S M L

डेझर्ट स्पेशल भाग 1

डेझर्ट स्पेशल भाग 1भारतात प्रत्येक प्रांतागणिक पदार्थांमध्ये वैविध्य आढळते. म्हणूनच टॉक टाईममध्ये वेगवेगळ्या डेझर्टबद्दल माहिती पाककला तज्ज्ञ अंजली गुप्ते आल्या होत्या. पूर्वी गोड पदार्थ जेवणातच वाढला जायचा मात्र आता जेवणानंतर गुलाबजाम, गाजर हलवा, बासुंदी बरोबरच कस्टर्ड, पुडिंग असे प्रकार अनेक समारंभात खायला मिळतात.त्यातही गुलाबजाम आणि गाजर हलव्यावर आईस-क्रिम घालून दिले जाते. त्यामुळे आता मिक्स आणि टेंन्डी स्वीटस्‌चा जमाना आहे. असे सांगून त्यांनी नानकटाई, चॉकलेट अशा अनेक पदार्थांच्या रेसिपी सांगितल्या.पदार्थ चांगला होण्यासाठी प्रमाण योग्य असलं पाहिजे. अंदाजानं केलेला पदार्थ प्रत्येकवेळी चांगला होइलच असं नाही. त्यामुळे साहित्य मोजून मापूनच घ्यावं.लहान मुलं दूध पीत नाहीत तेव्हा त्यांना पुडिंग किंवा मिल्कशेक, फालुदा करून देता यईल.साखरेऐवजी आपण मध वापरू शकतो असेही त्यांनी सांगितले.पदार्थ तयार झाल्यानंतर तो आकर्षक पद्धतीने सर्व्ह केला पाहिजे. यासाठी आपण प्लेट, बाऊल आणि ग्लास असे अनेक पर्याय वापरू शकतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2009 06:21 PM IST

डेझर्ट स्पेशल भाग 1

डेझर्ट स्पेशल भाग 1

भारतात प्रत्येक प्रांतागणिक पदार्थांमध्ये वैविध्य आढळते. म्हणूनच टॉक टाईममध्ये वेगवेगळ्या डेझर्टबद्दल माहिती पाककला तज्ज्ञ अंजली गुप्ते आल्या होत्या. पूर्वी गोड पदार्थ जेवणातच वाढला जायचा मात्र आता जेवणानंतर गुलाबजाम, गाजर हलवा, बासुंदी बरोबरच कस्टर्ड, पुडिंग असे प्रकार अनेक समारंभात खायला मिळतात.त्यातही गुलाबजाम आणि गाजर हलव्यावर आईस-क्रिम घालून दिले जाते. त्यामुळे आता मिक्स आणि टेंन्डी स्वीटस्‌चा जमाना आहे. असे सांगून त्यांनी नानकटाई, चॉकलेट अशा अनेक पदार्थांच्या रेसिपी सांगितल्या.पदार्थ चांगला होण्यासाठी प्रमाण योग्य असलं पाहिजे. अंदाजानं केलेला पदार्थ प्रत्येकवेळी चांगला होइलच असं नाही. त्यामुळे साहित्य मोजून मापूनच घ्यावं.लहान मुलं दूध पीत नाहीत तेव्हा त्यांना पुडिंग किंवा मिल्कशेक, फालुदा करून देता यईल.साखरेऐवजी आपण मध वापरू शकतो असेही त्यांनी सांगितले.पदार्थ तयार झाल्यानंतर तो आकर्षक पद्धतीने सर्व्ह केला पाहिजे. यासाठी आपण प्लेट, बाऊल आणि ग्लास असे अनेक पर्याय वापरू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2009 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close