S M L

वीकएन्ड खाबुगिरी (भाग - 1 )

टॉक टाइमचा विषय होता वीकएन्ड खाबुगिरी. म्हणजे सुट्टीच्या दिवसांची खाद्ययात्रा. वीकएन्ड खाबुगिरी या विषयावर शेफ आशा खटाव यांनी प्रेक्षकांपुढे खाद्यजत्रेच्या रेसिपीजची पोतडी रिकामी केली. मुळातच कोणत्याही पदार्थाची थोडी तयारी आधी करून ठेवली तर स्वयंपाकाचा वेळ वाचतो.वीकएन्डला लोकांकडे वेळ असतो.त्यमुळे नवनवीन पदार्थ ट्राय करून पहाता येतील.भारतीय खाण्याबोरबरीनं सूप आणि सलाड असे पाश्चास्त पदार्थही करून पहा, असा सल्ला शेफ आशा खटाव यांनी प्रेक्षकांना दिला. नवनवीन रेसिपीजसाठी अनेक वेबसाईटस् आणि पुस्तकं आहेत. त्याचा उपयोग करता येईल. वेगवेगळ्या फळांच्या ज्यूसपासून मॉकटेल्स तयार करता येतात. जी जेवणाआधी किंवा जेवतानादेखील घेता येतात, असंही त्या म्हणाल्या. आशा खटाव यांनी कार्यक्रमात सांगितलेल्या अनेक रेसिपीज पैकी एक रेसिपी - ग्रेप ज्युस पंच एका मोठ्या भांड्यात साखर घेऊन त्याच्यात पाणी घालून पाक करा.त्यात लाल किंवा पांढर्‍या द्राक्षाचा रस घाला.मिश्रण चांगले एकत्र करा.आता यात सफरचंद, चिकू आणि स्टॉबेरी या सारख्या फळांचे तुकडे घाला.एका उंच ग्लासमध्ये तळाशी बर्फाचे खडे घालून त्यात हे सगळे मिश्रण ओता आणि थोडा सोडा घालून सर्व्ह करा थंडगार ग्रेप ज्युस पंच.स्वयंपाक करताना काही महत्त्वाच्या टीप्स - वीकेन्डला स्वयंपाक करताना वेळ कमी लागणारे पदार्थ करा.अंड्याचे पदार्थ करताना त्यात थोडं दूध घातलं तर पदार्थ मऊ होतात.लसूण कापताना त्यावर थोडं मीठ चोळावं म्हणजे लसूण वाळत नाही.सलाड करताना मेयोनीज सॉसमधील कॅलरीज टाळण्यासाठी दही वापरावं.घट्ट दह्यात थोड मीठ, मीरपूड आणि मोहरी वाटून ते दही सलाडसाठी वापरावं.आलं-मिरचीचं वाटण करताना त्यात थोडी साखर, मीठ आणि लिंबू पिळलं तर पेस्टचा हिरवा रंग टिकतो.भजीच्या पिठात शिजलेलं तुरीचं वरण घालावं म्हणजे भजी कुरकुरीत होतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2009 12:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2009 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close