S M L
  • म्यानमार सुरुवात लोकशाहीची

    Published On: Apr 11, 2012 05:15 PM IST | Updated On: May 13, 2013 03:50 PM IST

    म्यानमारमधली यावेळची सार्वत्रिक निवडणुक सर्वार्थाने ऐतिहासिक ठरली. लोकशाहीचा एक नवा अध्याय इथे सुरु झालाय. एक लोकप्रिय महिला या नव्या लोकशाहीचं नेतृत्व करतेय. आँग सॅन स्यू ची... म्यानमार म्हणजेच ब्रम्हदेश ज्यांच्यामुळे उभा राहिला त्यांची ही कन्या. तिने आपलं सर्वस्व देशासाठी पणाला लावलं. तिचं ध्येय एकच होतं- म्यानमारमध्ये लोकशाही आणणं पण निवडून आल्यावर स्यू ची यांनी आपल्या यशाचं श्रेय लोकांना दिलंय. स्यू ची यांच्या एनएलडी (NLD) या पक्षाने निवडणुकीत बहुमत मिळवलं. म्हणूनच निस्वार्थी हेतूने मिळवलेल्या यशाचा हा उत्सव सुरु आहे. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तो नेहमीच संघर्षमय होता. लष्करी सत्ता असलेल्या म्यानमारमध्ये स्यू ची परतल्या त्या आपल्या आईची काळजी घ्यायला. आपले पती आणि दोन मुलं यांना लंडनमध्येच ठेवून त्या आपल्या मायदेशी आल्या होत्या. पण त्यानंतर त्या आपल्या कुटुंबाला वर्षातून क्वचितच भेटू लागल्या. त्यांचे पती गेले तेव्हाही त्या लंडनमध्ये नव्हत्या. सगळ्यात कहर म्हणजे म्यानमारच्या लष्करी हुकुमशाहीने त्यांना यांगोन युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात नजरकैदेत ठेवलं होतं. तेव्हा खूप प्रयत्न करुनही त्यांची भेट घेणं पत्रकारांना अवघड जायचं. 15 वर्ष त्यांना राजकीय बंदी बनवण्यात आलं होतं. आणि इथूनच स्यूची यांनी म्यानमारच्या बदलाची दिशा ठरवली. पण या संघर्षाच्या काळात त्यांना लोकांचा पाठींबा मिळत होता. विरोध करणार्‍या जनतेला आणि आंदोलनांना हुकुमशाही मोडून काढायचा प्रयत्न करत होती. सोई मीन्ट 1988 मध्ये विद्यार्थी होते. अटक टाळण्यासाठी ते पहिल्यांदा जंगलात आश्रयाला गेले आणि नंतर भारतात आले. आता म्यानमारमध्ये परतल्यानंतर त्यांनी मिझिमा ही ऑनलाईन न्यूज एजन्सी सुरु केली. त्या भयानक दिवसांनतर आज म्यानमारमध्ये जो बदल झालाय याचं त्यांना आश्चर्य वाटतंय.आणि त्यांना म्यानमारमधल्या खर्‍या निवडणुकीत सहभागी व्हायचंय. गेल्या 50 वर्षांमध्ये फक्त तीनवेळाच म्यानमारमध्ये निवडणुका झाल्या. मागच्या सगळ्या वर्षांची कसर त्यांना या निवडणुकीत भरुन काढायची होती. तिच्या प्रतिमेवर एकेकाळी बंदी आणली होती. तिच प्रतिमा आज म्यानमारसाठी आनंद घेऊन आली. मग ते बॅनर असू दे की टिशर्ट असू दे. रस्त्याचे काने कोपरे आनंदाचं गाणं गात असतात. स्यू चींवर इथल्या जनतेचं खूप प्रेम आहे.. 50 वर्षांनतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय. पण अजूनही आम्हाला लष्करावर विश्वास नाही, ते कधीही दगा देऊ शकतात - इथे प्रत्येकाची अशीच भावना आहे.जनतेची ही भावना आहे कारण अजूनही म्यानमारमध्ये राजकीय स्वातंत्र्य नाही. म्यानमारच्या तात्मादावकडे अजूनही अंतिम सत्ता आहे. आणि संसदेच्या 25 टक्के जागा लष्करासाठी राखीव आहेत. लष्कर आता संविधानिक तरतूद करण्याच्या प्रयत्नात आहे. तसं झालं तर अध्यक्ष म्हणून कार्यालयाचा ताबा घेण्यापासून स्यूची यांना वंचित ठेवता येईल, त्यांच्या पक्ष सदस्यांनाही त्याचा फटका बसू शकतो असं स्यूची यांचे सल्लागार यू टीन ओ यांचं म्हणणं आहे.लष्कराची भूमिका कमी करण्यासंबधी संविधानात बदल करण्याचा विचार चालू आहे असे संकेत सध्याचे अध्यक्ष थेईन सेईन यांच्या कार्यालयातून मिळतायत. मतदारामध्ये नव्या आशा आणि अपेक्षांनी उत्साहाचं वातावरण आहे. 1 एप्रिलला पोटनिवडणुक झाली त्याला जनतेचा प्रतिसाद मोठा होता. या पोटनिवडणुकीने मोठी उलथापालथ होईल असा अंदाज होता. स्यूची यांच्या बाजूने जनतेचा कौल लागण्याची शक्यता होतीच . NLD च्या हेडक्वॉर्टरमध्ये निकालाच्या अपेक्षेने सगळे जमले होते.. आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे झालं.. आनंदाला कोणतीच सीमा नव्हती... डान्स... रॅप, हिपहॉप, फोक... प्रत्येकजण साजरा करत होता. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत... सगळेच मतदार होते असंही नव्हतं..पण यातला प्रत्येकजण स्यूची यांचा खंदा समर्थक होता... कोणी देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेलं, कोणी दूर देशातून आलेलं. तर बाहेर जिकडे तिकडे स्यूची यांच्यासाठी सेलिब्रेशन होत होतं. आम्ही त्या क्षणांचे साक्षीदार बनलो होतो. आणि भारता शेजारच्या लोकशाहीचा नवा अध्याय सुरु करणार्‍या एका देशाचेही.....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close