S M L

प्रश्न बाल कामगारांचे

12 जून हा बालकामगार दिन म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने ' टॉक टाईम'चा विषय 'प्रश्न बाल कामगारांचे ' हा होता. बालकामगार दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी बाल कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली. 18 वर्षांखालची शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होईल, अशी कामं करणारी मुलं म्हणजेच बालमजूर होय. बाल कामगार कायदा 1986 नुसार 14 वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणार्‍या व्यक्तीवर कारवाई होते. बाल न्याय अधिनियमनानुसार 18 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणं हा गुन्हा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संतोष शिंदे यांनी दिली. भारत सरकारने मुलांना 54 प्रकारचे अधिकार दिले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारत सरकारने तसं मान्य केले आहेत.या अधिकारांत मुलांना जगण्याचा अधिकार, सहभागतेचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षतेचा अधिकार म्हणजेच सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्तता या अधिकारांचा समावेश केला आहे. बालमजुरीला आळा घालणं ही फक्त भारत सरकारची जबाबदारी नसून आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, असंही संतोष शिंदे यांनी सांगितलं. बाल मजूर आढळल्यास स्वयंसेवी संस्था, पोलीस, जिल्हा अधिकारी, कामगार विभाग यांना माहिती द्या, असं अवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2009 05:42 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2009 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close