S M L

एशियन गेम्सचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

12 नोव्हेंबरचीनच्या गुआंगझाओमध्येआज 16 व्या एशियन गेम्स स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. दोन वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केलेल्या चीनने संपूर्ण जगाला पुन्हा एकदा चकीत केले. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने चीनच्या क्षमतेचे आणि नाविन्याचे दर्शन सार्‍या जगाला घडले. एक तास चाललेल्या या उद्घाटन सोहळ्यात चीन, आशिया खंड आणि क्रीडा या तीन संस्कृतींवर आधारीत कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात डोळ्याचं पारणं फेडणार्‍या फटाक्यांच्या आतषबाजीने झाली.यानंतर 6 हजारपेक्षा जास्त कलाकारांनी आपली कला सादर केली. एशियन गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा मुख्य स्टेडिअमवर रंगला नाही. तर पर्ल नदीच्या काठावर जहाजाच्या आकाराच्या बेटावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवारपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार असून 16 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. यासाठी 12 जागतिक दर्जाची स्टेडिअम्स उभारण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 03:43 PM IST

एशियन गेम्सचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

12 नोव्हेंबर

चीनच्या गुआंगझाओमध्येआज 16 व्या एशियन गेम्स स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला.

दोन वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केलेल्या चीनने संपूर्ण जगाला पुन्हा एकदा चकीत केले.

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने चीनच्या क्षमतेचे आणि नाविन्याचे दर्शन सार्‍या जगाला घडले.

एक तास चाललेल्या या उद्घाटन सोहळ्यात चीन, आशिया खंड आणि क्रीडा या तीन संस्कृतींवर आधारीत कार्यक्रम सादर करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात डोळ्याचं पारणं फेडणार्‍या फटाक्यांच्या आतषबाजीने झाली.

यानंतर 6 हजारपेक्षा जास्त कलाकारांनी आपली कला सादर केली.

एशियन गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा मुख्य स्टेडिअमवर रंगला नाही.

तर पर्ल नदीच्या काठावर जहाजाच्या आकाराच्या बेटावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शनिवारपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार असून 16 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.

यासाठी 12 जागतिक दर्जाची स्टेडिअम्स उभारण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close