S M L
  • कथा उसन्या मातृत्वाची

    Published On: May 29, 2012 01:17 PM IST | Updated On: May 13, 2013 03:49 PM IST

    आमीर खान आणि किरण राव यांना सरोगसीतून बाळं झालं आणि सरोगसी बद्दलची उत्सुकता, चर्चा सरोगसीसाठीच्या कायद्याची कमतरता हे सगळे मुद्दे समोर आले. माय ही....असते...पण या सरोगेट मदरहूडने मातृत्वाच्या संकल्पनाच बदलून टाकलेय... स्वत:च्या मूलाच्या ओढीने हजारो किलोमीटरचं अंतर कापून भारतात दाखल होणार्‍या परदेशी जोडप्यांना इथं त्यांचं स्वत:चं बाळ मिळालं. पाश्चात्य देशांपेक्षा दहापट स्वस्त दरात त्यांना भारतात ही ट्रीटमेंट मिळाली. इथं मातृत्वाची आस पूर्ण झालेल्या स्त्रिया दुसर्‍या जोडप्यांसाठी सरोगेट मदर बनल्या. गरिबीची चव चाखणार्‍या या स्त्रियांना उधारीच्या मातृत्वाने श्रीमंतीचा स्वाद दिला. कुणाला एक लाख तर कुणाला दहा लाख...आणि त्याचं जगणंच बदलंलं. एकीकडे मेडिकल सायन्समधली ही क्रांती आणि दुसरीकडे त्याला मिळालेली जागतिकीकरणाची जोड...! 'कथा उसन्या मातृत्वाची' रिपोर्ताज पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close