S M L

कौटुंबिक हिंसाचार (भाग - 1)

कौटुंबिक हिंसाचार हा टॉक टाइमचा विषय होता. या विषयावर समुपदेशक सुलभा शेरताटे आणि मासूम संस्थेच्या प्रकल्प अधिकारी अर्चना मोरे बोलल्या. मुळातच हिंसा सहन करणे हाच एक मोठा गुन्हा आहे. आपल्यावर होणार्‍या अत्याचाराबद्दल वेळीच पाउले उचलली पाहिजेत. स्त्रिया अनेक वर्षं छळ सहन करतात. त्यामुळे अन्याय करण्यांची ताकद वाढते.आपल्या शहरातील पोलीस स्टेशन, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी मदत मिळू शकते. छोट्या छोट्या गावांमधून प्रतिष्ठीत लोकांकडून दबाव आणता येईल असं चर्चेत अर्चना मोरे म्हणाल्या.कायद्यानं अशा हिंसाचारासाठी शिक्षा तर होतंच. पण एखादीला आपलं घर, कुटुंब महत्त्वांचं वाटतं असेल तर आणि कायद्याची मदत नको असेल तर अनेक मदत केंद्रंही आहेत. जिथे कौन्सिलर असतात जे दोघांनाही मार्गदर्शन करतात. कारण चूक ही सगळ्यांकडून होते.त्यावर हिंसा हा उपाय असू शकत नाही. नात्यांमध्ये सामंजस्य राखणं जरुरी आहे.जबाबदारी दोघांचीही आहे असं चर्चेम समुपदेशक सुलभा शेरताटे म्हणाल्या. " मदत केंद्रांमध्ये अनेक पीडित स्त्रिया येत असतात. त्यामुळे स्त्रियांना धीर मिळू शकतो.आपण एकट्या नाही आहोत, याची जाणीव या पीडित महिलांना होते तेव्हा त्यांना हायसं वाटतं. मदत केंद्रांमध्ये या महिलांच्या समस्या ऐंकून घेतल्या जातात. ज्यामुळे मनावरचं ओझ हलकं होतं. परंतु आपल्यावरचा अन्याय सहन करायचा की त्याच्यातून बाहेर पडायचं हा निर्णय जीचा तिनं घ्यायचा असतो, " असं सुलभा शेरताटे आणि अर्चना मोरे म्हणाल्या. टॉक टाइममध्ये कौटुंबिक हिंसाचार या विषयावर केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2009 12:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2009 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close