S M L

मिलेनियर मुंबई भाग 2

मिलेनियर मुंबई भाग 2स्लमडॉग मिलेनियर सिनेमा तयार होत असताना त्याच्या मागे अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घडत होत्या. सिनेमात मुलांचे कपडे बघितले की ते झोपडपट्टीतलेच राहणारे वाटतात.आणि याचं क्रेडिट जातं ते सिनेमाचे कॉस्च्युम डिझायनर रियाझअली यांना. रियाझअलींशी आम्ही गप्पा मारल्या तेव्हा कपडे बनवण्यासाठी काय काय कष्ट करावे लागले ते रियाझनी सांगितलं.रियाझअली मर्चंट सांगतात, आम्ही स्लममध्ये जाऊन राहिलो तिथली मुलं कधी कोणते कपडे घालतात हे आम्ही पाहिलं. ती मुलं कशी राहतात. केव्हा आंधोळ करतात, त्यानंतर कोणते कपडे घालतात हे आम्ही पाहिलं. आणि त्यानुसार आम्ही कपडे बनवले. फक्त एवढचं नाही तर त्या कपड्यांवर अनेक प्रक्रियाही करण्यात आल्या.आणि त्यानंतर त्यांचा वापर करण्यात आला.सिनेमातल्या अनेक शॉटसच्या आधी खास तयारीही करण्यात आली होती. छोटा जमाल जेव्हा सबवेमध्ये आपल्या मित्राला भेटतो. त्याचं शूटिंग सांताक्रूझच्या सबवेमध्ये झालेलं.या शॉटबद्दल राहुल खंडारे सांगतो, या सबवेमध्ये शूटिंगच्याआधी प्रचंड घाण होती. दुर्गंधी होती त्यासाठी आम्ही तिथं फिनाईल वगैरे टाकून सगळं साफ केलं. स्लमडॉग मिलेनिअरचं सगळं शूटिंग फक्त धारावीमध्ये करण्यात आलंअसं अनेकांना वाटतं. पण तसं नाही, सिनेमातलं बरचंस शूटिंग विलेपार्ले इथल्या नेहरुनगरमध्येही करण्यात आलं आहे. याशिवाय कुर्ला झोपडपट्टी, साकीनाका झोपडपट्टी, मरोळ, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड, पवई, पवनहंस, धोबीघाट, पिला हाउस, रोशन टॉकीज - ग्रँट रोड, बांद्रा रेक्लमेशन, टुलीप स्टार-सांताक्रूझ, अंधेरी फ्लायओव्हर, जुहू तारा रोड, व्हीटी स्टेशन, जे जे आर्ट कॉलेज, एन डी स्टुडिओ-कर्जत, पेण रेल्वे स्टेशन, दिल्ली, जयपूर, आग्रा, उटी आणि कुलू मनालीइथंही करण्यात आलं आहे. तरीही धारावीमध्ये स्लमडॉगच्या नावावरून त्याला विरोध झालाच.आशियातली सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असं नाव असलेली ही धारावीची झोपडपट्टी फक्त मोडक्यातोडक्या झोपड्यांची नाही. तर इथं पत्र्याची घरं आहेत. कौलारू चाळी आहेत आणि अगदी पक्क्या इमारतीही आहेत.धारावी नक्की आहे तरी कशी? धारावीतल्या झोपडपट्टीची स्वत:ची एक संस्कृती आहे आणि त्याचं एक अर्थकारणंही आहे. खरा गरीब तो नसतो ज्याच्याकडे पैसे नसतात. तर तो असतो जो मनाने गरीब असतो. ज्याच्याकडे स्वप्न नसतात.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2009 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close