S M L

दातांची निगा (भाग - 1)

17 फेब्रुवारीच्या ' टॉक टाइम 'चा विषय होता दातांची निगा. या विषयावर बोलण्यासाठी डेंटिस्ट डॉ.विवेक कर्वे आले होते.दातांच्या आरोग्याचं महत्त्व लोकांना हळूहळू समजू लागलं आहे.पूर्वी दात दुखू लागला म्हणजे तो काढून टाकणे एवढाच मार्ग शिल्लक असे.मात्र आता दात वाचवता येईल अशी आधुनिक उपचार पध्दत उपलब्ध आहे. अशाच नवीन उपचार पद्धती, दातांच्या समस्या, त्यांचे रोग, काळजी अशा प्रश्नांना उत्तरं डॉ.विवेक कर्वे यांनी टॉक टाइममध्ये दिली.दातांचं आरोग्य जपणं फार आवश्यक आहे कारण दातांचा संबंध ह्रदयरोग आणि आर्थरायटीसशी आहे, असं डॉ. कर्वेंनी सांगितलं. अन्न नीट चावून खाल्लं तर ते नीट पचतं. त्यामुळे अन्न चावण्यासाठी दात कॅव्हिटी फ्री असणं आवश्यक आहे. आपल्या डेंटिस्टकडून सहा महिन्यातून एकदा आपले दात तपासून घेणं आवश्यक आहे. जर योग्य पध्दतीनं दात घासले तर दातांच्या निम्म्या समस्या सुटू शकतात.दात घासताना हिरड्यांवरून दातावर खालच्या दिशेने ब्रश फिरवावा. तरच दात साफ होतात. अक्कल दाढ येण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे. कारण तोडांनं व्यवस्थित चावून खाणं हे कमी होतं चाललं आहे आणि निसर्गाचा नियम आहे की जो अवयव आपण वापरत नाही ती हळूहळू नष्ट होत जाते. त्यामुळे पुढच्या पिढीमध्ये अक्कल दाढ येण्याचं प्रमाण कमी होईल. आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. दिवसांतून दोन वेळा तरी दात घासणे अतिगोड पदार्थ खाणं टाळणे अशा सवयी अंगी बाणवल्या तर दात चांगले राहतील.असं मार्गदर्शन डॉक्टरांनी केलं. टॉक टाइममध्ये डॉ. विवेक कर्वे यांनी केलेलं मार्गदर्शन पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2009 10:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2009 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close