S M L

हेअर कलर करताना

8 मेच्या टॉक टाईमचा विषय होता, हेअर कलर करताना. त्याविषयावर ब्युटिशियन रुक्मिणी होनावर यांनी मार्गदर्शन केलं. हायलाईट करण्याची फॅशन मुलं आणि मुली दोघांमध्येही सारखीच आहे. बाजारात अनेक कंपन्यांची अनेक प्रॉडक्ट्स आहेत. पण त्यातून योग्य प्रॉडक्ट कोणतं निवडायचं, हेअर कलरिंग करताना रंग कसा वापरायचा, हेअर कलरिंगबद्दलचे समज, गैरसमज या सगळ्या शंकांची उत्तरं हेअर कलर करताना या 'टॉक टाईम'मधून रुक्मिणी होनावर यांनी मार्गदर्शन केलं. केसांना कलर करणं हे केसांच्या टेक्श्चर आणि रंगावर अवलंबून असतं. सावळी कांती असलेल्यांना लाईट कलर चांगला दिसतो. चेहर्‍याची ठेवण, केसांच्या सवयी आणि तुमची आवड या सगळ्यावर कोणता रंग लावायचा हे अवलंबून असतं. मात्र यासाठी योग्य तज्ज्ञाकडे जाऊन करणं अतिशय गरजेचं आहे, असं रुक्मिणी होनावर म्हणाल्या. एकदा हेअर कलरिंग केल्यावर केसांची जास्त काळजी घेणं जरुरी आहे. आपल्या केसांना सूट होणारा कंडिशनर वापरावा, कधी कधी केसांच्या मुळाशी जी त्वचा असते तिला त्रास होऊ शकतो, पण यावरही योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानं उपचार उपलब्ध आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी, फॅशन म्हणून तसंच आपल्या व्यक्तिमत्त्वातील बदलासाठी हेअर कलरिंग एक चांगला पर्याय होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2009 01:09 PM IST

हेअर कलर करताना

8 मेच्या टॉक टाईमचा विषय होता, हेअर कलर करताना. त्याविषयावर ब्युटिशियन रुक्मिणी होनावर यांनी मार्गदर्शन केलं.

हायलाईट करण्याची फॅशन मुलं आणि मुली दोघांमध्येही सारखीच आहे. बाजारात अनेक कंपन्यांची अनेक प्रॉडक्ट्स आहेत. पण त्यातून योग्य प्रॉडक्ट कोणतं निवडायचं, हेअर कलरिंग करताना रंग कसा वापरायचा, हेअर कलरिंगबद्दलचे समज, गैरसमज या सगळ्या शंकांची उत्तरं हेअर कलर करताना या 'टॉक टाईम'मधून रुक्मिणी होनावर यांनी मार्गदर्शन केलं.

केसांना कलर करणं हे केसांच्या टेक्श्चर आणि रंगावर अवलंबून असतं. सावळी कांती असलेल्यांना लाईट कलर चांगला दिसतो. चेहर्‍याची ठेवण, केसांच्या सवयी आणि तुमची आवड या सगळ्यावर कोणता रंग लावायचा हे अवलंबून असतं. मात्र यासाठी योग्य तज्ज्ञाकडे जाऊन करणं अतिशय गरजेचं आहे, असं रुक्मिणी होनावर म्हणाल्या. एकदा हेअर कलरिंग केल्यावर केसांची जास्त काळजी घेणं जरुरी आहे. आपल्या केसांना सूट होणारा कंडिशनर वापरावा, कधी कधी केसांच्या मुळाशी जी त्वचा असते तिला त्रास होऊ शकतो, पण यावरही योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानं उपचार उपलब्ध आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी, फॅशन म्हणून तसंच आपल्या व्यक्तिमत्त्वातील बदलासाठी हेअर कलरिंग एक चांगला पर्याय होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close