S M L

ग्रेट भेटमध्ये आरती अंकलीकर (भाग - 2)

ग्रेट भेटमध्ये रंगली सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांच्यासोबत अभिजात संगीताची मैफल. गेली तीन दशकं रसिकांना आरती ताईंच्या उत्कट गाण्यानं रिझवलं आहे. परम्परा आणि नवता, बुद्धी आणि भावना, यांचा समसमा संयोग त्यांच्या गाण्यात आढळतो. ग्रेट भेटमध्ये आरतीताईंच्या गाण्याचा, त्यांच्या आयुष्याचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल वागळे : या तीस वर्षांमध्ये तुम्हाला काय गवसलंय ? आरती ताई : गेली 35 वर्षं मी राग संगीताचा अभ्यास करत आहे. मी राग संगीताची साधना करत आहे. विद्यार्थिनी आहे. मला वाटतं आनंद म्हणजे काय, स्वानंद म्हणजे काय, आत्मानंद म्हणजे काय, याची ओळख मला या संगीतानं करून दिली आहे. ज्या मनोवस्थेत निरंतर राहण्याची माणसाला एक आस असते, त्या मनोवस्थेची ओळख करून दिली आहे. राग ही एक सिद्ध स्वराकृती आहे. जी आपल्याला एका अशा अवस्थेमध्ये घेऊन जाते िजथे आपण देहभान विसरतो. तहानभूक विसरतो. लहानपणी शाळेत असताना या वाक्‌प्रचारांचा कधी अर्थच कळला नव्हता. नंतर जेव्हा मी साधना करायला लागले, बुजुर्गांची गाणी ऐकायला लागले, तेव्हा देहभान विसरणं, तहान भूक विसरणं या शब्दांची प्रचिती आली. यमन राग गाताना यमनमय होऊन जाणं आहे, यमन होणं ही जी अवस्था आहे ती अवस्था महत्त्वाची आहे असं मला वाटतंय. निखिल वागळे : तुम्ही अगदी लहानपणापासून गायला सुरुवात केली आहे. तुमच्या काळातही तुम्ही एकप्रकारे लिटिल चॅम्पच होता. तुमची आईही गायची. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला संगीताची गोडी कशी लागली ? आरती ताई : मला गाण्याची गोडी होती. पण परिश्रमांची नव्हती. कारण ते वय अल्लड होतं. माझे आईवडिल छान गायचे. पण माझ्यात गाण्याची गोडी माझ्या आई-वडिलांनी निर्माण केली. त्यांनीच माझ्यात गाण्याचे संस्कार निर्माण केले. एक तान शंभर वेळा चांगली घोटल्यावर 101 व्या वेळा जेव्हा ती बाहेर येते तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. मग त्या शंभर वेळा म्हणण्याचं महत्त्व कळायला लागतं. माझ्या वडिलांनी माझ्याकडून ते करून घेतल्यावर मला त्याचं महत्त्व कळायला लागलं. वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेणं व्हायचं. तगडे स्पर्धक अयायचे. माझ्याबरोबर स्पर्धेत साधना सरगम असायची. तिची आईही एक जागरुक पालक होती. तिची आई तिच्याकडून चांगला रियाज करून घ्यायची. त्यामुळे ती अशी काही गायची की तिचं गाणं उत्तम व्हायचं. त्यामुळे आपणंही चांगलं गायलं पाहिजे ही भावना माझ्या मनात आपोआपच निर्माण व्हायची. आमच्यात हेल्दी स्पर्धा होती. साधनाबरोबरची प्रत्येक स्पर्धा मी भरपूर एन्जॉय केली आहे. आमच्यात हेल्दी स्पर्धा असायची. त्यामुळं चांगलं गाण्याचा अनुभव आपसुकच लक्षात यायला लागला. निखिल वागळे : त्यावेळी गाताना गाण्यातल्या शब्दातला अर्थ उमगत होता का ? आपण तान घेत आहोत त्या मागची भावना उमगत होती का, की गाणं गाताना काही वेगळी भावना जागृत व्हायची... की निव्वळ दुसरी चांगली गातेय म्हणून मी चांगली गातेय असं होतं ? आरती ताई : मला असं वाटतं की संगीताचं जे व्याकरण आहे, त्यात सूर आहेत. शब्द आहेत. लय आहे. सूर सुंदर सुरात येतायत. शब्दांची सुरेख फेक आहे. आवजाचं माध्यम आहे. त्याचंही मॉड्युलेशन उत्तम होत आहे. लय - भाव ज्याला आपण रिदम् म्हणतो तोही छान येत आहे. परंतु संगीत शेवटी याच्याही पलीकडे आहे. शब्द सुंदर असतात, सर्व काही लयीत असतं. पण त्यात भाव जो असतो तो मिसिंग असतो. मग हा भाव काय असतो, त्याचा मागोवा त्यावेळी घेतला जात होता. आणि त्या भावनेचं प्रत्यंतर येत होतं की, अशी काहीतरी गोष्ट आहे जी इन्व्हिझिबल आहे, ती मला कोणी दाखवू शकत नाही... सूर , लय आपण सांगू शकतो. भाव हा ऍबस्ट्रॅक आहे ना. भाव सांगणंच कठीण आहे. एकतर ते घेऊन जन्माला यावं लागतं... निखिल वागळे : म्हणजे भाव ही दैवी देणगी आहे का की ती नंतर प्रशिक्षणानं, तयारीनं कल्टीव्हेट करता येते ? आरती ताई : यात दोन्ही गोष्टी आहेत. आणि मी असेही गायक पाहिले आहेत ज्यांना चांगल्या मार्गदर्शनानं किंवा साक्षातकारानं या गोष्टी कळतात.निखिल वागळे : मी तुमच्या गाण्याचं वर्णन सुरुवातीला उत्कट असं केलं. तुमचं गाणं जसं उत्कट आहे तसंच ते रसरशीत जीवनानुभव देणारंही आहे. तुमचं गाणं लाईव्हली आहे. एका बाजूनं तुम्ही गाणं शिकला आहात, तुम्हाला गाण्याचं तंत्रही चांगलंच ठाऊक आहे. पण हा उत्कटपणा, रसरशीतपणा व्यक्तिमत्त्वात असल्याशिवाय तो गाण्यात येत नाही. तर मग हा रसरशीतपणा तुमच्यात कुठून आला ? आरती ताई : मला वाटतं हा रसरशीतपणा माझ्यात माझ्या आईवडिलांकडून आला. माझे आई -वडील प्रत्येक क्षण उत्कटतेनं आणि पूर्णत्त्वानं जगणारे आहेत. शेवटी लहानपणी प्रत्येकावर होणारे संस्कार हे फारच महत्त्वाचे असतात. कारण आपल्या आत एक विचार असणं आणि हा विचार बाहेर येण्याची जी क्रिया आहे, त्याला एक्स्प्रेशन मिळणं आणि त्याचप्रमाणं तो बाहेर येणं मग तो आनंद, दु:ख, चेह-यावरचं हास्य किंवा राग यापैकी काही असो हे व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. आमच्या घरांतल्या मनमोकळ्या वातावरणामुळं मी हे सारं शिकले. निखिल वागळे : हे सगळं होत असताना तुमचे आईवडील तुम्हाला काय सांगायचे ? आरती ताई : विद्या मिळवली पाहिजे. शिकलं पाहिजे. आणि नेहमी म्हणायचे की, आरती तुला गाण्याचं वेड लागू दे गं, म्हणजे पॅशन. गाताना गाण्याचं वेड लागणं हीच सर्वात महत्त्वाची भावना आहे. निखिल वागळे : गाण्याचं वेड लागण्याची सुरुवात तुमच्यात कशाप्रकारे झाली ? आरती ताई : परिश्रमांचं जेव्हा आनंदात रुपांतर होतं तेव्हा त्याला वेड लागणं म्हणतात. कारण परिश्रम हे परिश्रम वाटत असतात. कष्ट वाटत असतात. पण जे एक तान मी शंभरवेळा म्हणतेय ते परिश्रम वाटेनासे झाले की तो क्षण आनंदाचा. आणि मग अजून अजून तान म्हणण्याचं वेड लागतं. मी तान आता शंभर वेळा म्हणणार नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं अजून अजून वेळा म्हणणार आहे. एखादा राग 1 तास नाही तर दोन हजार तास म्हणेन. प्रत्येक स्वराची इन्टेन्सिटी काय आहे, तो स्वर काही तरी सांगत असतो, म्हणत असतो त्यावेळी त्याचा आणि माझा जो संवाद होतो ते महत्त्वाचं असतं. इंट्रोव्हर्ट होऊन जर आपण रियाज केला तर हे नक्की तुम्हाला जाणवेल. या क्षणातूनच वेड लागण्याची प्रक्रिया होत असते. निखिल वागळे : तुम्ही वेगवेगळे राग गाता. त्यावेळी डोळे मिटलेले किंवा उघडे असतात. त्यावेळी तुमच्या डोळ्यांसमोर काय असतं ? आरती ताई : सुरुवातीला रंग नसतात. पण वेगवेगळे आकार असतात. कारण स्वराकृती हा एकप्रकारचा आकार आहे. आरोह, अवरोह, वरती जाऊन खाली येणं किंवा वर्तुळाकार मिंढ असतात. कधीकधी हे आकार नाहीसेही होतात. त्यावेळी डोळ्यांसमोर खरं तर काहीच नसतं. सुरुवातीला एखादा बिंदू असतो. नंतर तोही नसतो. या आकारांच्या पलीकडे जाऊन गाणं म्हणणं हेच महत्त्वाचं असतं. निखिल वागळे : तुमचे आतापर्यंत तीन गुरू होते. पहिले वसंतराव कुलकर्णी , नंतर किशोरीताई आणि आता दिनकरराव कैकिणी. तर या तीन गुरूंचा तुमच्या गाण्यावर कशाप्रकारे परिणाम झालेला आहे ? आरती ताई : वसंतराव कुलकर्णी हे आग्रा ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत. प्रत्येक घराण्याची स्वत:ची अशी खासियत आहे. स्वर, शब्द आणि लय यांच्या सुंदर संगमानं राग संगीत उभं आहे. वेगवेगळ्या घराण्यांनी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन राग संगीतावर काम केलं आहे. त्याच्यामुळे आग्रा - ग्वाल्हेर घरण्याचं वेगळी अशी गायकी आहे. थोडीशी लयप्रधान, शब्दांच्या फेकीवर विशेष महत्त्व देणारी अशी गायकी आहे. वसंतराव हे अतिशय डोळस गुरू होते.ते श्ष्यिाच्या कुवतीप्रमाणे त्याला शिकवायचे. मला वाटतं हे फार मोठ्या गुरूचं लक्षण आहे. त्यामुळे माला त्यांनी किराणाही शिकवली होती. थोडीशी बढत अंगानं आलापी घ्यायला मी वसंतराव कुलकणीर्कडून शिकले. नंतर आग्रा शिकवलं. तालाच्या अंगानं लयकारी करणं, वेगवेगळे लयबंध निर्माण करणं शिकवलं. किशोरीताईंचं गाणं हे वेगळ्या शिस्तीचं जयपूर घरण्याचं आहे. ज्या गायकीत शब्द, लय आणि स्वर एकोप्यानं, हातात हात घालून जात आहेत. शुद्ध आकाराची अशी त्यांची गायकी आहे. मला वाटतं की ती सर्वात अवघड अशी गायकी आहे. शुद्ध आकारांमध्ये स्वरांकृतीतले बारकावे दाखवणं ही सर्वात चॅलेंजिंग बाब आहे. किशोरीताईंकडे गाणं शिकताना मला प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. त्या दृष्टीनं तो अनुभव वेगळा होता. किशोरीताईंकडून मी परत थोडेवर्षं वसंतरावांकडे शिकले. कैकिणींकडे मी अलिकडे गेले 10 वर्षं शिकत आहे. ते फार मोठे विद्वान आहेत. प्रत्येक घराण्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. प्रत्येक घराण्यात वेगवेगळे राग वेगवेगळ्या पद्धतींनी गायले जातात. ती त्या घाराण्याची खासियत असते. तर कैकिणींचा या सगळ्या विषयाचा बारकाईचा अभ्यास आहे. त्यांनी बंदिशी केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा व्हॉईस्स कल्चरचा चांगला अभ्यास आहे. व्हॉइस प्रोडक्शन म्हणजे काय, तो कसा येतो, आवाजाची निर्मिती करताना आपले कोणकोणते अवयव वापरले जातात, कुठले स्नायू वापरले जातात, कोणकोणत्या स्पेसेसमध्ये आवाजाचा प्रवास कसा होतो, आवाज उत्तम पद्धतीनं कसा वापला जातो, आपल्या आवाजाची स्ट्रेन्थ काय आहे. हे सारं त्यांनी मला ओळखायला शिकवलं. गळा हा उत्तम पाहिजे, पण आवाजाला बुद्धी आणि मन चांगला अर्थ देते. भारतीय संगीत हे स्वरस्थानांमध्ये नसून स्वरस्थानांना जोडणा-या दुव्यात आहे. ज्याला आपण मिंढ म्हणतो. गुरूजी एक वाक्य म्हणतात... पण ती आपल्या आयुष्याची खरी शिदोरी असते. किशोरीताई सांगायच्या की, गायक काय तो नित्य नूतन नवीन चुका करतो. रोज ती चुक दुरूस्त करायची. म्हणजे घडतंय आणि बिघडतंयही. निखिल वागळे : म्हणजे कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला मार्गदर्शनाची गरज असते तर... आरती ताई : हो. मला असं वाटतं की ते प्रत्येक क्षण त्याला काहीतरी शिकवत असतात. निखिल वागळे : तुमच्या तीन गुरूंचा व्यक्तिमत्त्वाचा तुमच्या गाण्यावर आणि त्या गाण्याच्या प्रवासावर कसा प्रभाव पडत गेला ? आरती ताई : वसंतराव अतिशय कडक शिस्तीचे होते. ते जगन्नाथ बुवा पुरोहितांसारख्या मोठ्या बुजुर्गांकडे शिकले आहेत. अतिशय परम्परा सांभाळणारे ते आहेत. त्यांच्या कडक शिस्तीचा परिणाम कळत नकळत का होईना पण माझ्यावर झाला आहे. बंदिश गात असताना अशी काही आमत ते घ्यायचे नि लयकारी घेऊन ते समेवर यायचे तेव्हा तर सगळंच बाऊन्सर जायचं. हे काय होतंय हेच कळत नसायचं. रामभाऊ मराठे गाताना तर ताल, लय त्यांना शरण गेलाय की काय असंच वाटायचं. मास्टरी म्हणजे नेमकं काय असतं, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर काळायचं. अनेक वेळा माझे गुरुजी ठेका द्यायला सांगायचे. त्यावर संथ लय चाललेली आहे. मग तबला वाजवणा-याला सांगायचे तू पण थोड्यावेळासाठी बाहेर जा. मीही जातो. पुन्हा आल्यावर आपल्या दोघांची तीच मात्रा असली पाहिजे. तर ती लय अंगात भिनलीय. या अशा काही गोष्टी वसंतरावांनी शिकवल्या होत्या. पण त्या त्यावेळी त्याचा अर्थ काय आहे हे काळायचं नाही. वसंतरावांनी मला गायकीची परम्परा आणि शास्त्र शिकवलं. किशोरीताईंनी काय नाही शिकवलं ते विचारा... स्वरांवर प्रेम कसं करायचं, सूर हाच आपला इश्वर असल्याची जाणीव किशोरी ताईंनी करून दिली. किशोरीताई खूपच परफेक्टशनिस्ट आहेत. त्या इतकी सुंदर रांगोळी काढतात, मग त्यांनी स्वेटर विणू दे की, फूलका करू देत... ती नितांत सुंदर होतेच होते. त्या कोणतीही गोष्ट आत घुसून करतात. त्या रागावल्या तरही तितकच्या प्रखरतेनं रागावतात. आणि प्रेमही विलक्षण करतात. मी त्यांच्याबरोबर तानपुरा साथीला जात असे. माझ्यासाठी मला आवडलेला ड्रेस त्या घेत असत. माझ्या कार्यक्रमाला तू माझी साडी नेस हं. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. मला वाटतं गुरुमाऊली म्हणजे त्या आहेत. मला सर्दीचा त्रास होता. त्या तितक्याच कळकळीनं मला डॉक्टरकडे घेऊन जायच्या. गाणं अनुभवणं, गाण्याची मनोवस्था अनुभवणं हे त्यांनी शिकवलं. म्हणजे किशोरीताई यमन राग गाताना त्या यमनमय होतात. त्यांच्यात मला यमनरागच दिसतो. किशोरीताई नाही. किशोरीताई ह्या नायगारा धबधब्यासारख्या आहेत. त्यांचे विचार नुसते कोसळत असतात. नवनिर्मिती म्हणजे काय ते किशोरीताईंकडूनच शिकावं. माझ्या गुरुजींनी गायलेली बंदिश, त्यांनी केलेली बढत, त्यांनी त्यात वापरलेल्या स्वराकृती, त्यांनी त्याच्यात केलेली लयकारी, शब्दफेक आवाजाचं मॉड्युलेशन हे जर मी केलं तर त्याला क्रियेटीव्ह म्युझिक म्हणता येईल का ? मला वाटतं नाही. यात स्वत:चा ाचिार महत्त्वाचा असतो. जो याच्याआधी कुणीही केलेला नसतो. मला वाटतं तशा किशोरीताई आहेत. नवनिर्मिती आणि उत्कटता म्हणजे काय तर किशोरी ताई. किशोरीताईंचं वर्णन करताना शब्दही कमी पडतात. निखिल वागळे : गाणं शिकताना तुम्ही घराणीही बदलली आहेत. आग्रा - ग्वाल्हेर मग जयपूर. तर अशी घराणी बदलण्याचा तुम्हाला त्रास झाला की फायदा ? आरती ताई : घराणं बदलताना मला नक्कीच त्रास झाला. आकारयुक्त गाणी गाताना तर झालाच झाला. कारण तुमच्या गळ्याबरोबरीनं तुमचं मन आणि बुद्धीही गात असते. घराणं बदलणं म्हणजे आपली संपूर्ण गायकीच बदलणं आणि गायकी बदलायची म्हणजे तुमचं थिंकिंगही बदलावं लागतं. तुमचे विचार बदलावे लागतात. ते खूप कठीण आहे. गाण्याची शैली बदलायची म्हणजे आधी सांगीतिक मूल्य बदलावी लागतात. हे सुंदर आहे की ते सुंदर आहे असं वाटू लागतं. त्यामुळे घराणी बदलणं ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. निखिल वागळे : मग तुम्ही या सगळ्याचा बॅलन्स कसा काय साधलात ? आरती ताई : ताकदीचा गुरू असला की सगळं काही नीट साध्य होतं. शिवाय गायकाला त्याची मानसिकताही बदलावी लागते. निखिल वागळे : तुम्ही किशोरी ताईंचं वर्णन ' नायगरा धबधबा ' असं केलंत. तुम्ही एका मुलाखतीत असंही म्हटलं आहे की, 24 तास एखादा माणूस धबधब्याखाली राहू शकत नाही. या विधानाचा अर्थ काय ? इथे किशोरी ताईंना कमीपणा देण्याचा कुठेही प्रश्न येत नाही. त्या महान आहेतच. म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपण्यासाठी तुम्हाला त्यांच्यापासून दूर व्हावंसं वाटलं का ? आरती ताई : आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणं प्रत्येक गायक गात असतो. बॉरोड विचार हा आपल्या स्वत:च्या शोधामध्ये उपयोगाचा नाही. प्रत्येकाला आपला आवाज, आपली बुद्धी, आपला विचार याची झेप किती आहे याचा प्रत्येकालाच अभ्यास करावा लागतो.आणि तोच शोध फार महत्त्चाचा आहे, असं मला वाटतं. जेजे मला वाटतं चुकीचंही असू शकतं. ताईंचे विचार प्रगल्भ आहेत. त्या बुद्धिमान आहेत. त्यांच्यासारख्या विदुषी मी आजपर्यंत तरी पाहिलेली नाही. संपूर्णत: संगीताला वाहून घेणं याचा अर्थ त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर कळतो. यावरून त्यांचे विचार काय असतात, याची प्रचीती येते. धबधब्या खाली माणूस बराच वेळ कसा काय राहू शकेल. त्यांच्या कॉम्पिलीकेटेड स्वराकृती पाहिल्यावर थक्क व्हायला होतं. म्हणजे सूर्याकडे पाहिल्यावर डोळे दिपतात. तशी आपली अवस्था होते. निखिल वागळे : किशोरीताईंकडे तुम्ही दोन वर्षं जात होता. त्यानंतर तुम्हाला शेवटच्या काळात पुल भेटले. पुलनी तुम्हाला वसंतरावांकडे जा, असा सल्ला दिला होता. तोपर्यंत तुमच्या मनात मी गाऊ शकणार नाही, असा गंड निर्माण झाला होता, हे खरंआहे का ? आरती ताई : किशोरी ताईंच्या नंतर काय करायचं हा माझ्या मनात प्रश्न आला होता. ताईंच्याकडे बसल्यावर लक्षात यायचं की त्यासमोर असल्यावर मी गाऊच शकत नाही. ही भीती नव्हती. त्यांनी माझ्सावर भरपूर प्रेम केलं. पण ताईंच्या थोर गायकीपुढे मला माझं गाणं खुजं वाटायला लागलं. त्यांच्या ऑरात मी खेचले गेले. ताई किती सुंदर गतात मी गायलाच नको, असं वाटायचं. त्याचं गाणं ऐकून मी स्तब्ध झाले. मला एनसीपीएची स्कॉलरशीप मिळत होती. त्यावेळी भााईकाका म्हणाले की तू वसंतरावांकडे जा. मग वसंरावांकडे जायला सुरुवात केली. निखिल वागळे : भाईकाकांचाही तुमच्या आयुष्यावर प्रभाव आहे ? आरती ताई : हो. कारण ते असताना मी नाट्यसंगीताचा कार्यक्रम एनसीपीएसाठी केला होता. ते चांगले श्रोता होते. जर एखाद्या व्यक्तीला गाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीनं अहंकारशून्य होणं गरजेचं आहे. मी यांना ऐकलंय, त्यांना ऐकलंय, असं डोक्यात ठेवून जर गाणं ऐकलं तर गाण्याचा आस्वाद घेता येणार नाही. मी चांगला श्रोता आहे हे भावंही कधी भाई काकांच्या मनाला शिवले नाही. ज्याक्षणी एखादा गायक समोर येई, त्याच्या गळ्यातून जी लकेर बाहेर येई त्याला ते दाद देत. तो क्षण ज्रगणं ही भाईकाकांची गोष्टच विलक्षण होती. भाई काका कुमारजी, भीमसेनजी, मन्सूरजी, वसंत राव यांची गायकी कोळून प्यायले होते. पण आमच्यासारख्या नवोदितांचं गाणंही ते तितक्या निरागसतेनं ऐकायचे. त्यांनी मला गाणीही शिवली आहेत. ती गाणी फक्त शिकवलीच नाही तर गाण्याचे भाव ओळखून गाणं कसं म्हणावं याचं प्रशिक्षण मला भाई काकांनी दिलं. निखिल वागळे : तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट आणि गाणं हा मेळ कसा काय साधलात ? आरती ताई : मला वाटतं की काही काही योग असतात. मी खरी रुईया कॉलेजमध्ये आर्टस्‌ला गेले होते. मला गणितात बी.ए. करायचं होतं. कारण गाण्याला जास्त वेळ देणं हे ठरवलं होतं. गाणं करायचं. गाण्यासाठी गाणं करायचं. अतिशय शुद्ध गाणं. मग ते नावासाठी नाही, पैशासाठी नाही, कीर्तीसाठी तर नाहीच नाही. गायला आवडतंय म्हणून गाणं गायचं. फार सुंदर काळ होता तो. आज मुलं असं ठरवू शकत नाहीत. मुलं आज पैसा पाहून शिक्षणाला प्राधान्य देतात. रुईयात असताना गाण्याला वेळ द्यायला फारसा वेळ मिळायचा नाही. कारण टाइम टेबल बदललं होतं. त्यामुळे पोदारमध्ये आले. निखिल वागळे : तुम्ही आर्टस् कडून कॉमर्सकडे आलात. बी. कॉम. झालात. नंतर एम. कॉम झालात. त्यानंतर तुम्ही बिझनेस मॅनेजमेन्ट केलंत. तुम्हाला कॉमर्स या विषयात रस होता का ? आरती ताई : हो मला रस होता, माझे सगळे कॉमर्सचे विषय मला खूप आवडायचे. निखिल वागळे : उदयचा तुमच्या गाण्यामध्ये काय सहभाग आहे ? काय योगदान आहे ? काय तुम्ही त्याला श्रेय द्याल ? आरती ताई : गाणारी बायको ही सर्वात जास्त कशात रमते तर संगीतात. संसार हा जरा बॅकसीटच घेतो. अशावेळी समजून घेणार नवरा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर मग सारखा कॉनफ्लिक्ट. मला त्याला इथं जाऊ का, तिथं जाऊ का, स्वानंदीची परीक्षा आहे मग परदेशी कसं जाऊ असं विचारावं लागल्याचं आठवत नाही. तो अतिशय अजस्टेबल आहे. माझ्या गाण्यातही तो तेवढाच रस घेतो. निखिल वागळे : तुमचा मोठा भाऊ हा स्पेशल चाईल्ड होता. तुम्ही असं एका ठिकाणी म्हटलंय की त्याला वाढवताना पाहून तुमच्यावरही खूप संस्कार झाले आहेत. तर त्याचा नेमका अर्थ काय ? आरती ताई : माझा मोठा भाऊ जन्मला आला तेव्हा त्याच्यात डाऊन सिन्ड्रोम होता. अंकलीेकर तुम्ही तुमच्या मुलावर फक्त प्रेम करा असं पिडीऍट्रीशियननं सांगितलं आणि आई - बाबांनी तसं केलं. त्याच्यावर खूप प्रेम केलं. त्याला प्रेमानं वाढवलं. मी दीड एक वर्षांची झाले आणि चालायला लागले. तो पाच वर्षांचा झाला तेव्हा चालायला लागला. माझ्या बाबांनी त्याच्यात आणि माझ्यात कधीच भेदभाव केला नाही. घरी कोणी पाहुणा आला तर त्याला आत लपवून ठेवलं नाही. त्याला नॉर्मल मुलाप्रमाणं वागणूक दिली. माझी वहिनी, तिची मुलं, उदय, स्वानंदीही त्याच्यावर भरपूर प्रेम करतात. तो गाण्यात उत्त रमतो. तर समाजाचा स्पेशल मुलांबाबतचा दृष्टिकोन बदलायाला पाहिजे. समोरच्यावर भरभरून प्रेम करा पण कोणती अपेक्षा ठेवू नका. आयुष्यात सगळं काही मिळत जातं. हा मूलमंत्र माझ्या आईवडिलांनी माझ्य मनावर चांगलाच बिंबवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2009 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close