S M L

विकार किडनीचे

12 मार्च हा दिवस जागतिक किडनी दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्तानं ' टॉक टाइम 'चा विषय होता - विकार किडनीचे. या विषयावर किडनीतज्ज्ञ डॉ.राजेंद्र गुंजोटीकर यांनी मार्गदर्शन केलं. मुळातच किडनी हा तसा दुर्लक्षित अवयव. शिवाय किडनी विकाराची स्वत:ची अशी काही खास लक्षणं नाहीत. त्यामुळे हे दुखणं लक्षात येण्यास वेळ लागतो. जागतिक किडनी दिनाच्या निमित्तानं डॉ. राजेंद्र गुंजोटीकरांनी किडनीचे आजार, आजारांची लक्षण, ते आजार न होण्यासाठीची उपाययोजना आणि व्यायाम या मुद्द्यांना धरून प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. डॉ गुंजोटीकर सांगतात, " साधारणत: सतत दमल्यासारखं वाटणं, भूक नसणं ही किडनीच्या विकाराची मुख्य लक्षणं आहेत. आजकाल तर डायबेटीस असलेल्यांना किडनीचे विकार होण्याचा जास्त धोका निर्माण झाला आहे. शिवाय जास्त प्रमाणात पेनकिलर औषधं घेतल्यानं किडनीचे आजार होतात. " डॉक्टरांनी किडनीचे आजार होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, तेही सांगितलं. " नियमीत आपली लघवी तपासावी आणि जास्तीत पाणी प्यावं. किडनी पेशन्टस्‌नी आपल्या आहारात बदल घडवण्याची गरज असते. आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करावं. मांसाहार वर्ज्य करावा आणि कोणत्याही आजारावरचे औषध घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रोजच्या धावपळीत आपसुकच आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष होतं. मूत्रपिंडावर प्रेशर येऊ देऊ नका ते वेळच्या वेळी रिकामं होणं जरुरी आहे, " अशी महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टरांनी दिली. किडनीतज्ज्ञ डॉ.राजेंद्र गुंजोटीकर यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओ पहा.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2009 12:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2009 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close