S M L

हेल्दी ब्रेकफास्ट

23 मेच्या टॉक टाईमचा विषय होता हेल्दी ब्रेकफास्ट. त्याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. लीना राजे यांनी मार्गदर्शन केलं. आपण सकाळी उठल्यावर नाश्ता करतो म्हणजे रात्रीच्या मोठ्या गॅपनंतर खातो. एवढ्या मोठ्या गॅपनंतर खाणं म्हणजे एकप्रकारे उपवासानंतर खाल्यासारखंच आहे. उपवासानंतर खाताना नेहमी पौष्टिक खाद्यपदार्थ पोटात गेले पाहिजे. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो, हे आहारतज्ज्ञ डॉ. लीन राजे यांनी ' हेल्दी ब्रेकफास्ट ' या टॉक टाईमधून सांगितलं. नेहमी सकाळी खाताना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करावी लागते. जर साखरेची मात्रा नियंत्रित ठेवली तर दिवसभरच्या कामासाठी लागणारी उर्जा आपल्याला मिळते. उर्जा नियंत्रित करण्यासाठी तशाप्रकारचे पदार्थ ब्रेकफास्टमधून खाल्ले गेले पाहिजेत, अशीही माहिती आहारतज्ज्ञ डॉ. लीना राजे यांनी दिली. नाश्त्याची वेळ ही सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान असावी. दिवसभरात शरीराला लागणार्‍या सर्व पोषक तत्त्वांपैकी 1/3, 1/4 गरज नाश्ता पूर्ण करतो. त्यासाठी नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेटस्, प्रथिनं, क्षार, व्हिटामिन्स या महत्त्वांच्या घटकांचा समावेश असायला हवा, असंही लीना राजे म्हणाल्या. आदर्श ब्रेकफास्ट कोणता ?1. दूध - सर्व वयोगटांसाठी उपयुक्त.2. अंड्याचा समावेश असावा.3. धान्याचे प्रकार असावेत.4. धान्य आणि डाळींचाही समावेश करा.5. फळांचा समावेश करावा. ब्रेकफास्टमध्ये कोणते पदार्थ खावेत ? इडली, डोसा.थालीपीठ.डाळीचं पीठ वापरून केलेले पराठे.चीज सँडविच.पनीर पराठे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2009 03:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2009 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close