S M L

वंध्यत्वावर मात

21 मेच्या टॉक टाईमचा विषय होता वंध्यत्वावर मात. याविषयावर पुरूष वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी मार्गदर्शन केलं.धावपळीचं आयुष्य आणि करिअरमागे धावताना अनेकदा उशिरा लग्न होतात. त्यामुळे विवाहीत जोडप्यांमध्ये विशेषतः पुरुषांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या दिसून येतात. आधुनिक वैद्यकीय उपाचारांनी या वंध्यत्वावर मात करता येतं. हेच ' वंध्यत्वावर मात ' या 'टॉक टाईम'मधून पुरुष वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी सांगितलं. लग्नानंतर 2 वर्षात मुलं झालं नाही तर त्या जोडप्यामध्ये वंध्यत्वाची समस्या आसते. साधारणत: 50 टक्के जोडप्यांना पहिल्या 6 महिन्यात, 70 टक्के जोडप्यांना पहिल्या वर्षाअखेर तर 85 टक्के जोडप्यांना दुर-या वर्षाअखेर बाळ होणार असल्याची बातमी समजते. उरलेल्या 15 टक्के जोडप्यांना वैद्यकीय मदतीची गरज लागते. पुरुष वंध्यत्वाचं मुख्य कारण म्हणजे उशिरा लग्न होणं, सतत बैठं काम, बदलती जीवनशैली, अतिधूम्रपान, जंतूसंसर्ग तंबाखू तसंच गुटखा यांचं अतिसेवन, गुणसूत्रांंमधील अनुवांशिक दोष ही कारणं आहेत. पुरुष वंध्यत्वाचं निदान करताना शुक्रजंतूंची हालचाल आणि संख्या पाहतात त्याची संख्या ही 20 लाख प्रती मिलीलीटर असणं आवश्यक आहे. पुरुष वंध्यत्वावर मात करण्यासाठी आयुआय - इन्ट्रा युटराईन इन्सेमिनेशन , आयव्हीएफ म्हणजेच टेस्ट ट्युब बेबी, आणि आयसीएसआय - इन्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन या उपचार पद्धतीची मदत होते. दान केलेलं पुरूषबीज घेवूनही यावर मात करता येते. वंध्यत्व टाळण्यासाठी तंबाखू तसंच गुटखा यांचं सेवन न करणं, धूम्रपान टाळणं गरजेचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2009 05:58 PM IST

21 मेच्या टॉक टाईमचा विषय होता वंध्यत्वावर मात. याविषयावर पुरूष वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी मार्गदर्शन केलं.

धावपळीचं आयुष्य आणि करिअरमागे धावताना अनेकदा उशिरा लग्न होतात. त्यामुळे विवाहीत जोडप्यांमध्ये विशेषतः पुरुषांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या दिसून येतात. आधुनिक वैद्यकीय उपाचारांनी या वंध्यत्वावर मात करता येतं. हेच ' वंध्यत्वावर मात ' या 'टॉक टाईम'मधून पुरुष वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी सांगितलं.

लग्नानंतर 2 वर्षात मुलं झालं नाही तर त्या जोडप्यामध्ये वंध्यत्वाची समस्या आसते. साधारणत: 50 टक्के जोडप्यांना पहिल्या 6 महिन्यात, 70 टक्के जोडप्यांना पहिल्या वर्षाअखेर तर 85 टक्के जोडप्यांना दुर-या वर्षाअखेर बाळ होणार असल्याची बातमी समजते. उरलेल्या 15 टक्के जोडप्यांना वैद्यकीय मदतीची गरज लागते. पुरुष वंध्यत्वाचं मुख्य कारण म्हणजे उशिरा लग्न होणं, सतत बैठं काम, बदलती जीवनशैली, अतिधूम्रपान, जंतूसंसर्ग तंबाखू तसंच गुटखा यांचं अतिसेवन, गुणसूत्रांंमधील अनुवांशिक दोष ही कारणं आहेत. पुरुष वंध्यत्वाचं निदान करताना शुक्रजंतूंची हालचाल आणि संख्या पाहतात त्याची संख्या ही 20 लाख प्रती मिलीलीटर असणं आवश्यक आहे. पुरुष वंध्यत्वावर मात करण्यासाठी आयुआय - इन्ट्रा युटराईन इन्सेमिनेशन , आयव्हीएफ म्हणजेच टेस्ट ट्युब बेबी, आणि आयसीएसआय - इन्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन या उपचार पद्धतीची मदत होते. दान केलेलं पुरूषबीज घेवूनही यावर मात करता येते. वंध्यत्व टाळण्यासाठी तंबाखू तसंच गुटखा यांचं सेवन न करणं, धूम्रपान टाळणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2009 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close