S M L

मिलेनियर मुंबई भाग 3

मिलेनियर मुंबई भाग 3करोडपती बनण्याचं स्वप्न आणि अनुभवातून मिळालेलं ज्ञान याच्या जोरावर जमाल करोडपती बनला. आठ ऑस्कर घेऊन जगभरात चमकला. पण असे कितीतरी करोडपती धारावीत आहेत. पण इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना कुठल्या रिऍलिटी शोची मदत मिळाली नाही. त्यासाठी त्यांना करावा लागला कमालीचा संघर्ष.त्यापैकीच एक मोहम्मद अन्वर. धारावीतल्या अफरीन लेदर वर्कचे मालक. ते बिहारहून नोकरीच्या शोधात मुंबईत आले. लेदर कामगार म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली.आणि आज त्याचा स्वत:चा कारखाना आहे. त्यांच्या टर्न ओव्हर आहे एक कोटींचा.अन्वर यांच्या कारखान्यात 50 मुलं काम करतात. धारावीच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये अनेक यशस्वी लोक आहेत. 8 बाय 10 ची एक खोली हेच त्यांचं घरं असतं. एचडीएफसीचे डेप्युटी बँक मॅनेजर राजेश वाकटकर सांगतात, मी तर आधी याच्याहून लहान घरात राहायचो. मी लोकांना सांगायचो की, मी धारावीत राहतो तेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रश्न पडायचे. पण धारावीची खरी माहिती करून न घेता त्याबद्दल मतं बनवणा-यांना राजेशला एवढंच सांगायचं आहे की, धारावीत अनेक चांगल्या गोष्टीही घडतात.इथल्या प्रत्येकाने स्वत:ची यशस्वी कहाणी स्वत:च घडवली आहे. टोकाच्या विरोधी परिस्थितीशी संघर्ष करून, त्यांची नोंद कुठल्याच पुरस्काराने घेतलेली नाही. पण त्यांची जिगर मात्र डॅनी बोएलनं ओळखली. आणि जगापर्यंत पोचवली. जय हो...

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2009 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close