S M L

कॅन्सर आणि सर्जरी - भाग 1

बदलत्या जीवनशैलीमुळे स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर होण्याचं प्रमाणं वाढतयं शिवाय दरवर्षी तंबाखुमुळे भारतात अनेकांना कॅन्सर होते.कॅन्सर झाल्यावर त्याचे उपचार, त्याचं स्वरुप आणि महत्वाचा भाग म्हणजे कॅन्सरची सर्जरी याबाबत बोलण्यासाठी डॉ.महेंद्र नवरे यांनी टॉक टाईममध्ये बोलावण्यात आलं होतं.आपले शरीर हे असंख्य पेशींनी बनलेले असते.प्रत्येक पेशीचे काम वेगवेगळे असते.जेव्हा या पेशींच्या कामात बिघाड निर्माण होतो तेव्हा या पेशींची वाढ होते आणि त्याची गाठ निर्माण होते आणि अशा गाठी शरिरात इतरत्रही पसरतात.तेव्हा आपण कॅन्सर झाला असे म्हणतो.मात्र योग्य वेळी निदान आणि वेळीच उपचार मिळाले तर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.केमोथेरपी, रेडिएशन आणि वेळ पडली तरच सर्जरी असे या रोगावरच्या ट्रिटमेंटच स्वरूप आहे.प्रत्येक पेंशट प्रमाणे याचे स्वरूप बदलते. सुरुवातीला शरिरातील ज्या भागात गाठ आहे त्याचा थोडा भाग एका सुईद्वारे काढुन त्याची परीक्षा घेतली घेतली जाते आणि मग निदान केले जाते.कॅन्सरची ट्रिटमेंट चालु असतांना आयुर्वेदिक किंवा ऍलोपथी औषधेही घेऊ शकतो मात्र ही औषधांबरोबरच कॅन्सरची ट्रिटमेंट सुरू ठेवणेही आवश्यक आहे. कॅन्सर वेळीच ओळखण्यासाठी आपले आरोग्य सांभाळले पाहिजे.कोणतेही दुखणे दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त लांबले तर लगेच योग्य उपाय करावेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 01:16 PM IST

बदलत्या जीवनशैलीमुळे स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर होण्याचं प्रमाणं वाढतयं शिवाय दरवर्षी तंबाखुमुळे भारतात अनेकांना कॅन्सर होते.कॅन्सर झाल्यावर त्याचे उपचार, त्याचं स्वरुप आणि महत्वाचा भाग म्हणजे कॅन्सरची सर्जरी याबाबत बोलण्यासाठी डॉ.महेंद्र नवरे यांनी टॉक टाईममध्ये बोलावण्यात आलं होतं.

आपले शरीर हे असंख्य पेशींनी बनलेले असते.प्रत्येक पेशीचे काम वेगवेगळे असते.जेव्हा या पेशींच्या कामात बिघाड निर्माण होतो तेव्हा या पेशींची वाढ होते आणि त्याची गाठ निर्माण होते आणि अशा गाठी शरिरात इतरत्रही पसरतात.तेव्हा आपण कॅन्सर झाला असे म्हणतो.मात्र योग्य वेळी निदान आणि वेळीच उपचार मिळाले तर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.केमोथेरपी, रेडिएशन आणि वेळ पडली तरच सर्जरी असे या रोगावरच्या ट्रिटमेंटच स्वरूप आहे.प्रत्येक पेंशट प्रमाणे याचे स्वरूप बदलते. सुरुवातीला शरिरातील ज्या भागात गाठ आहे त्याचा थोडा भाग एका सुईद्वारे काढुन त्याची परीक्षा घेतली घेतली जाते आणि मग निदान केले जाते.कॅन्सरची ट्रिटमेंट चालु असतांना आयुर्वेदिक किंवा ऍलोपथी औषधेही घेऊ शकतो मात्र ही औषधांबरोबरच कॅन्सरची ट्रिटमेंट सुरू ठेवणेही आवश्यक आहे. कॅन्सर वेळीच ओळखण्यासाठी आपले आरोग्य सांभाळले पाहिजे.कोणतेही दुखणे दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त लांबले तर लगेच योग्य उपाय करावेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close