S M L

रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग कसं करावं ?

24 एप्रिल श्रीमंत व्हा या अर्थविषयक कार्यक्रमात रिटायरमेंटसाठी 'प्लॅनिंग कसं करावं' हा विषयावर चर्चा करण्यात आली. हे प्लॅनिंग हल्लीच्या काळात कसं करावं हे तज्ज्ञ आणि फायनान्शिअल प्लॅनर नितिन वेटे यांनी स्पष्ट करुन सांगितलं. निवृत्त जीवनासाठी सेव्हिंग तसंच गुंतवणूक करणं जरुरी आहे पण त्याचप्रमाणे हे सर्व करताना फायनान्शिअल गोलदेखील सेट करणं जरुरी असल्याचं त्यांनी सांगितलं. दरमहा आणि लाँगटर्म गुंतवणूक करणंही फायद्याचं आहे हेही त्यांनी नमूद केलं. पण त्याचवेळी मार्केटमधल्या तेजी-मंदीचे आणि महागाई दराचेही परिणाम आपल्या रिटायरमेंटच्या प्लॅनिंगवर होत असतात ही सूचनाही त्यांनी दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे हे प्लॅनिंग फार आधीपासूनच म्हणजे पंचवीस-तीस वर्षांपासून करायला सुरूवात केली पाहिजे असही ते म्हणाले. मार्केटमधल्या पेंशन प्लॅन्सबाबत बोलताना नितिन यांनी सांगितलं की असे प्लॅन्स घेणं ठीक असू शकेल पण त्यातही आपल्या गरजा ओळखूनच असे कोणतेही प्रॉडक्ट घेतले पाहिजेत. तसंच मार्केटमधील प्लॅन्सचे रिटर्न्सदेखील महत्वाचे ठरतात असंही नितिन यांनी सांगितलं. तेव्हा रिटायरमेंटसाठी कुठेही गुंतवणूक करताना समतोल महत्वाचा आणि सेव्हिंगचं प्रमाण एकूण उत्पन्नाच्या दहा ते वीस टक्के असावं यावर त्यांनी भर दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2009 03:25 PM IST

रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग कसं करावं ?

24 एप्रिल

श्रीमंत व्हा या अर्थविषयक कार्यक्रमात रिटायरमेंटसाठी 'प्लॅनिंग कसं करावं' हा विषयावर चर्चा करण्यात आली. हे प्लॅनिंग हल्लीच्या काळात कसं करावं हे तज्ज्ञ आणि फायनान्शिअल प्लॅनर नितिन वेटे यांनी स्पष्ट करुन सांगितलं.

निवृत्त जीवनासाठी सेव्हिंग तसंच गुंतवणूक करणं जरुरी आहे पण त्याचप्रमाणे हे सर्व करताना फायनान्शिअल गोलदेखील सेट करणं जरुरी असल्याचं त्यांनी सांगितलं. दरमहा आणि लाँगटर्म गुंतवणूक करणंही फायद्याचं आहे हेही त्यांनी नमूद केलं. पण त्याचवेळी मार्केटमधल्या तेजी-मंदीचे आणि महागाई दराचेही परिणाम आपल्या रिटायरमेंटच्या प्लॅनिंगवर होत असतात ही सूचनाही त्यांनी दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे हे प्लॅनिंग फार आधीपासूनच म्हणजे पंचवीस-तीस वर्षांपासून करायला सुरूवात केली पाहिजे असही ते म्हणाले.

मार्केटमधल्या पेंशन प्लॅन्सबाबत बोलताना नितिन यांनी सांगितलं की असे प्लॅन्स घेणं ठीक असू शकेल पण त्यातही आपल्या गरजा ओळखूनच असे कोणतेही प्रॉडक्ट घेतले पाहिजेत. तसंच मार्केटमधील प्लॅन्सचे रिटर्न्सदेखील महत्वाचे ठरतात असंही नितिन यांनी सांगितलं. तेव्हा रिटायरमेंटसाठी कुठेही गुंतवणूक करताना समतोल महत्वाचा आणि सेव्हिंगचं प्रमाण एकूण उत्पन्नाच्या दहा ते वीस टक्के असावं यावर त्यांनी भर दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2009 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close