S M L

इंटरनेट बँकिंग

15 मेच्या टॉक टाईमचा विषय होता, इंटरनेट बॅकिंग. या विषयावर आयप्लेक्सचे टेक्नॉलॉजी हेड अतुल कहाते यांनी मार्गदर्शन केलं. घरबसल्या बँकेचे सगळे व्यवहार करता येतील अशा इंटरनेट बॅकिंगच्या सोयीसुवीधांविषयी अतुल कहाते बोलले. इंटरनेट बँकिंगमध्ये प्रत्यक्ष बँकेचं स्वरूप, बँक कशी चालते, त्यातील व्यवहार, यात काहीही फरक नसतो. याचे फायदे ग्राहक आणि बँका, या दोघांनाही होतात. इंटरनेट बँकिंग ही अत्यंत सोइस्कर आणि स्वस्त आहे. सगळे व्यवहार हे कागदोपत्री नसून, इंटरनेटवरून होत असल्याने, यात सुरक्षिततेचा प्रश्न जास्त येतो. सायबर कॅफे, एअरपोर्ट वरून इंटरनेट बँकिंग करू नये. अतिशय अद्ययावत अशा ऍन्टी व्हायरस सॉफ्टवेअरचा वापर इंटरनेट बँकिंगसाठी करावा, असं अतुल कहाते यांनी सांगितलं. व्यवस्थित, काळजीपूर्वकरित्या जर वापर केला तर इंटरनेट बँकिंग हे एक अतिशय सुरक्षित असं साधन आहे. गावकुसांत ही सुवीधा अजून नीट पोहचली नसली तरी, हळुहळु तिथली लोकं खर्च करायची तयारी दाखवत आहेत आणि म्हणुनच तिथे ही सुवीधा पोचायला वेळ नाही लागणार.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2009 11:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2009 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close