S M L

जागतिक महिला दिन विशेष (भाग - 1 )

गावडखेडच्या लोकांपर्यंत टीव्ही पोहोचतो हे पाहता आयबीएन - लोकमतनं एक आगळावेगळा प्रयत्न केला. जागतिक महिलादिनाचं औचित्य साधून आयबीएन लोकमतनं अशा विषयाला हात घातला की ज्याच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही. आणि तो विषय तो विषय होता स्त्रियांची मासिक पाळी. स्त्रियांच्या मासिकपाळी बद्दलच्या खुल्या चर्चेत गुंजसंस्थेचे अंशू गुप्ता आणि लेखिका आणि खेडोपाड्यांत जाऊन बचत गटांसाठी काम करणा-या सुषमा देशपांडे आल्या होत्या.मासिक पाळीच्या चर्चेत पुरूषांचा सहभाग का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण अंशू गुप्ता कोणी स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत. तरीही ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये सॅनेटरी नॅपकिन्सविषयी जागृती निर्माण व्हावी, मासिक पाळीच्या वेळी त्यांनी स्वत:ची नीट काळजी घ्यावी, त्यादिवासांत कापडांचा वापर करत असला तर ते कापड कोणत्या प्रकारचं असायला हवं याची माहिती अंशू गुप्ता या महिलांना देतात ते त्यांच्या ' गुंज ' या संस्थेच्या मदतीनं. कॉर्पोरेट सेक्टरमधली लठ्ठपगारची नोकरी सोडून अंशू गुप्तांना काय वेड लागलं होतं म्हणून ते अशा कामाकडे वळले ? नाही. तर याला कारणीभूत आहे फिरोजाबादमधल्या स्त्रीचा मृत्यू.1998 मध्ये अंशू गुप्ता उत्तरप्रदेशमधल्या फिरोजाबादमध्ये गेले होते. तेव्हा तिथल्या गरीब महिलेचा मृत्यू त्यांनी जवळून पाहिला होता. मासिक पाळीच्यावेळी गंजलेल्या हूक असलेल्या ब्लाऊजचा वापर एका स्वीनं मासिक पाळीच्या वेळी केला होता. त्या गंजलेल्या हुकामुळेत्या बाईला सेप्टीकझालं. काही काळातच तिनं जगाचा निरोप घेतला. अंशू गुप्ता त्या घटनेचे साक्षीदार होते. ज्या बाईला नेसायला अंगभर पुरेसे कपडे मिळत नाही ती बाई कशी काय मासिक पाळीच्या वेळी चांगल्या कापडाचा किंवा सॅनेटरी नॅपकीनचा वापर तरी कशी करणार ? या प्रश्नानं अंशू गुप्तांच्या हृदयात प्रचंडकालवा कालव झाली. मग ठरवलं गावकुसांतल्या स्त्रियांच्यात त्यांच्या या अती महत्त्वाच्या प्रश्नाबाबत जागृती घडवून आणयची. त्यातूनच 1998 सालीगुंजची स्थापना झाली.कामाला सुरुवात करण्यापूर्वी गुंज या संस्थेनं एक सर्वे केला. त्या सर्वेत त्यांना असं आढळून आलं की भारतात अजूनही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी वाळू, राख, जुन्या बॅग्ज, वर्तमानपत्र वापरतात. तर काही भागात पॉलिथीनच्या पिशव्यांचा वापर केला जातो. ही धक्कादायक माहिती काळजाचाथरकाप उडवणारी आहे. अशू गुप्तांनी काही महिलांना घेऊन घरगुती सॅनेटरी नॅपकीन बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी दिल्लीत एक कॅम्पेनकेलं आणि ते कॅम्पेन होतं जुने कपडे दान देणं. हे कॉटनचे जुने कपडे नीट व्यवस्थित कापून, स्वच्छ धुऊन त्यापासून सॅनेटरी नॅपकीन तयार केलेजातात. दर महिन्याला गुंज 20 हजार किलो जुने कपडे गोळा करते. दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, जालंदर इथे गुंजचे कलेक्शन सेंटस आहेत. दरमहिन्याला एवढे किलोनं कपडे फुकट जातात. या फुकट जाणा-या कपड्यांपासून सॅनेटरी नॅपकीन तयार करण्याची प्रोसिजर फार सोपी आहे. तरीही खेड्यापाड्यांतल्या महिलांवर अशी परिस्थिती का यावी ? हा प्रश्न चर्चेत जेव्हा अंशू गुप्तांनी उपस्थित केला तेव्हा एकदम अवाक् व्हायला होतं. तर असे हे अंशू गुप्ता सीएनएन आयबीएनच्या रिअल हिरो बहुमनाचे मानकरी ठरले आहेत. अंशू गुप्तांनी चर्चेत फक्त आपल्या कार्याविषयी सांगितलं नाही. तर त्यांना आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं. त्यावेळी लेखिका सुषमा देशपांडे याहीबचत गटाचं काम करताना स्त्रियांच्या काही समस्या त्यांना आढळून आल्या, त्या त्यांच्याशी बोलल्या ते अनुभव सांगितले.अंशू गुप्ता आणि सुषमा देशपांडे यांची चर्चा आणि अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.स्त्रियांची मासिक पाळी या विषयाला वाहिलेल्या या कार्यक्रमाचे पुढचे दोन भाग पाहण्यासाठी पुढील लिंक्सवर क्लिक करा. जागतिक महिला दिन विशेष (भाग - 2 ) जागतिक महिला दिन विशेष (भाग - 3 )

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2009 08:49 AM IST

गावडखेडच्या लोकांपर्यंत टीव्ही पोहोचतो हे पाहता आयबीएन - लोकमतनं एक आगळावेगळा प्रयत्न केला. जागतिक महिलादिनाचं औचित्य साधून आयबीएन लोकमतनं अशा विषयाला हात घातला की ज्याच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही. आणि तो विषय तो विषय होता स्त्रियांची मासिक पाळी. स्त्रियांच्या मासिकपाळी बद्दलच्या खुल्या चर्चेत गुंजसंस्थेचे अंशू गुप्ता आणि लेखिका आणि खेडोपाड्यांत जाऊन बचत गटांसाठी काम करणा-या सुषमा देशपांडे आल्या होत्या.मासिक पाळीच्या चर्चेत पुरूषांचा सहभाग का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण अंशू गुप्ता कोणी स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत. तरीही ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये सॅनेटरी नॅपकिन्सविषयी जागृती निर्माण व्हावी, मासिक पाळीच्या वेळी त्यांनी स्वत:ची नीट काळजी घ्यावी, त्यादिवासांत कापडांचा वापर करत असला तर ते कापड कोणत्या प्रकारचं असायला हवं याची माहिती अंशू गुप्ता या महिलांना देतात ते त्यांच्या ' गुंज ' या संस्थेच्या मदतीनं. कॉर्पोरेट सेक्टरमधली लठ्ठपगारची नोकरी सोडून अंशू गुप्तांना काय वेड लागलं होतं म्हणून ते अशा कामाकडे वळले ? नाही. तर याला कारणीभूत आहे फिरोजाबादमधल्या स्त्रीचा मृत्यू.1998 मध्ये अंशू गुप्ता उत्तरप्रदेशमधल्या फिरोजाबादमध्ये गेले होते. तेव्हा तिथल्या गरीब महिलेचा मृत्यू त्यांनी जवळून पाहिला होता. मासिक पाळीच्यावेळी गंजलेल्या हूक असलेल्या ब्लाऊजचा वापर एका स्वीनं मासिक पाळीच्या वेळी केला होता. त्या गंजलेल्या हुकामुळेत्या बाईला सेप्टीकझालं. काही काळातच तिनं जगाचा निरोप घेतला. अंशू गुप्ता त्या घटनेचे साक्षीदार होते. ज्या बाईला नेसायला अंगभर पुरेसे कपडे मिळत नाही ती बाई कशी काय मासिक पाळीच्या वेळी चांगल्या कापडाचा किंवा सॅनेटरी नॅपकीनचा वापर तरी कशी करणार ? या प्रश्नानं अंशू गुप्तांच्या हृदयात प्रचंडकालवा कालव झाली. मग ठरवलं गावकुसांतल्या स्त्रियांच्यात त्यांच्या या अती महत्त्वाच्या प्रश्नाबाबत जागृती घडवून आणयची. त्यातूनच 1998 सालीगुंजची स्थापना झाली.कामाला सुरुवात करण्यापूर्वी गुंज या संस्थेनं एक सर्वे केला. त्या सर्वेत त्यांना असं आढळून आलं की भारतात अजूनही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी वाळू, राख, जुन्या बॅग्ज, वर्तमानपत्र वापरतात. तर काही भागात पॉलिथीनच्या पिशव्यांचा वापर केला जातो. ही धक्कादायक माहिती काळजाचाथरकाप उडवणारी आहे. अशू गुप्तांनी काही महिलांना घेऊन घरगुती सॅनेटरी नॅपकीन बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी दिल्लीत एक कॅम्पेनकेलं आणि ते कॅम्पेन होतं जुने कपडे दान देणं. हे कॉटनचे जुने कपडे नीट व्यवस्थित कापून, स्वच्छ धुऊन त्यापासून सॅनेटरी नॅपकीन तयार केलेजातात. दर महिन्याला गुंज 20 हजार किलो जुने कपडे गोळा करते. दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, जालंदर इथे गुंजचे कलेक्शन सेंटस आहेत. दरमहिन्याला एवढे किलोनं कपडे फुकट जातात. या फुकट जाणा-या कपड्यांपासून सॅनेटरी नॅपकीन तयार करण्याची प्रोसिजर फार सोपी आहे. तरीही खेड्यापाड्यांतल्या महिलांवर अशी परिस्थिती का यावी ? हा प्रश्न चर्चेत जेव्हा अंशू गुप्तांनी उपस्थित केला तेव्हा एकदम अवाक् व्हायला होतं. तर असे हे अंशू गुप्ता सीएनएन आयबीएनच्या रिअल हिरो बहुमनाचे मानकरी ठरले आहेत. अंशू गुप्तांनी चर्चेत फक्त आपल्या कार्याविषयी सांगितलं नाही. तर त्यांना आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं. त्यावेळी लेखिका सुषमा देशपांडे याहीबचत गटाचं काम करताना स्त्रियांच्या काही समस्या त्यांना आढळून आल्या, त्या त्यांच्याशी बोलल्या ते अनुभव सांगितले.अंशू गुप्ता आणि सुषमा देशपांडे यांची चर्चा आणि अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

स्त्रियांची मासिक पाळी या विषयाला वाहिलेल्या या कार्यक्रमाचे पुढचे दोन भाग पाहण्यासाठी पुढील लिंक्सवर क्लिक करा.

जागतिक महिला दिन विशेष (भाग - 2 )

जागतिक महिला दिन विशेष (भाग - 3 )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2009 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close