S M L

आवाज कुणाचा - भाग 1

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, राजकी पक्ष आणि मतदार यांच्यामधे थेट संवाद घडवून आणण्यासाठी हा निवडणूक स्पेशल खास कार्यक्रम 'आवाज कुणाचा?'... महाराष्ट्राच्या लोकमानसाचं स्पष्ट चित्र समोर आणण्याच्या दृष्टीने- राजकीय पक्षाचे नेते आणि जनतेसह चर्चा करण्यासाठी या पहिल्या भागात प्रमुख पाहुणे होते : नारायण राणे - उद्योग मंत्री, गोविंदराव आदिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचटणीस आणि ज्यांच्यावर लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी आहे, गजानन किर्तीकर - शिवसेना नेते आणि लोकसभेचे नवीन उमोदवार, शिशिर शिंदे- महाराष्ट्र नविनर्माण सेना नेते, प्रताप होगडे - तिसर्‍या आघाडीचे नेते, गोपीनाथ मुंडे - भाजप नेते या चर्चेत तुमच्या पक्षाला लोकांनी का मतं द्यावीत? या थेट प्रश्नाने सुरूवात झाली. त्यानंतर कोणत्या पक्षाचं सरकार पंतप्रधानपदासाठी लायक आहे या मुद्द्याला हात घालण्यात आला. अवघ्या जगाला वेठीस धरलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाला प्रामुख्याने वाचा फोडण्यात आली. त्यात यूपीए एनडीए सरकारपेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पाऊलं उचलून दहशतवादाला समूळ नष्ट कसं करता येईल याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षेबरोबरच देशाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावर सर्वपक्षीय भावी योजना आणि त्यांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या. यामधे पायाभूत सेवासुविधा, राजकीय रोजगार हमी योजना, अन्नधान्य पुरवठा, शेतकरी कर्जमाफी योजना या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. चर्चेचा शेवट जनतेच्या प्रश्नांनी आणि स्वाभाविक शंकाचं निरसन करून झाला. - लोकसभा निवडणूक फक्त मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून करण्यात येणार की अमराठी माणसांची मतंही दिल्लीपर्यंत पोहचून त्यांना न्याय मिळेल अशी विचारणा यावेळी करण्यात आली. - अन्नुरवठा, सुरक्षेचा मुद्दा यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांना उत्तर देण्यास जनतेने भाग पाडलं. - भ्रष्टाचार मुक्तीबद्दल सर्वपक्षीय नेत्यांच्या धोरण काय असावं असा खडा सवाल करण्यात आला. - महाराष्ट्रात ग्रामीण भागात ऐरणीवर असलेल्या लोड शेडिंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आग्रह धरण्यात आला. यावर नारायण राणे यांनी हमखास उपाययोजनांची हमी देऊन जनतेला सकारात्मक प्रतिसाद दिला. 30 एप्रिल हा महाराष्ट्रात मतदान करण्याचा शेवटचा दिवस तर 15 मे रोजी मतमोजणी होणार असल्याचं सांगून या निवडणुकीच्या काळात मतदारच राजा आहे हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात आलं. तोपर्यंत या कार्यक्रमात बिनधास्त प्रश्न विचारा त्याची उत्तरं राजकीय नेते देतील असं जनतेला आश्‍वासन देऊ न या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2009 12:07 PM IST

आवाज कुणाचा - भाग 1

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, राजकी पक्ष आणि मतदार यांच्यामधे थेट संवाद घडवून आणण्यासाठी हा निवडणूक स्पेशल खास कार्यक्रम 'आवाज कुणाचा?'... महाराष्ट्राच्या लोकमानसाचं स्पष्ट चित्र समोर आणण्याच्या दृष्टीने- राजकीय पक्षाचे नेते आणि जनतेसह चर्चा करण्यासाठी या पहिल्या भागात प्रमुख पाहुणे होते : नारायण राणे - उद्योग मंत्री, गोविंदराव आदिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचटणीस आणि ज्यांच्यावर लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी आहे, गजानन किर्तीकर - शिवसेना नेते आणि लोकसभेचे नवीन उमोदवार, शिशिर शिंदे- महाराष्ट्र नविनर्माण सेना नेते, प्रताप होगडे - तिसर्‍या आघाडीचे नेते, गोपीनाथ मुंडे - भाजप नेते

या चर्चेत तुमच्या पक्षाला लोकांनी का मतं द्यावीत? या थेट प्रश्नाने सुरूवात झाली. त्यानंतर कोणत्या पक्षाचं सरकार पंतप्रधानपदासाठी लायक आहे या मुद्द्याला हात घालण्यात आला. अवघ्या जगाला वेठीस धरलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाला प्रामुख्याने वाचा फोडण्यात आली. त्यात यूपीए एनडीए सरकारपेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पाऊलं उचलून दहशतवादाला समूळ नष्ट कसं करता येईल याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षेबरोबरच देशाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावर सर्वपक्षीय भावी योजना आणि त्यांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या. यामधे पायाभूत सेवासुविधा, राजकीय रोजगार हमी योजना, अन्नधान्य पुरवठा, शेतकरी कर्जमाफी योजना या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

चर्चेचा शेवट जनतेच्या प्रश्नांनी आणि स्वाभाविक शंकाचं निरसन करून झाला. - लोकसभा निवडणूक फक्त मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून करण्यात येणार की अमराठी माणसांची मतंही दिल्लीपर्यंत पोहचून त्यांना न्याय मिळेल अशी विचारणा यावेळी करण्यात आली. - अन्नुरवठा, सुरक्षेचा मुद्दा यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांना उत्तर देण्यास जनतेने भाग पाडलं. - भ्रष्टाचार मुक्तीबद्दल सर्वपक्षीय नेत्यांच्या धोरण काय असावं असा खडा सवाल करण्यात आला. - महाराष्ट्रात ग्रामीण भागात ऐरणीवर असलेल्या लोड शेडिंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आग्रह धरण्यात आला. यावर नारायण राणे यांनी हमखास उपाययोजनांची हमी देऊन जनतेला सकारात्मक प्रतिसाद दिला.

30 एप्रिल हा महाराष्ट्रात मतदान करण्याचा शेवटचा दिवस तर 15 मे रोजी मतमोजणी होणार असल्याचं सांगून या निवडणुकीच्या काळात मतदारच राजा आहे हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात आलं. तोपर्यंत या कार्यक्रमात बिनधास्त प्रश्न विचारा त्याची उत्तरं राजकीय नेते देतील असं जनतेला आश्‍वासन देऊ न या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2009 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close