S M L

गप्पा डॉ. अनिल अवचटांबरोबर

सलाम महाराष्ट्रचे पाहुणे होते लेखक डॉ.अनिल अवचट. 30 जानेवारी हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो. यंदाच्या गांधीजींच्या 60 व्या पुण्यतिथी निमित्त ' सला महाराष्ट्र ' मध्ये डॉ. अनिल अवचट यांना बोलावण्यात आलं होतं. अनिल अवचट हे पत्रकार,लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. ' माणूस ', ' स्वत:विषयी ', ' कार्यरत ', 'वाघ्या मुरळी ' अशी त्यांची वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं गाजली आहे. बहुआयामी,अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. सलाम महाराष्ट्र ' मध्ये डॉ. अनिल अवचट महात्मा गांधींचं जीवन, त्यांचं तत्त्वज्ञान याविषयी ते बोलले. ज्या माणसानं संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश सांगितला. शूराच्या अहिंसेची शिकवण दिली.. त्या गांधीजींच्या जीवनावर टॉलस्टॉय आणि थोरो यांच्या जीवनाचा प्रभाव होता. अवचट थोरोविषयी सांगतात, " थोरो हा 1858 ते 1860 या काळातला आहे. तो निसर्गप्रेमी होता. भटक्या होत्या. त्याला अन्यायाविरूद्धचा तिटकारा होता. निग्रोची गुलामगिरी आणि अमेरिकन लोकांनी मेक्सिकोवर केलेला हल्ला याचा तो साक्षीदार होता. अन्याय त्याला कधीच सहन झाला नाही. युद्धाच्या तो विरोधात होता. अन्यायाची कोंडी शांततेनं फोडून काढायची हे थोरोनं सांगितलं होतं. गांधीजींचा तो एक प्रकारे गुरू होता." अनिल अवचट यांच्यावरही गांधीजींच्या जीवनाचा प्रभाव आहे. अनिल अवचट सांगातात, " गांधीजींना मी काही पाहिली नव्हतं. पण मला गांधीजी कळले ते त्यांच्या आत्मचरित्रांतून आणि त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं वाचल्यावर. गांधीजींच्या स्वभावातलं शांतपणा मला भावला. तेच मूल्य मी अजूनही जपलं आहे. ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये डॉ. अनिल अवचट यांनी सांगितलेलं गांधी तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 06:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2009 05:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close