S M L

वेड भविष्याचं

आजच्या टॉक टाईमचा विषय होता वेड भविष्याचं...माझं लग्न वयाच्या कितव्या वर्षी होणार,मला किती पगाराची नोकरी मिळणार...अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अनेक जण जोतिष्याकडे धाव घेत असतात. या वृत्तीमागची नेमकी मानसिकता ओळखण्यासाठी आज टॉक टाईम मध्ये वेड भविष्याचं या विषयावर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ अरुण नाईक आले होते. प्रत्येक माणसाला भविष्यात आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांबद्दल उत्सुकता असते,त्यामुळे त्याला अंदाज बांधण्याची सवय असते आणि घडणार्‍या गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात अशी अपेक्षाही असते.माणूस ज्योतिष्याकडे वळण्यचे मुख्य कारण हे की त्याला एका प्रकारचा दिलासा हवा असतो.आपल्या आयुष्यात येणार्‍या समस्यांवर जेव्हा माणसाला उपाय शोधता येत नाही तेव्हा तो त्याचा दोष नशिबाला देतो. माणसाने अडचणींकडे एक रिअलिस्टिक अप्रोच ठेवला, परिस्थितीचा आढावा घेतला, परिस्थितीचा नीट अभ्यास केला, तर त्याला अडचणी सोडवता येतील. देवाचे नाव, स्तोत्र वगैरे म्हणून फक्त मन शांत होते पण अडचण सुटत नाही.कोणतीही अडचण उभी राहिली तर ती सोडवण्यासाठी त्या संबंधीत तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. एखाद्या व्यक्तीला जर शारीरिक किंवा मानसिक आजार असेल तर त्यावर उपाय करणं ज्योतिषाला शक्य नाही. अशा व्यक्तीला डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2009 01:40 PM IST

वेड भविष्याचं

आजच्या टॉक टाईमचा विषय होता वेड भविष्याचं...माझं लग्न वयाच्या कितव्या वर्षी होणार,मला किती पगाराची नोकरी मिळणार...अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अनेक जण जोतिष्याकडे धाव घेत असतात. या वृत्तीमागची नेमकी मानसिकता ओळखण्यासाठी आज टॉक टाईम मध्ये वेड भविष्याचं या विषयावर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ अरुण नाईक आले होते. प्रत्येक माणसाला भविष्यात आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांबद्दल उत्सुकता असते,त्यामुळे त्याला अंदाज बांधण्याची सवय असते आणि घडणार्‍या गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात अशी अपेक्षाही असते.माणूस ज्योतिष्याकडे वळण्यचे मुख्य कारण हे की त्याला एका प्रकारचा दिलासा हवा असतो.आपल्या आयुष्यात येणार्‍या समस्यांवर जेव्हा माणसाला उपाय शोधता येत नाही तेव्हा तो त्याचा दोष नशिबाला देतो.

माणसाने अडचणींकडे एक रिअलिस्टिक अप्रोच ठेवला, परिस्थितीचा आढावा घेतला, परिस्थितीचा नीट अभ्यास केला, तर त्याला अडचणी सोडवता येतील. देवाचे नाव, स्तोत्र वगैरे म्हणून फक्त मन शांत होते पण अडचण सुटत नाही.

कोणतीही अडचण उभी राहिली तर ती सोडवण्यासाठी त्या संबंधीत तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. एखाद्या व्यक्तीला जर शारीरिक किंवा मानसिक आजार असेल तर त्यावर उपाय करणं ज्योतिषाला शक्य नाही. अशा व्यक्तीला डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2009 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close