बघण्याचा लिबरल दृष्टीकोन स्वाकारायला अमेरिकेनं कधीचनकार दिला नाही.सुदैवानं ओबामांच्या शपथविधी समारंभाच्या निमित्ताने तीन भारतीय समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. या समारंभातला अनोखा 'देसी अनुभव' (देसी तडका) त्यानिमित्तानं मला अनुभवता आला.

आयएएलआय कॉकटेल रिसेप्शन : ही पार्टी आयएएलआय म्हणजेच इंडियन अमेरिकन लीडरशीप इनिशिएटीव या संघटनेनं आयोजित केली होती. याच संघटनेतर्फे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राजकारणात स्थिरावण्यासाठी मदत केली जाते. मेरिलँडमधील संसदेत सत्ताधारी पक्षाचे नेते असलेले कुमार बर्वे आणि स्वाती दांडेकरांसारख्या नेत्यांना यश मिळवून देऊन त्यांनी बर्‍यापैकी प्रगती केली आहे.बराक ओबामांच्या शपथविधी समारंभाचं यश साजर करणारी ही पार्टी आयबार नावाच्या हाय प्रोफाईल क्लबमध्ये होती. सर्जन जनरल पदासाठी निवड झालेल्या संजय गुप्ता आणि नील खट्याल या बुश यांच्या वकील म्हणून काम केलेल्या आयबार म्हणजे एकमेकांवर बांधलेल्या दोन रूम्स आहेत. मंद लाईटमध्ये ही पार्टी चालू होती. कधीकधी तर रूममध्ये प्रचंड गर्दी व्हायची. त्यावेळी मला असं वाटलं की जणू मी गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबईतल्या एखाद्या रेल्वे स्टेशनवर उभा आहे आणि कोणीतरी दिवे बंद केले आहेत. पार्टीचा मूड इन्फॉर्मल होता. बर्‍याच जणांसाठी तर भारतीय वंशाच्या एलिट अमेरिकन राजकीय नेत्यांचे हे संमेलन होते.पर्ल इनॉग्रल गाला : ही पार्टी 19 जानेवारीला झाली. मॅन्डेरियन ओरिएन्टल या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही पार्टी झाली. एशियन अमेरिकन्स फॉर ओबामा या संघटनेसह विविध एशियन अमेरिकन लीडरशिप ग्रुप्सनी ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी ड्रेस कोडही होता. काळा टाय किंवा पारंपरिक ड्रेस! अर्थातच टे्रडिशनल भारतीय साडीपासून फिलिपिनी बॅराँग्जपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पेहराव आणि त्यांच्याबरोबर स्टायलिश टक्सिडो घातलेल्या पुरुषांना पहाणे, हा एक छान अनुभव होता. मॅन्डेरिन ओरिएन्टलची बॉल रूम अतिशय कलात्मक पद्धतीने सोन्याची पानं आणि मंद प्रकाशात झगमगणार्‍या काचेच्या नाजूक झुंबरांनी सजली होती. या समारंभाला बर्‍याच प्रतिथयश राजकारण्यांनी हजेरी लावली होती. यात हवाईच्या सिनेटर इनुई, ओबामांनी सेक्रेटरी ऑफ व्हेटर्न अफेअर्स या पदासाठी निवड केलेले जनरल जनरल शिनसेकी आदी मान्यवरांचा समावेश होता. जसजशी पार्टी रंगत गेली, तसतशी सेलेब्रेटीजचा भाषणं सुरू झाली. त्यात काल पेन यांचाही समावेश होता. या समारंभाला ओबामांची बहीण माया सोटेरो यांनीही भेट दिली. त्यांनीच ओबामा ही पार्टी अटेन्ड करू शकत नसल्याची बातमी सांगितली. या बातमीने बर्‍याच लोकांचा हिरमोड झाला. पण तरीही अशा श्रीमंती वातावरणात पार्टीची मजा घेणं हा एक चांगला अनुभव होता. विशेषत: हे लक्षात घेतलं की इथे उपस्थित बहुतेक लोकांची नाळ अशा राष्ट्रांशी जोडली गेली आहेत ज्यांना गरिबीच्या प्रश्नानं भेडसावलं आहे. पण तरीही देशभक्तीसाठी पैसे मोजायला इथल्या लोकांनी अजिबात हात आखडता घेतला नाही. तिथे रत्नखचित ओबामा कफलिंक्स आणि टाय पिन्स घेण्यास लोकांनी अजिबात हात आखडता घेतला नाही. यातून जमा होणारा निधी स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट एशियन पॅसिफिक अमेकिन प्रोग्रॅमला देण्यात येणार होता. जेणेकरून स्मिथसोनियन म्युझियमला भेट देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाचा प्रसार करण्यास वापरला जाणार आहे. अर्थात कठीण परिस्थितीशी सामन करत मिळवलेल्या या लोकशाहीच्या मार्गाने मिळवलेल्या विजयाला ही रॉयल ट्रीटमेन्ट साजेशी होतीच. त्यातल्या त्यात खटकणारी गोष्ट एवढीच होती की या पार्टीत 1950 च्या सुमारासची रॉक अँड रोल गाणी वाजवली गेली. त्याऐवजी जर पंजाबी भांगडा सादर झाला असता, तर पार्टीची लज्जत काही औरच असती!शीख इनॉगरल बॉल : या पार्टीची 'पहिली इंडो-अमेरिकन बॉल' म्हणून जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे या पार्टीविषयी मला बरीच उत्सुकता होती. ही पार्टी मंगळवारी संध्याकाळी म्हणजेच शपथविधीच्या संध्याकाळी ठेवण्यात आली होती, जेव्हा अध्यक्ष बराक ओबामा शहरातून दहाव्या अधिकृत इनॉगरल बॉलसाठी रवाना होत असतील. मी जेव्हा टॅक्सीतून उतरलो तेव्हा घाईघाईत माझ्या टॅक्सीत शिरण्याचा प्रयत्न करणार्‍या एका कुरळ्या केसाच्या सद्गृहस्थांना मी पाहिलं. मी त्यांना तत्काळ ओळखलं. ते ओहायोचे सिनेटर शेरॉड ब्राऊन होते. माझ्या मनात सहज विचार आला की जर मी ओहायोच्या सिनेटरना इथे पाहू शकतो तर कदाचित मला ओबामाही इथे दिसतील. आणि का नाही ? तेही म्हटलेच होते की मी पण एका अर्थानं 'देसी' आहे आणि उत्तम दाल-तडका बनवू शकतो. पण रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश करताच हे काही तरी फार भव्य असल्याची कल्पना लगेच पुसली गेली. या कार्यक्रमासाठी 150 डॉलर्सचं तिकीट म्हणजे जरा जास्तच महाग होतं. पाहुण्यांसाठी खास भारतीय भोजनाचा बुफे होता आणि एका ड्रिंकसाठी एक तिकीट वापरावं लागत होतं. या पार्टीला साधारण 50 कपल्स उपस्थित होती. लाल-पांढर्‍या रंगसंगतीत हॉल सजला होता आणि ओबामांच्या प्रतिमा सर्वत्र दिसत होत्या. मी तिथे परफॉर्म करणार्‍या एका बॅगपायपरशी बोललो. तिच्या मते ओबामांच्या विजयाचं भारतीय नागरिकांकडून केलं जाणारं सेलिब्रेशन यापेक्षा 'शीख बॉल' म्हणून या कार्यक्रमाची जाहिरात केली असती, तर हा कार्यक्रम जास्त यशस्वी होऊ शकला असता. अशीच काहीशी भावना एका Caucasian couple नी माझ्याजवळ व्यक्त केली. भारतीय संस्कृतीवर प्रचंड प्रेम करणारं हे कपल 1960 मध्येच वावरत होतं आणि सध्याच्या पंजाबी कल्चरबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होतं. या इव्हेंटची पब्लिसिटी आणि वेबसाईट इतकी विस्कळीत होती की संयोजकांना नक्की कोणत्या प्रकारचे पाहुणे अपेक्षित आहेत, हेच कळत नव्हतं. इथे पंजाबी डीजे आणि ढोलकी होती, दोन R&B गायक होते आणि कार्यक्रमाचं आकर्षण होतं 'पश्चिमेचा किशोर कुमार' म्हणून जाहीर केलेला एक गायक. पण या पार्टीतल्या त्रुटींबद्दल कितीही लिहिलं तरी तरी ही पार्टी अटेन्ड केलेल्यांना नक्कीच मजा आली असणार. एरवी डान्स फ्लोअरवर इतकी गर्दी असते की नाचायलाच जागा नसते. तुलनेने कमी गर्दी असलेल्या या डान्स फ्लोअरवर भांगड्याच्या तालावर ही अनेक उत्साही पावलं जोशात थिरकत होती.मी या इव्हेन्टच्या मध्यमवयीन संयोजकांशी बोललो. या कमी प्रतिसादाबद्दल तो काहीसा खंतावला होता पण ओबामांचा विषय काढताच तो उत्साहात बोलू लागला. त्याच्या मते ओबामांचा विजयाने इथल्या भिन्न संस्कृतीतून आलेल्या असंख्य नागरिकांना नवी आशा दिलीय की अमेरिकेतल्या विविध संस्कृतींच्या संगमाचं महत्त्व अमेरिकेला क ळेल. त्याला आशा आहे की शीख आणि इस्लाम या दोन धर्मातील फरक ओबामा ठळकपणे मांडतील आणि यापुढे शीख धर्मीयांचा दहशतवादाशी संबंध जोडला जाणार नाही. त्यानं हे ही आश्वासन दिलं की 2012 मधला बॉल हा जास्त ऑर्गनाईझ असेल आणि तिकिटांची किंमतही कमी असेल. पण 2012 मध्ये तो कोणाला सपोर्ट करणार, या विषयी तो जरा साशंक होता. याचं कारण म्हणजे 2012 मध्ये पंजाबी मुळ असलेले लुईझानाचे सिनेटर हेच ओबामांचे मुख्य प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे. एक मात्र नक्की की ओबामांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या या सुरुवातीच्या दिवसात तरी भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.जरी आम्ही भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक ओबामांचा विजया साजरा करत असलो तरी आम्ही आमची सांस्कृतिक ओळख अजिबातच विसरलेलो नाही. आणि आम्हालाही या देशातल्या नागरिकांबरोबर एकत्र काम करायची इच्छा आहे, ज्याला आमची बच्चे कंपनी घर म्हणते. आम्ही जरी पहिल्यांदा अमेरिकन असलो मला कोणतीही शंका नाही की भारतीय आणि अमेरिकन भारतीय दोघेही अशा जगाची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत ज्याची सांस्कृतिक विविधता स्वीकारायची तयारी असेल, ज्याची स्पर्धात्मक मूल्य स्वीकारण्याची तयारी असेल आणि जिथल्या लोकांना नक्कीच माहीत असेल की चांगली पार्टी कशा करावी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2009 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close