S M L
  • चला, जग जिंकूया !!

    Published On: Mar 29, 2012 02:53 PM IST | Updated On: May 13, 2013 03:51 PM IST

    28 मार्चआयबीएन लोकमतच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणार्‍या इंडियन टेलिव्हिजन पुरस्कारांमध्ये आयबीएन लोकमतने पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेतली. या पुरस्कारांमध्ये आयबीएन लोकमतने तब्बल 13 पुरस्कार पटकावले. 'चला जग जिंकूया' हे ब्रिद वाक्य घेऊन सुरू झालेलं आयबीएन लोकमत मराठी न्यूज चॅनेलने आपल्या अचूक कामामुळे महाराष्ट्राच्या घराघरात,मनामनात पोहचले. आज दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या इंडियन टेलिव्हिजन पुरस्कार 2012 मध्ये तब्बल 13 पुरस्कार पटकावून याची पोचपावतीच आयबीएन लोकमतने मिळवली. दिल्लीत झालेल्या शानदार समारंभ सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण झाले. भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकून नवा इतिहास रचला. याच विजयाला आम्ही साक्षिदार ठरलो. यासाठीच 'बेस्ट वर्ल्ड कप कव्हरेज'साठी आयबीएन लोकमतला पुरस्कार मिळाला. तर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकाचा लढा उभा केला. यासाठी देशासह विदेशातील नागरिक रस्त्यावर उतरले. याच आंदोलनाचे सर्वोत्कृष्ट कव्हरेजचा पुरस्कार आयबीएन लोकमतला देण्यात आला. त्याचबरोबर देशा-विदेशासह राज्याच्या बातम्यांचं परखड आणि अचूक वेध घेणार्‍या 'प्राईम टाइम' बुलेटिन कार्यक्रमाला 'बेस्ट प्राईम टाइम न्यूज शो' पुरस्कारने गौरवण्यात आलंय. आयबीएन लोकमतच्या या यशासाठी अहोरात्र झटणारे पडद्यावर आणि पडद्यामागे आमच्या शिलेदारांचा यात सिंहाचा वाटा आहे. यावेळी बेस्ट एंटरटेन्मेंट क्रिटिक आणि बेस्ट टिव्ही न्यूज अँकर म्हणून अमोल परचुरे यांनी पुरस्कार मिळाला. तसेच अण्णांच्या आंदोलनावर आधारीत अमोल पुरचुरे यांनी सुत्रसंचालन केलेल्या 'तुमचे प्रश्न, अण्णांची उत्तरे' या कार्यक्रमाला 'बेस्ट न्यूज टॉक शो'चा पुरस्कार मिळाला. तर विनय म्हात्रे यांच्या 'लाखो कातकर्‍यांची गोष्ट' या रिपोर्ताजला सामाजिक शोधपत्रकारितेचा पुरस्कार मिळाला. याचबरोबर रिपोर्टर आणि अँकर अलका धुपकर यांच्या 'स्टेम सेल्स' या रिपोर्ताजला 'बेस्ट डॉक्युमेंटरी'चा पुरस्कार मिळाला. तर 'रिपोर्ताज'या कार्यक्रमाची धुरा साभाळणार्‍या प्राजक्ता धुळप यांच्या 'नकोशी' रिपोर्ताजला 'बेस्ट करंट अफेअर्स फीचर शो' पुरस्कार मिळाला. सातार्‍यातील 222 नकुसा असलेल्या मुलींवर हा रिपोर्ताज आधारीत होता. याचबरोबर खेळात ही आयबीएन लोकमतची घोडदौड कायम राहिली. विनायक गायकवाड यांच्या लाल मातीच्या शहरात म्हणजे कोल्हापूरमध्ये केलेल्या 'नादखुळा फुटबॉल' या कार्यक्रमाला 'बेस्ट पॉप्युलर स्पोर्ट्स शो' पुरस्कार मिळाला. तर मराठी चॅनेलच्या इतिहास पहिल्यांदा आधुनिक दुनियेचा नजारा दाखवणार्‍या 'टेक गुरू' ला बेस्ट पॅकेजिंग शो' आणि बेस्ट प्रोमो चा मान मिळाला. आयबीएन लोकमतला मिळाले. हे यश प्रेक्षक/वाचकांच्या प्रेमामुळे शक्य होऊ शकले.. आपले प्रेम असेच असू द्या..तोपर्यंत अचूक बातमी ठाम मत पाहा फक्त आयबीएन लोकमत....!!

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close