S M L
  • तुमचे प्रश्न अण्णांची उत्तरं !

    Published On: May 2, 2011 04:56 PM IST | Updated On: May 2, 2011 04:56 PM IST

    01 मेएक मे अर्थात महाराष्ट्र दिन...या दिनी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्याशी तरूणांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. अण्णांनी जेव्हा लोकपाल विधयेकासाठी दिल्ली येथे आंदोलन सुरू होतं. तेव्हा देशभरातील तरूणपिढी अण्णांच्या पाठिंब्यासाठी घराबाहेर पडली होती. हीच तरूणपिढी कोणत्याही आंदोलनाची ताकद असते असं मत ही अण्णांनी व्यक्त केलं होतं. 'तुमचे प्रश्न अण्णांची उत्तरं' पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरूणांनी अण्णांशी मनमोकळेपणानी आपली प्रश्न विचारली आणि अण्णांनी ही मोठ्या आपुलकीनं सर्वांच्या प्रश्नांना उत्तरही दिली आणि मार्गदर्शन ही केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close