S M L

झालाचं पाहिजे - भाग 3

झालाचं पाहिजे - भाग 3येळ्ळूर मधल्या बुजुर्गातल्या प्रत्येकाने सीमा संघर्षात कर्नाटक सरकारचा तुरुंगवास भोगलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात या प्रश्नाची आग अजूनही धुमसते आहे. आता हा लढा नव्या पिढीने पुढे चालू ठेवावा असं या जुन्यांना वाटतंय.पण नव्या पिढीला याचं गांभीर्य नाही अशी त्यांची खंत.येळ्ळूरचे निवृत्त शिक्षक चांगदेव धामणेकर सांगतात, तरुण पिढी ऐकत नाही. गेले ते दिवस. कुणी कुणी ऐकत नाही.सर्व तरुण मराठीच आहेत. पण ते लोक निवडणुकीत कोट्यांनी पैसा खर्च करतात.आणि निवडून येतात. त्यानंतर मुलांना काही देत नाही.कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा वादाचा संघर्ष आता चौथ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचलाय.पण या चौथ्या पिढीपुढे सीमावादापेक्षा मुख्य समस्या आहे ती रोजगाराची. कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती लागू केल्यापासून 20-22 वर्षांनी का होईना इथल्या तरुणांना कन्नड लिहिता वाचता येऊ लागलंय. पण याचा फायदा केवळ नोकरीच्या अर्जाचे फॉर्म भरण्यापुरताच. संपूर्ण कन्नड येणा-यांना इथे 15 टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे.बेळगावजवळच्या रानीचंद गावचा सायन्स डिप्लोमा झालेला किरण पवार कर्नाटक सरकारच्या नोकरीसाठी अनेक वर्षं प्रयत्न करतोय. पण गेली 20 वर्ष त्याच्या गावातल्या कुणालाच सरकारी नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे बेळगाव महाराष्ट्रात जाऊन हा प्रश्न सुटेल यावर त्याचा विश्वास नाही.किरण पवार मराठी बेरोजगार सांगतो, आता जर न्याय मिळायचा असेल तर 25 टक्के आरक्षण हवं. महाराष्ट्राला त्यांचं विदर्भ, नागपूर साभांळायला येत नाही मग आम्हाला काय सांभाळणार. आमची मराठी मुलं गावात प्लंबरचं तसंच गवंडी काम करतात. महाराष्ट्रात जाऊन आमचा उध्दार होईलच असं नाही.सीमा संघर्षाला जरी दैदीप्यमान इतिहास असला तरी तरुणांपुढे आता आव्हान आहे ते वर्तमानाचं. त्यामुळे या लढ्यात आणखी किती वर्षं वाया घालवायची असा त्यांचा सवाल आहे.पण म्हणून इतक्या जणांचा इतक्या वर्षाचा त्याग काय फुकट घालवायचा ? कुणीतरी नेतृत्व करायलाच हवं म्हणून मग कर्नाटक पोलिसांनी अटक केली तरी एन डी पाटील डगमगत नाहीत.बेळगाव केंद्रशासित करायचं की महाजन आयोग लागू करायचा की सीमाभागातल्या जनतेचं सार्वमत घ्यायचं नेमकं काय करायला हवं इतकी वर्षं होऊन गेल्यानंतर ? एका सीमाप्रश्नाने आज हजारो समस्या निर्माण झाल्या. या समस्यांचा सामना करताना सीमावासीय मेटाकुटीला आले. कुणाकडूनही आता त्यांना अपेक्षा नाही. कर्नाटक सरकार यांना जुमानत नाही आणि यांची मतं महाराष्ट्रात नसल्यामुळे महाराष्ट्राच्या ते फायद्याचे नाहीत.आई जेऊ घाली ना आणि बाप भिक मागू देईना अशा बिकट अवस्थेत असलेलं काठावरचं त्यांचं हे जगणं दिवसेंदिवस उमेद हरवत चाललंय.बॅ नाथ पै, एसएम जोशी आचार्य अत्रे कॉम्रेड डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे बाबूराव ठाकूर, बाळासाहेब ठाकरे अशा सगळ्या माणसांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा ,शेकडोंचे हौतात्म्य हजारोंचा तुरुंगवास मागण्या मोर्चे आंदोलने निवेदने असा सगळा स्वातंत्र्यानंतरच्या स्वातंत्र्यासाठीचा सुरू असलेला तब्बल 52 वर्षाचा हा लढा आणखी किती वर्षं सुरू राहणार. बेळगावची आग आणखी किती वषैर् धुमसत राहणार की हा सगळा संर्घष काळाच्या पडद्याआड जाणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे...

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2009 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close