S M L

क्रिकेटर व्हायचंय

क्रिकेट या खेळावर सगळ्यांचंच प्रेम आहे...अख्या जगाला क्रिकेटचं वेड लावणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिनचा आज वाढदिवस...त्यानिमित्ताने आज टॉकटाईमचा विषय होता क्रिकेटर व्हायचंय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते सिनिअर क्रिकेट कोच नरेश चुरी...आजकाल प्रत्येक मुलाला किंबहुना प्रत्येक पालकांना आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावा असं वाटतं...पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सचिनसारखी 12-13 तास मेहनत ,बेसिक स्ट्रक्चर मजबूत करणं, आपल्या चुका सुधारुन त्यातून शिकत जाणं हे सर्व करण्याची आपली तयारी आहे का? की टीव्हीवर दिसणारं क्रिकेट, क्रिकेटर्सला मिळणारं ग्लॅमर या सगळ्याला भुलून आपण मुलं क्रिकेटिअर व्हावं असं आपल्याला वाटतं याचा निर्णय घेणं खूप आवश्यक आहे असं कोच नरेश चुरी म्हणाले. सेहवाग, धोणी यांच्या खेळाचं अनुकरण करण्यापेक्षा स्वत:चा खेळ विकसित करणं जास्त महत्त्वाचं आहे. मेहनतीबरोबरीनचं आपलं डाएटदेखील आपल्या खेळाला पूरक असलं पाहिजे. जंक फूड न खाता स्टॅमिना वाढवणारा पौष्टिक आहार घेतला पाहिजे. साधारणपणे वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासून क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात करता येते. पण अभ्यासाकडे लक्ष देणंही तितकच महत्त्वाचं आहे कारण क्रिकेट तुम्हाला आयुष्यभर पुरु शकत नाही असं नरेश चुरी यांनी आवर्जून सांगितलं. चांगला कोच मिळणंही तुमच्या करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करा आणि आपल्या कोचचा आदर राखा, असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2009 03:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2009 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close