S M L

इंटरव्ह्यू देताना (भाग - 1)

यावेळेचा टेक ऑफचा विषय कोणत्याही अभ्यासक्रमाविषयी नव्हता. तर कोर्स शिकून झाल्यावर नोकरीसाठी इंटरव्ह्यू कसा द्यायचा याविषयावर टेक ऑफमध्ये चर्चा करण्यात आली. दिवस मंदीचे आहेत आणि एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाऊन ती गमावणं आजच्या दिवसांत तरी परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे इंटरव्ह्यू कसा द्यायचा आणि वॉक इन इंटरव्ह्यू असेल तर स्वत:ला तयार कसं करायचं यावर मार्गदर्शन करण्यासाठी हिरो माईंडच्या कॉर्पोरेट ट्रेनर सोनाली मांजरेकर आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट या क्षेत्रातले कॉर्पोरेट ट्रेनर डॉमनिक कोस्टाबिर आले होते. डॉमनिक कोस्टाबिर तर कित्येक लोकांचे जॉब इंटरव्ह्यूही कन्डक्ट करतात. पूर्वीसारखे दिवस आज राहिले नाहीयेत. पूर्वी जशा पटापट नोक-या लागायच्या किंवा ठरावीक जॉब स्किल्समुळे नोक-या लागायच्या, एखादी डिग्री असेल तर चटकन् माणसाला नोकरीसाठी उचललं जायचं. डिग्री असेल तर नोकरी मिळालीच समजा, असं आयटीतल्या नोकरी बाबत म्हटलं जायचं. पण आता नोकरीमध्ये व्यक्तिमत्त्वालाही अनन्य साधारण महत्त्व दिलं जात आहे. त्यात नोक-या कमी आहेत. तर अशावेळेला इंटरव्ह्यूचं बेसिक प्रिपरेशन कसं करावं? सोनाली मांजरेकर : इंटरव्ह्यूच्या बेसिक्स प्रिपरेशन्समध्ये कम्युनिकेशन स्किल्सना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. इंटरव्ह्यू देणा-या व्यक्तीकडे कुठलाही थॉट प्रोसेसच नाहीये असं वाटता कामा नये. इंटरव्ह्यू देणारी व्यक्ती स्वत:विषयी जरा जास्तच वाढवून सांगतेय, बढाया मारतेय... अशी भावना इंटरव्ह्यू घेणा-याच्या मनात येता काम नये. हल्ली इंटरव्ह्यूमध्ये व्यक्तिमत्त्वालाही ख्‌ूप महत्त्व दिलं जातं. असं नसतं तर इंटरव्ह्यू बायोडाटाचा झाला असता. व्यक्तीचा नाही. ड्रेस कोडकडेही बारीक लक्ष असतं. मुलींनी पंजाबी ड्रेसपेक्षा साडीचा वापर केल्यास उत्तम. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी आरशासमोर उभं राहून आधी बोलण्याची तयारी करावी. त्यानं इंटरव्ह्यू देताना आपण कसे दिसता, कसे बसता याचा अंदाज येतो. अशी प्रॅक्टीस करताना तुमच्यातल्या कॉन्फिडन्सचा, आत्मविश्वासाचा तुम्हाला अंदाज येतो. आणि हा आत्मविश्वास तुम्हाला पुढे ख्‌ूप उपयोगी पडतो. तो नोकरीही मिळवून देऊ शकतो. इंटरव्ह्यूला जाताना काय करू नये ? डॉमनिक कोस्टाबिर : जे तुम्ही नाही आहात ते इंटरव्ह्यूमध्ये सांगू नये. म्हणजे आता जर तुमच्याकडे जर दोन महिन्यांचा अनुभव आहे तर सीव्ही किंवा रेझ्युमीमध्ये लिहिताना तो दोन वर्षांचा आहे, असं लिहू नये. एखादं काम येत नसेल तर तो योतोय , असं ठामपणे कधी सांगायचं नाही. कारण आजकाल बॅक चेकिंग केलं जातं. आणि बॅक चेकिंगमध्ये जर तुम्ही दोषी आढळलात तर रेकमेन्ड लेटरशिवाय काढलंही जाऊ शकतं. व्यक्तिमत्त्व विकासाप्रमाणं तुम्ही तुम्हाला मिळालेल्या डिग्रीजचं डॉक्युमेन्टेशन कसं करतात, केलेलं डॉक्युमेन्टेशन किती ऑन्थेटीेक आहे याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. इंटरव्ह्यूला जाताना खूपदा अनेकांना भीतीपोटी नव्हर्सपणा येतो. तर त्या भीतीचा सामना कसा केला पाहिजे ? डॉमनिक कोस्टाबिर : मला जर अमूक एक नोकरी मिळाली नाही तर माझं आयुष्य स्पॉइल होईल, अशी भावना इंटरव्ह्यूला जाताना ब-याच जणांच्या मनात असते. तर या भावनेचा विचार करून कधीच इंटरव्ह्यूला जायचं नाही. असा विचार करत गेल्यावर आपसुकच टेन्शन येतं. माझ्याकडे अमूक एक क्वालिटीज आहेत. त्यांचा मी कंपनीला कशा प्रकारे उपयोग करून देऊ शकतो, असा विचार करून इंटरव्ह्यूला गेल्यास नक्कीच टेन्शन येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. जो होता है वो अच्छे के लिये होता है , असं शेवटी गीतेत म्हटलं आहेच ना ते उगाचच का ? तेव्हा पॉझिटिव्ह ऍटीट्युड महत्त्वाचा. इंटरव्ह्यू घेणा-यावर आपली छाप पाडावी यासाठी काय केलं पाहिजे ? सोनाली मांजरेकर : इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला पंधरा मिनिटांची खिडकी मिळालेली असते. या पंधरा ते वीस मिनिटाच्या खिडकीत तुम्हाला स्वत:ला तुमच्या अचिव्हमेन्टस्‌ना दाखवायचं असतं. समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय केलंय हे तेवढ्या 15 मिनिटांत सांगायचं असतं. त्या 15 मिनिटात जर तुम्ही नर्व्हस झालात तर कसं चालेल. तो तुमचा मोठा लॉस असतो. तेव्हा त्या पंधरा मिनिटांच्या संधीचा आपण पुरेपूर फायदा उठवायला पाहिजे. संधीचं सोनं करा. डॉमनिक कोस्टाबिर : कधी कधी आपल्याला 15 मिनिटंसुद्धा मिळत नाहीत. कधी कधी 5 मिनिटांत सगळं आटपलं जातं. त्यावेळी तुमचा वेश आणि पेशही तितकाच महत्त्वाचा असतो. पेहरावामुळंही लोकांना मुलाखतीत नाकारलं जातं. शहरी भागात मुलाखतीला येताना वेगळ्या पद्धतीची स्किल सेटस् लागतात. तर ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीची स्किल सेटस् असतात. पण सगळ्यात कोर स्किल सेट्स काय असतो ? सोनाली मांजरेकर : कोर स्किल सेट्स म्हणजे तुमचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व. तुम्ही ज्या प्रकारचं काम करता, ज्या पद्धतीचं काम करता त्यातले बारकावे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. इंटरव्ह्यूला कॅन्डिडेटस्‌ला नेहमी त्याचंच टेन्शन येतं. तर हे टेन्शन येऊ नये याकरता तुम्ही ज्याप्रकारच्या कामाच्या इंटरव्ह्यूला जाता ते काम माहीत असणं महत्त्वाचं आहे. खास करून गावाकडची मुलं शहरी भागात इंटरव्ह्यूला येतात, त्यावेळी मी मुलाखत देऊ शकेन की नाही, असा न्यूनगंड या मुलांमध्ये निर्माण होतो. तर हा न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी काय करावं ? डॉमनिक कोस्टाबिर : न्यूनगंड निर्माण होऊ नये याकरता कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं असतं. आणि असा न्यूनगंड फक्त गावाकडच्याच मुलांमध्ये नाही तर शहरी भागातल्या मुलांमध्ये असतो. उदा. एखादी व्यक्ती जर वेल्डिंगचं काम करत असेल तर ती मुलाखतीला जाताना वेल्डिंग करून दाखवणार नाही. तर अशावेळी तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स आणि प्रामाणिपणा महत्त्वाचा असतो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माहीत नसेल तर सांगा की मला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाहीये. पण चुकीचं उत्तर देऊन वेळ मारून नेऊ नका. प्रामाणिकपणामुळे तुमच्या नोकरीचे चान्सेस वाढतात. इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही आधीचा जॉब का सोडता किंवा का सोडलात असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी उत्तर देताना आपल्या लिमिटेशन सांगाव्यात का ? सोनाली मांजरेकर : मुलाखतीला जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तेव्हा अति पॉलिटीकल उत्तर देण्यापेक्षा खरं ते उत्तर दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आता रिसेशनमुळे एखाद्याची नोकरी जर गेली असेल तर तसं उत्तर द्यावं. पण माझं माझ्या बॉसशी जमलं नाही म्हणून मी नोकरी सोडली, असं उत्तर न देणंच योग्य. खरी उत्तरं देताना तारतम्य बाळगावं. डॉमनिक कोस्टाबिर : माझं माझ्या बॉसशी किंवा कलीगशी जमलं नाही असं उत्तर देण्यापेक्षा आमच्यात काही अशा गोष्टी होत्या त्यावर तोडगा सापडत नव्हता म्हणून मी नोकरी सोडली, किंवा काहींनी जण आधीच्या जॉबला कंटाळून नोकरी सोडली, असं पेक्षा काहीतरी चॅलेंजिंग करावंसं वाटलं म्हणून नोकरी सोडली, अशी उत्तरं देणं कधीही चांगलं. ह्यालाच म्हणतात कम्युनिकेशन स्कील. कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ? सोनाली मांजरेकर : तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं, आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते. एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नसते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ? सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो. डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत. शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ? डॉमनिक कोस्टाबिर : असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं. नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ? डॉमनिक कोस्टाबिर : हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो. सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल. आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यावं ? डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही. सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं. अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यावं ? सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते. इंटरव्ह्यूमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न - तुम्हाला तुमचा सध्याचा जॉब का सोडायचा आहे?तुम्ही आमच्या जॉबसाठी कसे फिट आहात?तुम्हाला या वर्षी काय करायचंय?जर तुम्ही सिलेक्ट झाला नाहीत तर तुमची रिऍक्शन काय असेल?तुम्हाला नोकरीची गरज आहे की करायची आहे?तुम्हाला आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत काय?इंटरव्ह्यूला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा - विषय सांगितल्यावर लगेचच जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळतात.दुसरा कोणी बोलत असताना मधे बोलू नका.आपलं मत मांडताना सर्वांकडे बघून बोला.शांतचित्तानं एखाद्या व्यक्तीला दुजोरा द्या.जर तुम्हाला वाटलं की याशिवाय जास्त पॉइंट नाहीत तर तुम्ही समराईज करून डिस्कर्शन संपवा. महिलांनी इंटरव्ह्यूला जाताना लक्षात ठेवायच्या गोष्टी : व्यवस्थित कपडे घालून जाखूप घट्ट किंवा खूप सैल कपडे घालू नकामॅचिंग नेल पॉलिश लावालाईट लिपस्टिक लावाजॉबच्या नेचरप्रमाणे कपडे घालून जाखूप दूर जाणार असाल तर कपड्याचा एक जोड स्वत:बरोबर ठेवापुरुषांनी इंटरव्ह्यूला जाताना लक्षात ठेवायच्या गोष्टी : मॅचिंग किंवा सफेद सॉक्स घाला.मॅचिंग किंवा सफेद रुमाल घेऊन जा.स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घाला.कपड्याचे बटन्स चेक करा.पैशाची नाणी किंवा किल्ल्या खिशात ठेवू नका. इंटरव्ह्यू देताना (भाग - 2)

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2009 01:13 PM IST

यावेळेचा टेक ऑफचा विषय कोणत्याही अभ्यासक्रमाविषयी नव्हता. तर कोर्स शिकून झाल्यावर नोकरीसाठी इंटरव्ह्यू कसा द्यायचा याविषयावर टेक ऑफमध्ये चर्चा करण्यात आली. दिवस मंदीचे आहेत आणि एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाऊन ती गमावणं आजच्या दिवसांत तरी परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे इंटरव्ह्यू कसा द्यायचा आणि वॉक इन इंटरव्ह्यू असेल तर स्वत:ला तयार कसं करायचं यावर मार्गदर्शन करण्यासाठी हिरो माईंडच्या कॉर्पोरेट ट्रेनर सोनाली मांजरेकर आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट या क्षेत्रातले कॉर्पोरेट ट्रेनर डॉमनिक कोस्टाबिर आले होते. डॉमनिक कोस्टाबिर तर कित्येक लोकांचे जॉब इंटरव्ह्यूही कन्डक्ट करतात. पूर्वीसारखे दिवस आज राहिले नाहीयेत. पूर्वी जशा पटापट नोक-या लागायच्या किंवा ठरावीक जॉब स्किल्समुळे नोक-या लागायच्या, एखादी डिग्री असेल तर चटकन् माणसाला नोकरीसाठी उचललं जायचं. डिग्री असेल तर नोकरी मिळालीच समजा, असं आयटीतल्या नोकरी बाबत म्हटलं जायचं. पण आता नोकरीमध्ये व्यक्तिमत्त्वालाही अनन्य साधारण महत्त्व दिलं जात आहे. त्यात नोक-या कमी आहेत. तर अशावेळेला इंटरव्ह्यूचं बेसिक प्रिपरेशन कसं करावं? सोनाली मांजरेकर : इंटरव्ह्यूच्या बेसिक्स प्रिपरेशन्समध्ये कम्युनिकेशन स्किल्सना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. इंटरव्ह्यू देणा-या व्यक्तीकडे कुठलाही थॉट प्रोसेसच नाहीये असं वाटता कामा नये. इंटरव्ह्यू देणारी व्यक्ती स्वत:विषयी जरा जास्तच वाढवून सांगतेय, बढाया मारतेय... अशी भावना इंटरव्ह्यू घेणा-याच्या मनात येता काम नये. हल्ली इंटरव्ह्यूमध्ये व्यक्तिमत्त्वालाही ख्‌ूप महत्त्व दिलं जातं. असं नसतं तर इंटरव्ह्यू बायोडाटाचा झाला असता. व्यक्तीचा नाही. ड्रेस कोडकडेही बारीक लक्ष असतं. मुलींनी पंजाबी ड्रेसपेक्षा साडीचा वापर केल्यास उत्तम. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी आरशासमोर उभं राहून आधी बोलण्याची तयारी करावी. त्यानं इंटरव्ह्यू देताना आपण कसे दिसता, कसे बसता याचा अंदाज येतो. अशी प्रॅक्टीस करताना तुमच्यातल्या कॉन्फिडन्सचा, आत्मविश्वासाचा तुम्हाला अंदाज येतो. आणि हा आत्मविश्वास तुम्हाला पुढे ख्‌ूप उपयोगी पडतो. तो नोकरीही मिळवून देऊ शकतो. इंटरव्ह्यूला जाताना काय करू नये ? डॉमनिक कोस्टाबिर : जे तुम्ही नाही आहात ते इंटरव्ह्यूमध्ये सांगू नये. म्हणजे आता जर तुमच्याकडे जर दोन महिन्यांचा अनुभव आहे तर सीव्ही किंवा रेझ्युमीमध्ये लिहिताना तो दोन वर्षांचा आहे, असं लिहू नये. एखादं काम येत नसेल तर तो योतोय , असं ठामपणे कधी सांगायचं नाही. कारण आजकाल बॅक चेकिंग केलं जातं. आणि बॅक चेकिंगमध्ये जर तुम्ही दोषी आढळलात तर रेकमेन्ड लेटरशिवाय काढलंही जाऊ शकतं. व्यक्तिमत्त्व विकासाप्रमाणं तुम्ही तुम्हाला मिळालेल्या डिग्रीजचं डॉक्युमेन्टेशन कसं करतात, केलेलं डॉक्युमेन्टेशन किती ऑन्थेटीेक आहे याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. इंटरव्ह्यूला जाताना खूपदा अनेकांना भीतीपोटी नव्हर्सपणा येतो. तर त्या भीतीचा सामना कसा केला पाहिजे ? डॉमनिक कोस्टाबिर : मला जर अमूक एक नोकरी मिळाली नाही तर माझं आयुष्य स्पॉइल होईल, अशी भावना इंटरव्ह्यूला जाताना ब-याच जणांच्या मनात असते. तर या भावनेचा विचार करून कधीच इंटरव्ह्यूला जायचं नाही. असा विचार करत गेल्यावर आपसुकच टेन्शन येतं. माझ्याकडे अमूक एक क्वालिटीज आहेत. त्यांचा मी कंपनीला कशा प्रकारे उपयोग करून देऊ शकतो, असा विचार करून इंटरव्ह्यूला गेल्यास नक्कीच टेन्शन येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. जो होता है वो अच्छे के लिये होता है , असं शेवटी गीतेत म्हटलं आहेच ना ते उगाचच का ? तेव्हा पॉझिटिव्ह ऍटीट्युड महत्त्वाचा. इंटरव्ह्यू घेणा-यावर आपली छाप पाडावी यासाठी काय केलं पाहिजे ? सोनाली मांजरेकर : इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला पंधरा मिनिटांची खिडकी मिळालेली असते. या पंधरा ते वीस मिनिटाच्या खिडकीत तुम्हाला स्वत:ला तुमच्या अचिव्हमेन्टस्‌ना दाखवायचं असतं. समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय केलंय हे तेवढ्या 15 मिनिटांत सांगायचं असतं. त्या 15 मिनिटात जर तुम्ही नर्व्हस झालात तर कसं चालेल. तो तुमचा मोठा लॉस असतो. तेव्हा त्या पंधरा मिनिटांच्या संधीचा आपण पुरेपूर फायदा उठवायला पाहिजे. संधीचं सोनं करा. डॉमनिक कोस्टाबिर : कधी कधी आपल्याला 15 मिनिटंसुद्धा मिळत नाहीत. कधी कधी 5 मिनिटांत सगळं आटपलं जातं. त्यावेळी तुमचा वेश आणि पेशही तितकाच महत्त्वाचा असतो. पेहरावामुळंही लोकांना मुलाखतीत नाकारलं जातं. शहरी भागात मुलाखतीला येताना वेगळ्या पद्धतीची स्किल सेटस् लागतात. तर ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीची स्किल सेटस् असतात. पण सगळ्यात कोर स्किल सेट्स काय असतो ? सोनाली मांजरेकर : कोर स्किल सेट्स म्हणजे तुमचं स्वत:चं व्यक्तिमत्त्व. तुम्ही ज्या प्रकारचं काम करता, ज्या पद्धतीचं काम करता त्यातले बारकावे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. इंटरव्ह्यूला कॅन्डिडेटस्‌ला नेहमी त्याचंच टेन्शन येतं. तर हे टेन्शन येऊ नये याकरता तुम्ही ज्याप्रकारच्या कामाच्या इंटरव्ह्यूला जाता ते काम माहीत असणं महत्त्वाचं आहे. खास करून गावाकडची मुलं शहरी भागात इंटरव्ह्यूला येतात, त्यावेळी मी मुलाखत देऊ शकेन की नाही, असा न्यूनगंड या मुलांमध्ये निर्माण होतो. तर हा न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी काय करावं ? डॉमनिक कोस्टाबिर : न्यूनगंड निर्माण होऊ नये याकरता कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं असतं. आणि असा न्यूनगंड फक्त गावाकडच्याच मुलांमध्ये नाही तर शहरी भागातल्या मुलांमध्ये असतो. उदा. एखादी व्यक्ती जर वेल्डिंगचं काम करत असेल तर ती मुलाखतीला जाताना वेल्डिंग करून दाखवणार नाही. तर अशावेळी तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स आणि प्रामाणिपणा महत्त्वाचा असतो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माहीत नसेल तर सांगा की मला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाहीये. पण चुकीचं उत्तर देऊन वेळ मारून नेऊ नका. प्रामाणिकपणामुळे तुमच्या नोकरीचे चान्सेस वाढतात. इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही आधीचा जॉब का सोडता किंवा का सोडलात असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी उत्तर देताना आपल्या लिमिटेशन सांगाव्यात का ? सोनाली मांजरेकर : मुलाखतीला जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तेव्हा अति पॉलिटीकल उत्तर देण्यापेक्षा खरं ते उत्तर दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आता रिसेशनमुळे एखाद्याची नोकरी जर गेली असेल तर तसं उत्तर द्यावं. पण माझं माझ्या बॉसशी जमलं नाही म्हणून मी नोकरी सोडली, असं उत्तर न देणंच योग्य. खरी उत्तरं देताना तारतम्य बाळगावं. डॉमनिक कोस्टाबिर : माझं माझ्या बॉसशी किंवा कलीगशी जमलं नाही असं उत्तर देण्यापेक्षा आमच्यात काही अशा गोष्टी होत्या त्यावर तोडगा सापडत नव्हता म्हणून मी नोकरी सोडली, किंवा काहींनी जण आधीच्या जॉबला कंटाळून नोकरी सोडली, असं पेक्षा काहीतरी चॅलेंजिंग करावंसं वाटलं म्हणून नोकरी सोडली, अशी उत्तरं देणं कधीही चांगलं. ह्यालाच म्हणतात कम्युनिकेशन स्कील. कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ? सोनाली मांजरेकर : तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं, आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते. एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नसते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ? सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो. डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत. शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ? डॉमनिक कोस्टाबिर : असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं. नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ? डॉमनिक कोस्टाबिर : हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो. सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल. आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यावं ? डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही. सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं. अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यावं ? सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते.

इंटरव्ह्यूमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न -

तुम्हाला तुमचा सध्याचा जॉब का सोडायचा आहे?तुम्ही आमच्या जॉबसाठी कसे फिट आहात?तुम्हाला या वर्षी काय करायचंय?जर तुम्ही सिलेक्ट झाला नाहीत तर तुमची रिऍक्शन काय असेल?तुम्हाला नोकरीची गरज आहे की करायची आहे?तुम्हाला आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत काय?

इंटरव्ह्यूला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा -

विषय सांगितल्यावर लगेचच जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळतात.दुसरा कोणी बोलत असताना मधे बोलू नका.आपलं मत मांडताना सर्वांकडे बघून बोला.शांतचित्तानं एखाद्या व्यक्तीला दुजोरा द्या.जर तुम्हाला वाटलं की याशिवाय जास्त पॉइंट नाहीत तर तुम्ही समराईज करून डिस्कर्शन संपवा.

महिलांनी इंटरव्ह्यूला जाताना लक्षात ठेवायच्या गोष्टी :

व्यवस्थित कपडे घालून जाखूप घट्ट किंवा खूप सैल कपडे घालू नकामॅचिंग नेल पॉलिश लावालाईट लिपस्टिक लावाजॉबच्या नेचरप्रमाणे कपडे घालून जाखूप दूर जाणार असाल तर कपड्याचा एक जोड स्वत:बरोबर ठेवा

पुरुषांनी इंटरव्ह्यूला जाताना लक्षात ठेवायच्या गोष्टी :

मॅचिंग किंवा सफेद सॉक्स घाला.मॅचिंग किंवा सफेद रुमाल घेऊन जा.स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घाला.कपड्याचे बटन्स चेक करा.पैशाची नाणी किंवा किल्ल्या खिशात ठेवू नका.

इंटरव्ह्यू देताना (भाग - 2)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2009 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close