S M L

वजन उतरवताना

11 मेच्या टॉक टाईमचा विषय होता वजन उतरवताना. याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. नेहा पाटणकर यांनी मार्गदर्शन केलं. समोर पाणी पुरी दिसली की ती खाविशी वाटते आणि वजन कमी करायचा प्लान एक दिवस पुढे ढकलला जातो. तरीही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वजन कमी करायचा प्रयत्न करत असतो. पण वजन कमी करण्याची योग्य पध्दत काय याबद्दललचं मार्गदर्शन वजन उतरवताना... या टॉक टाईममधून डॉ. नेहा पाटणकर यांनी केलं. वजन कमी करायचं म्हटल्यावर ते कती आणि कसं कमी करायचं याला एक प्रमाण असतं. जर 60 किलो वजन असेल तर 10% म्हणजे 6 किलो कमी करणं किंवा वजन एकदम कमी न करता हळुहळू कमी करणं आणि योग्य प्रमाणात हे सगळं माहीत असणं गरजेचं असतं. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ली घेणं आवश्यक आहे, असं डॉ. पाटणकर म्हणाल्या. लोकांचा असा गैरसमज असतो की, दिवसातून एक वेळ जेवलं नाही की वजन कमी होतं पण डॉक्टरांच्या मते जर प्रोटिन्स, कर्बोदकं, व्हिटॅमीन्सचा आहरात योग्य वापर केला तर वजन कमी व्हायला मदत होते. वजन कमी करायला सोप्पा उपाय असतो तो जीमला जाणं. पण जीमबरोबर योग्य आहार आणि गरजेनुसार औषधं घेणं आवश्यक आहेत. अन्यथा त्रास होऊ शकतो. जरुरीपेक्षा जास्त चरबी कमी झाली तर यकृत, स्वादुपिंडांचे विकार आणि डायबेटिसही होऊ शकतो. त्यामुळे योग्य आहार आणि सात्यत्यानं व्यायाम केला तर वजन आटोक्यात ठेवणं कठीण नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2009 05:28 PM IST

वजन उतरवताना

11 मेच्या टॉक टाईमचा विषय होता वजन उतरवताना. याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. नेहा पाटणकर यांनी मार्गदर्शन केलं.

समोर पाणी पुरी दिसली की ती खाविशी वाटते आणि वजन कमी करायचा प्लान एक दिवस पुढे ढकलला जातो. तरीही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वजन कमी करायचा प्रयत्न करत असतो. पण वजन कमी करण्याची योग्य पध्दत काय याबद्दललचं मार्गदर्शन वजन उतरवताना... या टॉक टाईममधून डॉ. नेहा पाटणकर यांनी केलं.

वजन कमी करायचं म्हटल्यावर ते कती आणि कसं कमी करायचं याला एक प्रमाण असतं. जर 60 किलो वजन असेल तर 10% म्हणजे 6 किलो कमी करणं किंवा वजन एकदम कमी न करता हळुहळू कमी करणं आणि योग्य प्रमाणात हे सगळं माहीत असणं गरजेचं असतं. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ली घेणं आवश्यक आहे, असं डॉ. पाटणकर म्हणाल्या. लोकांचा असा गैरसमज असतो की, दिवसातून एक वेळ जेवलं नाही की वजन कमी होतं पण डॉक्टरांच्या मते जर प्रोटिन्स, कर्बोदकं, व्हिटॅमीन्सचा आहरात योग्य वापर केला तर वजन कमी व्हायला मदत होते. वजन कमी करायला सोप्पा उपाय असतो तो जीमला जाणं. पण जीमबरोबर योग्य आहार आणि गरजेनुसार औषधं घेणं आवश्यक आहेत. अन्यथा त्रास होऊ शकतो. जरुरीपेक्षा जास्त चरबी कमी झाली तर यकृत, स्वादुपिंडांचे विकार आणि डायबेटिसही होऊ शकतो. त्यामुळे योग्य आहार आणि सात्यत्यानं व्यायाम केला तर वजन आटोक्यात ठेवणं कठीण नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2009 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close