S M L

हरवलेल्या मुली - भाग 3

हरवलेल्या मुली - भाग 39 हजार लोकवस्तीच्या दोडीत शितलसारख्या ब-याच मुली घरच्या बाईकवर फिरताना दिसतात. दोडीतली सर्वात जास्त शिकलेली मुलगी आज डॉक्टर झाली आहे. काहीनी एमबीए केलं आहे, काही इंजिनीअरही झाल्या आहेत. पण वरवर दिसणा-या या प्रगतीची खपली काढली तर एक भयंकर भळभळणारी जखम उघडी होते. ती म्हणजे लेकीसुनांच्या पोटी रूजलेला गर्भ मुलीचा आहे म्हणून त्याची जन्माआधीच करण्यात येणारी हत्या. तेही सरकारी रुग्णालयाच्या मदतीने.दोडी गावाचे ग्रामस्थ, पंडित केदार सांगतात, पेशंटला उपचार मिळत नाही म्हणून मी चौकशी करायला जायचो तेव्हा माहिती मिळाली की इथे इतर रोगांवर इलाज होत नाहीत तर इथे सर्वात जास्त गर्भपात केले जातात आणि गर्भपातात मुलींचं प्रमाण जास्त आहे.कायदा असूनही हे थांबत नाही हे बघून केदारांसारख्या गावक-यांनी शेवटी माहितीच्या अधिकाराखाली ग्रामीण रुग्णालयातल्या गर्भपातांची माहिती मिळवली. त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाली.2005 साली या रुग्णालयात एकूण 116 गर्भपात करण्यात आले. त्यापैकी 39 गर्भपात 12 आठवड्यांनंतरचे होते विशेष म्हणजे यासर्व महिलांना त्याआधीच्या मुली आहेत. काहींना दोन मुली, काहींना चार. इतकंच नाही तर 16 ते 20 आठवड्यांच्या जागी खाडाखोड करून त्याऐवजी 12चा आकडा केल्याचे पुरावेही. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्याची चर्चा तर खूप होते. पण त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं कठीणचं. दोडीच्या ग्रामस्थांनी नेमकं हेच केलंय. सरकार दरबारी याची दखल घेतली जात नव्हती म्हणून थेट न्यायालयात धाव घेतली.दोडी गावच्या सरपंच यशोदा शिंदे सांगतात,आम्ही खूप प्रयत्न केले.माहितीच्या अधिकारात माहिती घेतली, ग्रामसभा पण घेतल्या. ठराव पाठवले. तरी रिस्पॉन्स नाही.अधिकारी अधिका-यांचीच बाजू घेतात हे लक्षात आलंया बाबत जिल्हा परिषद सदस्य, बाळासाहेब वाघ सांगतात, लोकप्रतिनिधी म्हणून जे निदर्शनास आलं ते शासनापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. स्वत: आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. तरीही प्रत्यक्षात काही फरक पडला नाही. अर्थात शिक्षणानं, आर्थिक सुबत्तेनं जिथे स्त्री-भ्रूणहत्या थांबल्या नाहीत.तिथे दोडीच्या गावक-यांचा हा झडगा ब-याचजणांना बरंच काही सांगून जातो.2003 पासून कायदा असूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही शोकांतिका असली तरी येणा-या काळात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मानसिकता बदलता येऊ शकते. मानसिकता, दबावाखालची त्याबद्दल बाईला बोलताही येत नाही. कारण मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचा तिचा हक्कच कधी कधी समाज नाकारतो.अजूनही लोकांच्या हातात बरच काही आहे आणि ते शक्यही आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर ताबोडतोब कायद्याची अमंलबजावणीची आवश्यकता आहे. प्रत्येक आईवडिलांनी ठरवलं तर कदाचित या हरवलेल्या मुली पुढच्या जनगणनेत सापडतील.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2009 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close