S M L
  • थोडक्यात बचावले पवार

    Published On: Dec 3, 2011 01:29 PM IST | Updated On: Dec 3, 2011 01:29 PM IST

    03 डिसेंबरराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज एका अपघातातून बचावले. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचा एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पवार भाषण करत असताना अचानक व्यासपीठावरचा सिलिंग फॅन अचानक पडला. पण तो पवारांपासून चार फूट अंतरावर पडल्यामुळे पवार थोडक्यात बचावले. घटनेच्या वेळी व्यासपीठावर मध्य प्रदेश मंत्रिमंडळातले इतरही काही मोठे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यक्रमात गोंधळ उडला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close