S M L

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार

11 नोव्हेंबरमहाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही निवडक मंत्र्यांचा शपथविधी आज संध्याकाळी पार पडणार आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. बुधवारी रात्री उशीरा आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी 170 आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले. संध्याकाळी होणार्‍या शपथविधी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत दिली. तसेच या 10 जणांमध्ये मावळते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज सकाळी अजित पवार, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. मधुकर पिचड हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे दहा नेते शपथ घेतील असे ठरवण्यात आले आहे. राष्ट्रवादीची यादी1) अजित पवार2) छगन भुजबळ3) आर.आर. पाटील4) जयंत पाटील5) सुनिल तटकरे6) गणेश नाईक7) लक्ष्मण ढोबळे8) मनोहर नाईक9) विजयकुमार गावित10) जयदत्त क्षीरसागर

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 09:18 AM IST

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार

11 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही निवडक मंत्र्यांचा शपथविधी आज संध्याकाळी पार पडणार आहे.

राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. बुधवारी रात्री उशीरा आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी 170 आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले.

संध्याकाळी होणार्‍या शपथविधी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत दिली.

तसेच या 10 जणांमध्ये मावळते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज सकाळी अजित पवार, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली.

मधुकर पिचड हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे दहा नेते शपथ घेतील असे ठरवण्यात आले आहे.

राष्ट्रवादीची यादी

1) अजित पवार

2) छगन भुजबळ

3) आर.आर. पाटील

4) जयंत पाटील

5) सुनिल तटकरे

6) गणेश नाईक

7) लक्ष्मण ढोबळे

8) मनोहर नाईक

9) विजयकुमार गावित

10) जयदत्त क्षीरसागर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close