S M L

मिलेनियर मुंबई भाग 1

मिलेनियर मुंबई भाग 1मुंबई चकाचक आहे. तशीच इथं झोपडपट्टीही आहे. स्लमडॉग मिलेनियरमध्ये इंग्लंडचे दिग्दर्शक डॅनी बोएल यांनी या दोन बाजूंपैकी या झोपडपट्टीतल्या जगण्याचा सिनेमामध्ये परफेक्ट वापर केला. कच-याच्या ढिगात, घाणीमध्ये जेव्हा हे शूटिंग चाललेलं तेव्हा इथल्या लोकांनी या सिनेमाला गांर्भीयानं घेतलं नव्हतं.धारावी पाईलाईनची रहिवासी रुबीना सांगते, आम्ही हे सगळं हसण्यावारी घेतलं. कच-यात शूटिंग होते का? अशा कच-यात कोणी सिनेमा बनवतं का? पण पहा, आज या सिनेमाने ऑस्कर मिळवलंय.मुंबईतला स्लम एरिया. तिथं चालणारे निरनिराळे व्यवहार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. सिनेमात डॅनीनी याचा खुबीनं वापर केला. मुंबईची अस्सल छाप असलेल्या या जागा, परदेशी दिग्दर्शकानं कशा निवडल्याअसतील हा प्रत्येकाला पडलेला मोठा प्रश्न होता. त्यासाठी डॅनीने पहिल्यांदा शोधला एक अस्सल मुंबईकर. त्याचं नाव लोकेशन मॅनेजर राहुल खंडारे. राहुलने 70 दिवस चाललेल्या मुंबईतल्या शूटिंगसाठी एकसोएक जागा शोधून काढल्या. राहुलने सिनेमा बनवताना कोणकोणत्या आव्हानाना सामोरं जावं लागलं तसंच शूटिंगच्यावेळी कोणकोणत्या धम्माल गोष्टी घडल्या हे सांगितलं. राहुल सांगतो, स्लमडॉग मिलेनियरमध्ये सगळ्यात गाजलेला जो शॉट आहे तो म्हणजे छोटा जमाल अमिताभला भेटायला जातो तो. त्या शॉटचं शूटिंग विलेपार्लेतल्या नेहरुनगरमध्ये करण्यात आलं होतं. या शॉटच्या वेळी ज्या गंमती झाल्या त्या बद्दल राहुल सांगतो, आम्ही काय केलं की आयुशला सांगितलं तुला याच्यात उडी मारायची आहे. तर तो तयारच होईना मग मी त्याला समजावलं की अरे ही घाण नाही. बिस्कीट आणि चॉकलेट आहेत ती. पण त्याला ती घाणच वाटायची. तो तयारच होईना.असं करता करता आठ रिटेक झाले. पण तो शॉट त्याने चांगला केला. इतक्या लहान वयात आणि त्याने पहिल्यांदाच केलेली ती स्टंटबाजी होती. मुंबईतल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये स्लमडॉगचं शूटिंग नऊ महिन्यांपूर्वी झालं.मायटी हार्टच्या शूटिंगप्रमाणे स्लमडॉगच्या शूटिंगची काही चर्चा झाली नव्हती. सिनेमाला आंतरराष्ट्रीय यश मिळालं आणि त्यामध्ये आलेल्या लोकेशन्सबद्दल वाद सुरू झाले.धारावीची बदनामी झाल्याचे आरोप झाले. तर दुसरीकडे प्रसिद्ध असलेली धारावी अधिकच प्रकाशझोतात आली. सिनेमात मुलं धारावीतल्या पाईपलाईनवरून पळत होती. खरं तर ती पाईपलाईन म्हणजे इथला रहदारीचा रस्ता आहे. मग या रहदारीच्या रस्त्यावरून शूटिंग करताना अनेक अडचणी आल्या. म्हणजे मुळात या पाईपलाईनवरून पळण्याची त्या मुलांना सवय नव्हती. तसंच लोक सारखे ये-जा करायचे. त्यांना थांबवावं लागायचं. खूप रिटेक झाले होते त्या शॉटचे. त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागली. आजूबाजूच्या घरातून लोकं डोकावयाचे.त्यांना सारखं घरात परत घालवायला लागायचं.आयुश खेडेकर आणि तन्वीप्रमाणेच अझर आणि रूबीनानेही प्रेक्षकांची दाद मिळवली. त्या दोघांचं जीवन बदललं ते या सिनेमात त्यांनी केलेल्या कामामुळे. बांद्र्याच्या झोपडपट्टीत राहणा-या या दोघावरंही ऑस्करमुळे जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. नऊ वर्षाची रूबिना आता स्टार झाली आहे. छोट्या लतिकाचं काम करणारी रुबिना कुरेशी, बांद्रा झोपडपट्टीतली सेलिब्रेटी आहे. तिच्या पालकांचं तर म्हणणं आहे की, फेमस बनणं म्हणजे काय ते आम्ही आत्ता जगतोय. रफीक कुरेशी रुबिनाचे वडील सांगतात, या आधी आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं. पण आता सारा देश आम्हाला ओळखतो.रुबिनाला घरं देण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलं. स्लमडॉगमध्ये तिनं तीस दिवस केलेल्या कामाचा कमी मोबदला मिळाला असल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. पण रुबिनाच्या वडिलांना यापैकी कुठलाच आरोप मान्य नाही. रुबिनाला मिळालेल्या सगळ्या यशाचं श्रेय ते देतात दिग्दर्शक डॅनी बोएलना.रुबिनाचा जवळचा मित्र बांद्रा झोपडपट्टीतच राहणारा मोहम्मद अझरुद्दीन इस्माईल. हा स्लमडॉगमध्ये सलीम आहे. अझरच्या नावाला आतापर्यंत ओळख होती ती भारताच्या एका क्रिकेटरची. आता या अझरचीही वेगळी ओळख तयार झाली आहे. आत्ता घरात पराठा आमलेट खाणा-या अझरला दोन वेळचं जेवणही खरं तर मुश्कीलीनं मिळतं. त्याचे वडील टीबीचे पेशंट आहेत. रुबिनाप्रमाणेच त्यालाही घरं देण्याचं आश्वासन राज्यसरकारनं दिलंय.अझर आणि रुबीना आता इंग्लिश माध्यमाच्याशाळेत जातात. डॅनीने त्यांना या शाळेचा खर्च दिला आहे. ते दोघंही 18 वर्षाचे होईपर्यंत दर महिन्याला डॅनीकडून खर्चासाठी त्यांना पैसे पाठवले जाणार आहेत. स्लमडॉग मिलेनियरने या मुलांच्या घरची परिस्थिती बदलली नसली तरी ती बदलण्यासाठीची संधी मात्र या सिनेमाने नक्की दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2009 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close