S M L

किचन गार्डनिंग

20 मार्चच्या टॉक टाईमचा विषय होता किचन गार्डनिंग. या विषयावर बोलण्यासाठी गार्डन एक्सपर्ट लीना लोबो आल्या होत्या.स्वयंपाकघर... घरातील सगळ्यांच्या भुकेची काळजी घेणारी महत्वाची जागा...या स्वयंपाकघरातच रोजच्या जेवणात लागणार्‍या लिंबू,मिरची, मेथी, टोमॅटो अशा भाज्या पिकवता आल्या तर...आणि म्हणूनच आज 'टॉक टाईम' मध्ये किचन गार्डनिंग कसं करावं यावर गार्डन एक्स्पर्ट लीना लोबो यांनी मार्गदर्शनपर शॉर्ट आणि क्रिएटिव टिप्स शेअर केल्या. किचन गार्डनिंगसाठी प्रशस्त जागेची अजिबात गरज नाही. आपण अगदी किचनच्या खिडकीत, ग्रिलमध्येही मिरची, लिंबू, पाती चहा, मेथी, अळू, छोटे चेरी टॉमेटो शिवाय ओवा, पुदीना ही औषधी झाड लावू शकतो. या झाडांना फारशी देखभाल लागत नाही. 2-3 तास ऊन आणि दिवसातून एकदा पाणी घातल्यास फारच कमी काळात आपल्याला या भाज्या पिकवता येतात.पैशाची बचत होते आणि आपण काहीतरी निर्माण केल्याचाही आनंद मिळतो. पण किचन गार्डनिंगचे कोर्स आज उपलब्ध नाहीत, मात्र हा उपक्रम राबवण्यासाठी या भाज्यांची बी-बीयाणं वाशी आणि भायखळा मार्केटमध्ये मिळतात अशी माहिती त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2009 02:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2009 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close