S M L

पिंपल्स आणि आयुर्वेद

18 मेच्या आजच्या सवालचा प्रश्न होता पिंपल्स आणि आयुर्वेद. या विषयावर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे यांनी मार्गदर्शन केलं. चेहर्‍यावरचे पिंपल्स हे सगळ्याच वयात त्रासदायक असतात. या पिंपल्समुळे सौंदर्याबरोबरच आत्मविश्‍वासही कमी होतो. 'टॉक टाईम'मध्ये पिंपल्स आणि आयुर्वेद या विषयावर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे बोलल्या. पिंपल्स नेहमी त्वचेच्या वरच्या थरावर येतात. आधी पुरळ येते. मग इन्फेक्शन होतं आणि मग पिंपल्स दिसायला लागतात. जर पहिल्या टप्यातच उपचार केले तर पिंपल्स थांबू शकतात. पिंपल्स येण्याचं कारण म्हणजे प्रदूषण, ताण, अस्वच्छ पोट आणि केसातील कोंडा. तेलकट आणि अवेळी खाणं हे देखील पिंपल्सचं एक प्रमुख कारण आहे, अशी माहिती आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे यांनी दिली. साधारणत: चेहरा दिवसातून 5-6 वेळा धुणं गरजेचं आहे, असा सल्ला डॉ. अर्चना जानुगडे यांनी दिला. पिंपल्सवर उपचार म्हणून आयुर्वेदात वाळा पावडर, चंदन, कडुलिंब, तुळस या वनस्पतींचा अर्क वापरून अनेक तेलं, फेस पॅक तयार केलेले आहेत. शिवाय आपल्या घरात हळद, चंदन, मसूर डाळ अशा अनेक औषधी वनस्पती असतात. वाळा पावडर हे ब्लॅक हेड्सवर उत्तम उपाय आहे. मात्र या सगळ्या उपायांखेरीज जर आपला आहार हा पालेभाज्या, कडधान्य यांचं प्रमाण जर योग्य असेल तर पिंपल्सचा त्रास कमी होऊ शकतो, अशा प्रकारचं मार्गदर्शन डॉ. अर्चना जानुगडे यांनी केलं. घरगुती फेस पॅक -जायफळ पाण्यात उगाळून लावल्यास पिंपल्स 2-3 दिवसात जातात.काळवंडलेल्या त्वचेसाठी लिंबाचा रस, हळद आणि थोडा मध चेहर्‍याला लावावा. वाळल्यावर धुऊन टाकावा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2009 11:59 AM IST

18 मेच्या आजच्या सवालचा प्रश्न होता पिंपल्स आणि आयुर्वेद. या विषयावर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे यांनी मार्गदर्शन केलं. चेहर्‍यावरचे पिंपल्स हे सगळ्याच वयात त्रासदायक असतात. या पिंपल्समुळे सौंदर्याबरोबरच आत्मविश्‍वासही कमी होतो. 'टॉक टाईम'मध्ये पिंपल्स आणि आयुर्वेद या विषयावर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे बोलल्या. पिंपल्स नेहमी त्वचेच्या वरच्या थरावर येतात. आधी पुरळ येते. मग इन्फेक्शन होतं आणि मग पिंपल्स दिसायला लागतात. जर पहिल्या टप्यातच उपचार केले तर पिंपल्स थांबू शकतात. पिंपल्स येण्याचं कारण म्हणजे प्रदूषण, ताण, अस्वच्छ पोट आणि केसातील कोंडा. तेलकट आणि अवेळी खाणं हे देखील पिंपल्सचं एक प्रमुख कारण आहे, अशी माहिती आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे यांनी दिली. साधारणत: चेहरा दिवसातून 5-6 वेळा धुणं गरजेचं आहे, असा सल्ला डॉ. अर्चना जानुगडे यांनी दिला. पिंपल्सवर उपचार म्हणून आयुर्वेदात वाळा पावडर, चंदन, कडुलिंब, तुळस या वनस्पतींचा अर्क वापरून अनेक तेलं, फेस पॅक तयार केलेले आहेत. शिवाय आपल्या घरात हळद, चंदन, मसूर डाळ अशा अनेक औषधी वनस्पती असतात. वाळा पावडर हे ब्लॅक हेड्सवर उत्तम उपाय आहे. मात्र या सगळ्या उपायांखेरीज जर आपला आहार हा पालेभाज्या, कडधान्य यांचं प्रमाण जर योग्य असेल तर पिंपल्सचा त्रास कमी होऊ शकतो, अशा प्रकारचं मार्गदर्शन डॉ. अर्चना जानुगडे यांनी केलं. घरगुती फेस पॅक -

जायफळ पाण्यात उगाळून लावल्यास पिंपल्स 2-3 दिवसात जातात.काळवंडलेल्या त्वचेसाठी लिंबाचा रस, हळद आणि थोडा मध चेहर्‍याला लावावा. वाळल्यावर धुऊन टाकावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close