S M L

मेक-अपच्या टीप्स

5 एप्रिलच्या टॉक टाइमचा विषय होता मेक-अपच्या टीप्स. या विषयावर ब्युटिशियन धनश्री ओक यांनी मार्गदर्शन केलं. सौंदर्याचा संबंध आपल्या आत्मविश्वासाशी असतो. तुमचं दिसणं हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग असतो. चांगलं दिसावं पण मेकअप केला जातो. हा मेकअप करताना जर आपण आपल्या त्वचेचा पोत ओळखून मेकअप केला नाही तर आपल्याला ते भारी पडतं. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि सामान्य त्वचा असे आपल्या त्वचेचे प्रकार असतात. त्यानुसार मेक अप करावा, हा महत्त्वाचा सल्ला देताना धनश्री ओक सांगतात, " कोणतंही प्रसाधन विकत घेताना ते स्वस्त आहे का महाग यापेक्षा आपल्या त्वचेला ते सूट होतंय का हे तपासावं. त्यासाठी मानेजवळ फाउंडेशन लाऊन पहावं त्यानंतर 24 तासात जर कोणतीही पुरळ उठली नाही तरच ते प्रोडक्ट वापरावं. " आता हळूहळू उन्हाळा सुरू व्हायला लागला आहे. तेव्हा घराबाहेर पडताना सन ब्लॉक लोशन लावावं,ऑफिसला जाताना अगदी हलका मेक अप करावा तेव्हा डोळे आणि ओठांचा मेक आप महत्त्वाचा असतो, " असं धनश्री ओक म्हणाल्या. उन्हाळा हा लग्नसराईसाठी फार महत्त्वाचा मोसम. लग्न म्हटलं की मेकअप आलाच की. तेव्हा लग्नासाठी मेक अप करताना तो थोडा हेवी असावा कारण लग्नात मोठमोठे दिवे असतात आणि नवरीला खूप वेळ उभं रहायचं असतं. पण एक लक्षात ठेवावं की मेक अपनं आपला चेहरा थोड्या प्रमाणात बदलू शकतो. मात्र आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी व्यायाम या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपला चेहरा. मुळात त्याचीच काळजी घेतली की मेक अपनं आपलं रुप खुलायला मदत होते, असंही धनश्री ओक म्हणाल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2009 11:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2009 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close