S M L

आनंदपर्व (भाग 2)

आनंदपर्व (भाग 2)आज आनंदवन 200 हेक्टरमध्ये विस्तारलंय. एवढ्या परिसरात हजारो लोक राहतात. आज आनंदवनची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. या गावात दोन हॉस्पिटल्स आहेत.आनंदवनात रोज एक नाहीतर दोन व्यक्ती भरती होतच असतात. केवळ कुष्टरोग्यांसाठी ही मर्यादा इथे नाही. इथे मुकबधीरांसाठी शाळाही आहे. जिथे आपल्या व्यंगावर मात करणारी स्वप्नंही बघता येतात. इथे चिमुकल्यांची स्वप्न आहेत. उंच भरारी घेणारी.आणि आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारी.आनंदवनातली अंधशाळेतली महत्वाची शिकवण आहे डोळसांसारखं रहा. डोळसांशी स्पर्धा करा. आनंदनिकेतन, संधीनिकेतन आणि आशा युवाग्राम या संस्था कुष्ठरोग नसलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. आशा युवाग्राममध्ये शाळा सोडून शिक्षण अर्ध्यावर टाकून दिलेल्या विद्यार्थ्याना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येतं. ही मुलं खेड्यातसुद्धा स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. तर आनंदनिकेतनमध्ये आजपर्यंत बाहेरच्या विद्यार्थ्यानीही शिक्षण घेतलंय. आनंदनिकेतन सुरू झालं ते वेगळ्याच उद्देशाने.मुख्यध्यापक सुधाकर कडू सांगतात, ही जी दु:खीतांची भूमी आहे. या भूमीत एखाद्या मुलाने ग्रॅज्युएशन केलं तर समाजात जाऊन वेदनेशी नातं जोडावं. कुठल्या महाविद्यालयात मी शिकलो तर आनंदवनात. जे महाविद्यालय कुष्ठरोग्यानी बांधलं. आजूबाजूचा त्याच लोकांचा परिसर. अंधाचा आहे, कुष्ठरोग्यांचा आहे.आमटे परिवारातील तिस-या पिढीतल्या पल्लवी आमटे सांगतात, आमची प्रेरणा काय आहे तर ती इथली माणसं, अंधशाळेतली मुलं, मुख्याध्यापक. इथल्या श्रमदानातून तलाव, विहिरी बांधले गेले. पाणी साठवण्यासाठी प्रयोग करत करत इथल्याच लोकांनी 22 विहिरी आणि 10 तलाव बांधले. याआधीच्या दोन पिढ्यांनी भविष्यासाठी करुन ठेवलेली ही मोठी पुंजी आहे.यापुढे आनंदनला स्वावलंबी बनवायचा विचार आहे.आनंदवन आज पूर्णपणे स्वयंपूर्ण नाही. इथला कामाचा दिवसेंदिवस पसारा वाढतोय.हे जसं काम आहे. कुटुंब असल्यासारखं . 4माणसांचं 3000 माणसांची संख्या आहे. रोजचा प्रश्न असतो. रोजच्या उठाठेवी बघायला लागतात. ते आव्हान आहे.आनंदवनात उत्पन्नाचं महत्वाचं साधन आहे. दुग्धव्यवसाय दूध आणि तुपाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. याशिवाय तलावांचा वापर फक्त पाण्याची सोय म्हणून न करता मासेमारीसाठीही केला जातो. इमू पालनातूनही चांगलं उत्पादन मिळतं. आफ्रिकेतून आणलेल्या इमू पक्ष्यांच्या जोडीतून हा व्यवसाय सुरू झाला. इमूच्या एका अंड्याची किंमत असते 800 रुपये. अन्नाची सोय व्हावी म्हणून या माळरानात आता फळबागा बहरल्या आहेत. 1997 मध्ये डॉ विकास आमटेंनी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड सुरू केली. अवघ्या सहा वर्षात झाडांनी इथला परिसर बहरून गेला. स्थलांतरीत पक्षी आणि इथले कायमचे रहिवासी असलेले हंस पर्यावरण आणि आनंदवनाच्या मैत्रीची साक्ष देतात.आनंदवनातलं इकोफ्रेंडली असणारं घरही असंच पण कल्पक उदाहरण. इथली प्लास्टिक काँक्रीटची घरं. दिसतात फक्त वीटा आणि सिमेंटमधून तयार केलेलं अनोखं छप्पर. लोखंड, सळ्या स्लॅब नसलेलं हे घर. उभी आणि आडवी वीट वापरून तयार केलेल्या या छपराची रचना गोलाकार आहे. कुठल्याही घरापेक्षा अधिक भक्कम आणि टिकाऊ भूकंपाला तोंड देण्याची या घरांमध्ये ताकद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वस्तही. समाजाने ज्या कुष्टरोग्यांना झिडकारलं, त्याच माणसांनी निर्माण केलेलं हे अनोखं जग. बाबांबरोबर. आनंदवनात उभं राहिलेलं सगळं काम केवळ कष्टातून झालेलं नाही तर त्याला कौशल्याची जोड आहे. इथल्या अपंग, कुष्ठरोगींना निर्मितीचा आनंद घ्यायला आनंदवनने शिकवलंय. त्यातले कोणीही व्यावसायिक नव्हते की उद्योगधंद्याच्या पदव्या घेऊन आले नव्हते.बाबांनी विकास आमटेंच्या मदतीने एक सुंदर गुलांबांची बाग फुलवली. अनाम मूक कळ्याची समाधी. ज्यांची जन्म व्हायच्या आधीच गर्भातच हत्या केली जाते. ती केवळ मुलगी म्हणून अशा कित्येक जीवांची ही समाधी. प्रत्येक कळीला फूल होऊन जगण्याचा अधिकार आहे. पण त्याआधीच खुडून टाकण्यात येतं. अशा कळ्यांच्या स्मृतीसाठी ही बाग. यासाठी बाबांनी जाणीवपूर्वक गुलाबच निवडलं. जगातून नाहिश्या झालेल्या एकेक फुलाची, भेट देणा-याला जाणीव व्हावी म्हणून. या बागेची देखभाल करणारे कुष्ठरोगी आणि विद्यार्थी. इथे काम करणारा पहिला गट आता म्हातारपणामुळे थकलाय. स्नेहसावली आणि स्नेहछाया या दोन वृद्धाश्रमात हळूहळू संख्या वाढत चालली आहे. पण थकलेलं असतानाही. एरव्ही रोग खातो शरीराला पण खातो मनाला. पण इथे वेगळंच झालं. उतरत्या वयातही काम करण्याची चिकाटी संपली नाही. आनंदवनचा आपला असा खास ऑर्केस्ट्रा आहे. यात 40 कुष्ठरोगी, अंध, अपंग, मुके, बहिरे असे अनेकजण आहेत. त्यांच्या असं असण्याचा काय फरक पडला. अभिमान वाटावं असं त्यांच्याकडे बरच काही आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2009 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close